Sunday, February 27, 2011

ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते, मराठी तुमची माता..............................


२७ फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन  आपण सारे मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतोय. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विचार केला कि, " पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका." हा त्यांचा पटका आठवतो. कारण गांभीर्याने विचार केला कि ह्या पटक्यात कुसुमाग्रजांनी मराठीची दैन्यावस्था मांडली हे जाणवते. आपल्या शासनाने त्यातल्या काही ओळी शिधापत्रिकेवर छापल्या, आणि कर्तव्य पूर्तीचा श्वास घेतला. पण मराठीचे दशावतार आजही संपले नाहीत. मराठी भाषेची उपेक्षा आधी संस्कृतकडून आणि आता इंग्रजीकडून होत आहे. ह्या भाषेच्या जन्मापासून हि भाषा लढते आहे. तिचा लढा अखंड चालू आहे. तो अजूनही संपलेला नाही; पण ज्या अर्थी भाषा लढत आहे आणि अजूनही टिकून आहे त्या अर्थी हि भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवेल. मराठी भाषा दिनानिमित्त घेतलेला हा आढावा. मराठी बद्दल लिहितेय पण लेखाची सुरवात काय करू? आरंभापासून प्रारंभ करू कि प्रारंभापासून आरंभ करून सुरवात करू तेच कळत नव्हते कारण आमची मराठी अनादी अनंत आहे.


भाषा म्हटले कि ती नदी सारखी असते. जमिनिच्या पोटातून अचानक उसळलेला पाण्याचा उद्रेक ओसंडून पुढे जाऊ लागतो आणि बघता - बघता त्याचा प्रवाह होतो. अडचणीतून वाट काढत पुढे जाताना त्याचा विस्तार वाढत गेला त्याची होते नदी - अखंड वाहणारी दोन्ही काठांना समृद्ध करणारी! मनातील भावनांचा उद्रेक अचानक शब्दरूप घेऊन बाहेर पडतो  आणि बघता - बघता त्याची भाषा होते. मनतील भावना, विचार नेमका व्यक्त करताना येणारे अडथळे ओलांडत नव्या शब्दांची देवाण - घेवाण होताना येणाऱ्या अडचणीतून वाट काढत जाताना शब्द संख्येचा विस्तार होत जातो. सामर्थ्य वाढत जाते आणि शब्दांची भाषा होते - अखंड वापरली जाणारी, ती वापरणाऱ्या मानव समूहाला सांस्कृतिक समृद्धी देणारी!!!अनेक छोटे - मोठे  जिवंत झरे, जागोजागी नदीला येऊन मिळतात आणि तिच्या जल संपत्तीत मोलाची भर घालतात. नदीच्या पात्रात इतर झरयांबरोबर मिसळून मूळ नदीचा स्त्रोत अधिक रुंदावतात. नदीची खरी ताकत ह्या झरयांमध्ये साठलेली असते. तसेच जागोजागच्या बोली भाषा, प्रमाण भाषा, हे भाषेला जिवंतपणा प्रदान करतात. तिचे सामर्थ्य वाढवतात. मराठी भाषेचा अभिमान ओवी, अभंग, लावणी, पोवाडा, पटका, कथा, कादंबर्या, अश्या अनेक रचनांतून व्यक्त झालेला आपण पाहत आलोत. आज मराठीच्या वेगवेगळ्या बोलींमधून लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून  उत्स्पुर्त, जिवंत शब्दांचे झरे प्रमाण भाषेच्या प्रवाहाला समृद्धी देतात. मात्र इंग्रजी - हिंदी च्या प्रभावामुळे त्या भाषांतील शब्दांचा, वाक्य  रचनेचा अकारण आणि अतिरेकी वापर मराठी भाषेचा प्रभाव दुषित करत आहेत.  

आज प्रामुख्याने मराठीची तुलना इंग्रजीशी  होत आहे. इंग्रजी ही पोटाची भाषा आहे आणि मराठी ही आत्म्याची भाषा आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी आपण आपला आत्म्याचा आवाज दाबत आहोत. इंग्रजी हि ज्ञानभाषा जागतिक स्तरावर स्वीकारली गेल्यामुळे तिचा प्रभाव सगळीकडे, वाढताना दिसतो आहे. त्याला महाराष्ट्रही  अपवाद नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याची तीव्र इच्छा आपल्या मनात असणे आज काळशी सुसंगत आहे. परंतु " इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मराठीकडे आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल." हा मात्र अतिशय घातक समज आजच्या सुशिक्षित समाजात पसरत चाललाय. १५० वर्षाच्या इंग्रजांच्या पारतंत्र्याची राजवट आजही न संपल्याची हि लक्षणे दिसून येत आहेत. "ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते, मराठी तुमची माता" असा टाहो फोडण्याची वेळ मराठीची आहे.

आज संगणकाने आणि अंतरजालाने सारे जग जवळ आणले आहे आणि शेकडो भाषा यूनिकोड (पर्यायी मरठी शब्द माहित नाही) द्वारे एकत्र गुंफल्या आहेत. भाषा आणि नदी यामधले साम्य येथेही आढळते. कारण लहान मोठी कोणतीही नदी हि शेवटी समुद्रातच विलीन होते. आज सर्व भाषा एकमेकीत अश्याच मिसळून जात आहेत. मात्र जसे समुद्रात मिसळण्या पूर्वी प्रत्येक नदीला स्वतंत्र अस्तित्व असते त्याच प्रमाणे भाषेलाही तिचे स्वतंत्र अस्तित्व असते आणि हा स्वतंत्र प्रवाह जितका समृद्ध असेल तितका विश्वभाषेत तिच्या शब्दांचा भरणा अधिक. 

अनेक शतकांची समृद्धी लाभलेली मराठी भाषा आज संगणकाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचू शकते किंबहुना ती पोहोचवली जाते. पण यूनिकोड मध्ये तिच्या वैशिष्ट्याना जागा मिळायला हवी. ती मिळावी असा आग्रह, आपण  आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार आहोत का ?  "कितीजण मराठी भाषा वापरतात ? ह्या प्रश्नाला उत्तर देताना दरवर्षी हि संख्या घटणार असेल तर जगामधल्या समृद्ध भाषेमध्ये  जिची गणना होते अशा मराठीचे उद्याचे भवितव्य काय ? आपल्या मातृभाषेवरील प्रेम फक्त मनात ठेवून चालणार नाही ना!  पुढच्या पिढीला मराठीचे महत्व तिची गोडी आपणाला पटवून द्यावी लागेल तरच  उद्याच्या जगात मराठीचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहील व विश्वभाषेतही तिला महत्वाचे स्थान मिळेल. तसे न करता जर आपण तिच्याकडे पाठ फिरवली तर तिची "सरस्वती नदी" होऊन जाईल व आपणास म्हणावे लागेल 

" ज्ञानदेवे गीता सांगितली | तुकारामांची गाथा तरंगली|
तेथेच मराठीस कोणी ना वाली| फोडीयेला टाहो||"

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, February 25, 2011

हुरहूर……………………..६



Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!


ती वर्तमानात आली असली तरी तिचा विचारचक्र चालूच होता. तिने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे १:४५ झाले होते. ती स्वताशीच म्हणाली OMG mam झोपा आता उद्या ऑफिस ला जायचं आहे. सो तिने तिचा mobile मधील  MP३ बंद केला आणि cell चार्गिंग ला लावला. स्वताशीच हसत त्याचा गोड आठवणींच्या कुशीत ती झोपी गेली. 
******************************************************************************************************

आठवणीत रमल्यामुळे रात्री झोपण्यास उशीर झाला असला तरी त्याचा थकवा तिच्या चेहर्यावर दिसत नव्हता. ठरल्याप्रमाणे फॅमिली पिकनिकला ती जाऊन आली. दोघेही आपापल्या रुटीन बिझी झाले असले तरी चॅट वरुन संपर्क होताच आणि गप्पांचा विषय पण एकाच भेटायचा कधी पण मुहूर्त काही ठरत नव्हता; दिवसमागून दिवस जात होते, डिसेंबर महिन्याची २० तारीख होती; त्याच्या मनात काय आले कोण जाणे त्याने लंच ब्रेक मध्ये तिला कॉल लावला, ती जस्ट लंच करायला जागेवरून उठली होती इतक्यात माही......माही.. असा तिचा सेल वाजला तिने ट्यून वरुनच ओळखल हा त्याचा कॉल आहे, आज अचानक ह्याने कॉल का केला ह्या विचारात असताना तिने कॉल पिक केला.
तो: हे हाय !
ती: हाय! आज अचानक कॉल क्या बात है!
तो: जेवलीस का?
ती: बसतेय जेवायला बोल ना काही काम होत का ?
तो: नाही ग! सहजच कॉल केला 
ती: वेरी गुड बाय द वे तू जेवलास का ?
तो: हो आत्ताच 
ती: ओके .
दोन सेकंद कॉल वर कोणीच बोलले नाही 
ती: बोल ना !
तो: हे तुला २५ ला ख्रिसमस ची सुट्टी आहे ना .
ती: हो आहे का ? भेटायचा प्लान करतोस का 
तो: हम्म्म्म
ती: अरे रेड डेट आहे घरी काय सांगायच 
तो: अरे हो मी हे विसरलोच रेड डेट म्हणजे इकडे रेड सिग्नलच म्हटला पाहिजे . म्हणजे आपली भेट नाही.
ती: असा का बोलतो? भेट होईल आपली डोण्ट वरी काढू मुहूर्त.
तो: कधी पुढच्या वर्षी 
ती: तसा पण पुढच वर्ष उजडायला फक्त १० आहे.
तो: हमम्म! 
ती: हे मी जेवतेय आपण नंतर बोलूया का प्लीज़ 
तो: ठीक आहे तू जेवून घे, चल बाय टेक केअर.
ती: बाय टेक केअर 
त्याने कॉल कट केला तशी ती विचार करू लागलिशीत शिट कधी मुहूर्त भेटणार देव जाणे. पण त्याला भेटून फेस करण्याची हिंमत आहे का आपल्यामध्ये. लंच ब्रेक संपला तस तिने हे सर्व विचार झटकून काम करायला सुरवात केली.

२५ पण उजाडून निघून गेली. पण मुहूर्त काही फिक्स होत नव्हता २८ ला अचानक त्याने तिला पिंग केले
तो: हे  कशी आहेस ?
ती: मी मज्जेत .
तो: तुला १ जानेवारी ला सुट्टी आहे का न्यू इयरची ?
ती: हो का ?
तो: भेटूया का? की तुझा काही प्लान आहे.
ती: हे नाइस आइडिया.
तो: चल तर मग ड्न आपण १ तारखेला भेटतो आहोत.
ती: चल तर मग तू प्लान आणि जागा ठरव, मग मला सांग. आणि आय होप तुझी ट्रेकिंग आडवी येणार नाही.
तो: हो का? तू फॅमिली पिकनिक वर जाऊ नको.
ती:
तो:
ती: मला थोड काम आहे. प्लीज़ 
तो: ठीक आहे तू काम कर आपण नंतर बोलू 
ह्यानंतर तिने आपल्या कामाला जुंपून घेतले असले तरी ऑफीस सुटल्यावर तिच्या मनात ह्या भेटिचा विचार येऊ लागला. तिच विचारचक्र फिरू लागल होत त्या विचारांच्या नादात तिने बस पकडली. आपल्याला पहिल्या भेटीपेक्षा ह्या भेटीची हूरहुर का लागून राहिली आहे? त्याला गर्लफ्रेंड असताना पण आपल प्रेम आहे. नक्की काय चालू आहे आपल तेच कळत नाही. विचार करता करता तिने आपला मोबाइल पर्स मधून काढला आणि एंपी३ प्लेयर चालू केला तर गाणे चालू झाले "माय नेम इज शीला..शीला की जवानी" हे गाण कोणी लावल, ह्मम्म्म ऑफीस कोणी तरी गाणी ऐकायल सेल घेतला असणार अस म्हणत तिने नेक्स्ट सॉँग प्ले केला "साजन मेरा उस पार है|" आणि तिने डोळे मिटले, पण मन आणि मेंदूची झटापट चालूच होती. टू बी ऑर नॉट टू बी सारखा गहन प्रश्न तिच्यापुढे उभा होता. भेटव की नाही? तिच्या विचारांसोबत बस पण पळत होती. मेंदूचा रस्ता सरळ असला तरी मानाने वाकडा रस्ता घेतला. तिने डोळे उघडून बघितलं तर तिने अर्ध्याहून अधिक रस्ता पार केला होता तो पर्यंत मनाने भेटण्याचे नक्की केले होते.  बसचा प्रवास चालूच होता. इकडे एंपी ३ प्लेयर वर "सुना - सुना लाम्हा - लाम्हा मेरी राहे तन्हा - तन्हा, आकार मुझे तुम थाम लो "  तिने परत डोळे मिटले आणि आपल्या विचार चक्रात गुंतली ह्यावेळी भेटीची हुरहूर तर जाणवते आहे पण आपण दोघे पाहिल्यासारखे इन्फॉर्मल वागू शकू का ? कि फॉरमॅलिटी वाढणार आहे कारण पहिली भेट ते आजपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होत. 

तिने डोळे उघडून बाहेर बघितले तर तिचा  स्टॉप जवळ आला होता. तशी तिने स्वताला सावरला आणि ती उठली. स्टॉप वरून घरी येईपर्यंत तिने आज पेंडिंग असलेला ब्लॉग पब्लिश करायचा हे ठरवलं. घराचं दर ठोकत असतानाच शेजारच्या छोटीने आवाज दिला "आत्या अलिश" तिने उत्तरादाखल एक स्माइल दिली. इतक्यात आईने दर उघडले आणि बोलली आलीस ! चल हातपाय धुवून घे मी तुला जेवायला वाढते. तिने जेवण उरकून घेतला आणि टीव्ही बघायची सवय नसल्याने ती सरळ आपल्या रूम मध्ये आली. लॅपटॉप चालू करून इंटरनेट चालू करणार तेव्हढ्यात तिच्या लक्षात आले कि आपला  रीचार्ज संपला आहे. सो तिने  लॅपटॉप बंद केला आणि सरळ झोपून गेली. 

होता तो ३१ जानेवारी उजाडला. उद्या ते दोघे पण भेटणार होते आणि प्लान काहीच डिसाइड झाले नव्हते, प्लॅनिंग करायला हवे म्हणून  त्याने तिला पिंग केले. 
तो: हे उद्या आपण भेटतोय न ?
ती: हो का ? असा का विचारतोस?
तो: कारण आपण काहीच प्लान केला नाही म्हणून म्हटलं.
ती: अरे हा ह्या कामाच्या नादात काही लक्षातच राहत नाही. काय करू या आणि मुख्य म्हणजे कुठे भेटूया?
तो: मागच्या वेळी भेटलो तिथे वाशी, आणि प्लान पण लास्ट टाइम सारखाच ठेवूया मूवी बघूया आणि मग सी शोर ला जाऊया 
ती: चालेल मग मी टिकेट्स बुक करते.
तो: ठीक आहे पण ह्या वेळी पैसे मी देणार.
ती: मी क्रेडिट कार्ड ने बुक करतेय 
तो: तरीही मी तुला देणार तू भर मग तिकडे 
ती: पण का ? 
तो: गप्प घे मागचं वेळी तू केलीस न बुक मग ह्या वेळी मी करणार 
ती: ठीक आहे होऊ दे तुझ्या मनासारखा 
तो: कोणता मूवी बघायचा 
ती: थांब चेक करून सांगते कोणता लागलाय ते 
तो: ओक 
ती: अरे तीस मार खान , मेगामाइंड , गलिवर ट्रॅवेल्ज़ असे आहेत.
तो: मेगामाइंड बुक कर ना
ती: ओके ,  अरे मी मेगामाइंड चेक केला तो दुपारी आहे सकाळी तीस मार खान, गलिवर ट्रॅवेल्ज़ 
तो: मग गलिवर ट्रॅवेल्ज़  बुक कर , ३डी मूवी आहे ना 
ती: हो 
तिने सीट लेआउट , दाते वगैरे बघून टिकेट्स बुक केली. एक प्रिंटआउट काढली आणि सॉफ्टकॉपी त्याला मेल केली. प्रिंटआउट  पहिली तिने पर्स मध्ये ठेवली मागच्या वेळेसारखा होऊ नये म्हणून. नंतर ती त्याला बोलली 
ती: हे इकडे पार्टी टाइम चालू आहे. 
तो: इकडे पण तेच चालू आहे चल आपण आता उद्या भेटूनच बोलू मी जातो पार्टी करायला. बाय टेक केअर 
ती: बाय टेक केअर 

क्रमश: 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Saturday, February 19, 2011

हुरहूर……………………..५


Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!



तो: सोना तुला म्हटलं होतं ना कि मी प्रेम करतो पण लग्न करू शकत नाही तुला कारण ऐकायचा आहे का ?
ती: हो सांग ना plz
तो: I  have Girlfriend and i m committed with her 
****************************************************************************************************************


त्याने  जरी  आपल्या  commitment बद्दल  हिम्मत  करू   सांगितले  असले  तरी  तो  मनातून  घाबरला  होता  कारण  तिच्या  प्रेमापेक्षा  हि  तिच्यासारखी  चांगली   मैत्रीण  आपण  गमावून  बसू  अशी  त्याला  भीती  वाटत  होती. तो  मनातूनच  ह्या  सगळ्या  गोष्टीची  तयारी  करत  होता. तू  असा  का  वागलास ? मी  काय  बिघडवल  होत  तुझ  तर  तू  माझ्याशी  असा  वागलास ? ह्या  प्रश्नांना सामोरे  जाण्याची  तयारी  करत  होता  इतक्यात  तिचा  msg ping झाला 
ती: thanks
हे  वाचून  तो  तीनताड  उडालाच  त्याच्या  डोळ्यावर  त्याचा  विश्वास  बसला  नाही  कि  हिने  thanks म्हटलंय? त्याच  गोंधळलेल्या  अवस्थेत  त्याने  तिला  reply दिला.
तो: what ?
ती: thank you very much, मला  खरच  आवडल  कि  तू  खरं बोल्लास .
तो  पूर्णपणे  गोंधळाच  होता  काय  मुलगी  आहे  हि?  हा  प्रश्न  त्यालाच  पडला  होता.
तरीही  त्याने  स्व:ताला  सावरत  तिला  reply केला. 
तो: sorry i hurt u
तशी  ती  पहिल्या   breakup मुळे  बरीच  though झाली  असल्याने तिला हल्ली अशा गोष्टींचा फारसा फरक पडत नव्हता. 
ती: No need to say sorry dear. तू खरं बोल्लास मला आवडलं त्यामुळे बरेच complications कमी झाले. माझ्यासाठी एकाच गोष्ट कर तिला कधी फसवू नको. तिचा विश्वास कधी तोडू नको. विश्वास तुटला ना कि किती वेदना होतात मला माहित आहे आणि मला त्या तिला झालेल्या आवडणार नाहीत. specially माझ्यामुळे झाल्या तर अजिबात नाही.
तिच्या MSG वर फक्त इतकाच लिहू शकला 
तो: ok I promise मी नाही तिला कधी त्रास होऊ देणार.
ती:   एक प्रश्न विचारू ?
तो: नको मला माहित आहे तुला काय विचारायचे आहे ते.
ती: हो का ? काय विचारणार होती मी?
तो: तू तिचा नाव विचारणार होतीस ना ?
ती: तुला कसं कळलं? सांग ना रे नाव plz 
तो: ह्या प्रश्नच उत्तर मी तुला कधीच देणार नाही plz मला तू force पण करू नको.
ती: hey चल bye मला माझ्या best friend बरोबर  shopping ला जायचे आहे. त्याच्या GF साठी गिफ्ट घ्यायचं आहे.
तो: कोण आहे तो ?
ती: माझं बेस्ट friend त्यानेच तर मला सावरलं माझ्या break up नंतर 
तो: ok 
ती: चल bye 
तो काहीतरी type करत होता बूट निघायच्या घाईत असल्याने ती पटकन sign out झाली. ती रात्री online आली तेव्हा तिने त्याचा offline msg बघितला, त्याने तिला विचारला होता, " hey तुझ्या बेस्ट friend ला माहित आहे  का आपण भेटलो ते? " तिने त्याला offline मधेच उत्तर दिले, हो त्याला माहित होता, even मी कोणाला हि भेटणार असेल ना तर त्याला सांगते एकवेळ घरी माहित नसतं पण त्याला माहित असतं. तिने email  check केले आणि झोपायला गेली. पण का कोण जाणे त्या दोघांना हि झोप लागत नव्हती. दोघानाही सकाळ कधी होतेय याची हुरहूर लागून राहिली होती.

सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर त्याने तिचे Offline chat बघितले. त्याला बरे वाटले.  आजपण त्यांच्यात बोलणे झाले काळाच्या बोलण्याचे काहीच पडसाद त्यांच्या दोघांच्या हि बोलण्यात दिसले नाहीत. specially तिचं बोलणं नॉर्मल असल्याने त्याला बरे वाटले. so त्याने मनोमन ठरवून टाकले होते कि आत्ता हिला hurt करायचे नाही. पुन्हा भेटायचं कधी हा मुख्य point होता हल्ली discussion चा. इतक्यात तिच्या cell वर email  चा notification मिळाला तशी ती भानावर आली; आज ह्या घटनेला महिना होत आला होता. पहिला भेटण्याचा ठरला तेव्हा त्याची trekking आडवी आली होती, मित्रांसोबत ट्रेक चा प्लान झाला त्याचा. नंतर च्या मुहूर्ताला तिच्या family ने पिकनिक काढली होती सो भेट पुन्हा postpone झाली. ती वर्तमानात आली असली तरी तिचा विचारचक्र चालूच होता. तिने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे १:४५ झाले होते. ती स्वताशीच म्हणाली OMG mam झोपा आता उद्या ऑफिस ला जायचं आहे. सो तिने तिचा mobile मधील  MP३ बंद केला आणि cell चार्गिंग ला लावला. स्वताशीच हसत त्याचा गोड आठवणींच्या कुशीत ती झोपी गेली. 

क्रमश:


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, February 07, 2011

Calendar 2011

मराठी buzz मंडल दिनदर्शिका 








मराठी buzz मंडल दिनदर्शिका 
desinged by : Kalpesh Mohite 
Photography by : Atul Rane
Models:  Vaishali, Sneha, Arjun, Atul, Prachi, Nivedita, Mandar, Ganesh, Kalpesh, Nilesh, Priti, Amar 

Copyrights are reserved by kalpesh mohite & marathi buzz mandal