Posts

Showing posts from May, 2010

"ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,

"ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला," ह्या गीताचे शताब्दी पुरती वर्ष तसेच; हे गीत रचून महासागराला साकडे घालणाऱ्या महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना मनाचा मुजरा. २८ मे १८८३ साली दामोदरपंत आणि राधाबाई या दाम्पत्याच्या  पोटी नाशिक जिल्ह्याच्या भूगुर गावी ची. विनायकचा ( आदरार्थी एकवचन) जन्म झाला. त्यांचे घराणे इनामदारांचे. घरी समृद्धी, म्हणजे ' देशभक्तीचे' फुकटचे श्राद्ध घेण्याची त्यांना अजिबात गरज नव्हती, पण देशभक्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली होती. पारतंत्र्याची साल त्यांना शांत झोप देत नव्हती. ' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' म्हणजे स्वातंत्र्यवीरांचे असामान्यत्व त्यांच्या बालवयात दिसून आले. त्यांची बुद्धी शीघ्र व तल्लख, आकलनशक्ती जबरदस्त. ९/१० वर्षाचे असताना ते वृत्तपत्रीय वार्तांवर मित्र मंडळीत चर्चा करीत. लहानपणी त्यांची आई वारली. त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न न करता त्यांचे मातेच्या वात्सल्याने  संगोपन केले. १८९७ साली वयाच्या १४ व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिकला आले. तेथील गणेश उत्सवातून त्यांनी देशभक्तीच्या…

भारतातील सुर्यमंदिरे

Image
वेदांमध्ये सुर्याला आद्य शक्ति म्हणून मानले आहे. सूर्यदेवाला "सूर्य" किंवा "आदित्य" आशा अनेक नवानी संबोधतात. वेदांमध्ये सुर्याला मुख्य स्थान दिले आहे.            पुराणात सुद्धा सुर्याला मुख्य स्थान दिले आहे. रामाला सुद्धा सुर्याची आराधना करण्यास सांगितले होते. इराण मधल्या काही मुख्य धर्माच्या ग्रंथामध्ये सुद्धा सुर्याला प्रथम स्थान दिले आहे. पुढे पारसी समाजाने सुद्धा "अग्न"  हे त्यांचे आराध्य स्थान मानले आहे. सारांश इतकाच की बहुतेक सर्व धर्माच्या व्यक्ति व् ग्रंथामध्ये  सुर्याला प्रमुख स्थान दिले आहे.अश्या या सूर्य देवाची देवाले जगभर पहावयास मिळतात. ७ व्या शतकात मुलतान ( पकिस्तान ) येथे पहिले सूर्यमंदिर बांधले होते. पण भारतात ७ प्रमुख सूर्य मंदिरे पहायला मिळतात.   दक्षिनारका मंदिर :-                                    बिहार राज्यात गया येथे हे सूर्यमंदिर आहे. देवळासमोर कुंड असून भाविक सूर्याला पाणी कुंडामध्ये सोडतात. याच परिसरात सूर्याची अनेक लहान - मोठी मंदिरे पहायला मिळतात. मगद राजाच्या  वेळी ही देवळे बांधण्यात आली असावी. येथील देवळाच्या सूर्य मूर्तीवर इर…

प्रवास आई ते mummy चा

Image
जन्म झाल्यावर आईच्या शरीरापासून बाळाची नाळ तोडली जाते पण त्या आईची आणि बाळाची जी भावनिक नाळ जोडली जाते, ती पुढे आयुष्यभरासाठी असते. मातृत्व व्यक्त करणारी. आईपणाचा पवित्र नातं जपणारी. या नात्यात आगदी जन्माला घातल्यापासून ते पुढे जीवनभर कुठेही स्वार्थ नसतो. परतफेडीची अपेक्षा नसते. उलट अखंड पाझरत जातो मातृत्वाचा झरा.................... ईश्वराचेदुसरेरूपम्हणजेआई; मुलांनाभरपूरदेऊनहीआईकधीरितीहोतनाही. तीसमृद्धचहोतेसागरासारखी ............. आईकोणत्याहीप्रदेशातीलकिंवाव्यवस्थेनेकोणत्याहीजातीतढकललेलीअसलीतरीतिचाप्रेमसारखाचअसतं.......... जातीच्याकप्प्याततेकधीचमावतनाही... कोणत्याहीसीमंजवळअडखळतनाही...... जगभरातीलकुठलीहीआईघ्या तिची  भाषा सारखीनसेलहिपणस्पर्शातलंवात्सल्यसारखचअसतं................ आपल्याआईला "आई" हिहाकद्यायचीमित्रकिंवामैत्रिणीच्याआईला "काकू" हाकद्यायचीहाप्रघातआजपणचालूआहे.पणआईहिआईअसतेतीतुझी - माझीनसते. आईलाजात, धर्म, पंथनसतोतीफक्तवात्सल्यमुर्तीअसतेहेमलाशिकवलातेमाझामित्रमिलिंदम्हात्रे.  ( मीत्याचीखूपआभारीआहेकित्यानेजगातलासर्वातमोठासंस्कारमाझ्यावरकेला.)  परवाचमीमाझ्याएकामित्…

महाराष्ट्र - एक नवी सांस्कृतिक ओळख

Image
महाराष्ट्र म्हणजे संस्कृति आणि परंपरा यांनी नटलेल राज्य. ५० वर्षापुर्वीचा आणि आताच्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत, जसे समुद्रात खूप सारे प्रवाह येऊन एकत्र होतात तसेच काहीसे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे हि आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवाह इतके   वेगळे पण एकमेकाना जोडणारे आहेत आणि प्रत्येक प्रवाहाचे एक  वेगळे वैशिष्ठ्य आहे; त्यामुळे ह्या प्रत्येक प्रवाह मुळे महाराष्ट्राची एक नवीन ओळख बनते आहे. महाराष्ट्र ही भूमी ही देवांची , संताची अन भक्तांची, वीरांची, लोककलांची, साहित्याची आहे. हा प्रत्येक प्रवाह महाराष्ट्राची एक वेगळी ओळख सांगतो. ह्याच प्रवाहंची ही फ़क्त तोंड ओळख. ( कदाचित काही गोष्टी लिहायच्या राहून गेल्या तर क्षमस्व:   )
देवांचा, संतांचा , भक्तांचा महाराष्ट्र : महाराष्ट्रातील  देवस्थाने  आपल्या  सगळ्याना  माहित  असतीलच.  अष्टविनायक, मुंबई चे  सिद्धिविनायक,  पंढरपुर,  साईं बाबां  सारखा  अवतार  पण  देवाने  महाराष्ट्रातच  धारण  केला  ते  पवित्र  स्थान शिर्डी, गणपति पुळे,  ५१  शक्ती  पीठे  संपूर्ण  देशभरात  आहेत;  त्यातली  साडेतीन शक्ती पीठे हि महाराष्ट्रात आहेत आणि  ती म्हणजे तुळजाभवान…

द्रोणागिरीच्या माथ्यावरून

Image
मित्रानो गेल्या रविवारी द्रोणागिरीच्या डोंगरावर जाण्याचा योग आला. तसा तो दरवर्षी येतो त्यात काही विशेष नाही. मी लहान असताना आमच्या मातोश्रींना विचारले होते आपण इतक्या वर जाण्याचे कष्ट का घेतो ? त्यावेळी त्यांनी सांगितले होती कि इथे आपल्या कुळाचा मूळ पुरुष म्हणजे वेताळ देव राहतो. त्याची वर्षातून एकदा तरी सगळ्यांच्या उपस्थितीत पूजा व्हावी म्हणून सगळे जातोय. ह्या वर आम्ही पुढचा प्रश्न विचारला " देवाला की दुसरी जागा भेटली नाही का? इतक्या वरती जंगलात का राहायला गेला ? त्यावर मातोश्री डोळे वटारून म्हणाल्या " कार्टे गप्पं बसतेस का आता .............;इतके ऐकूनच आम्ही गप्पं बसण्याचा निर्णय घेतला तो आजतागायत डोंगरावर चढताना कायम असतो. तिकडे गेल्यावर निदर्शनास आले कि फक्त आपणच नाही तर आजूबाजूच्या खेड्यातील लोक पण तिकडे पूजेला येतात. अश्या परिस्थितीत मनात आणखी प्रश्न कि वेताळ देव आमच्या  कुळाचा मूळ पुरुष मग ती लोक का पूजा करतात ( फक्त मनातच ) जाऊ दे असे बरेचसे प्रश्न आहेत. 


द्रोणागिरी संदर्भात बोलायचे झाले तर ह्या डोंगराची निर्मिती कशी झाली त्याबद्दल एक कथा सांगितली जाते (दंतकथा )  असो. त…