Posts

Showing posts from 2014

श्रीकबीरदर्शन

श्रीकबीरदर्शन - लेखक - डॉ. विजय बाणकर,  पृष्ठ संख्या - १६६,  मूळ किंमत - १६०/-  प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये १२० /- रू.  (उपलब्ध - १२/०१/२०१५ रोजी) आजच आपली प्रत नोंदवून ठेवा! वर्ण, जात, पंथ वगैरे संकुचित देहनिष्ठ भावांच्या पलीकडे जाऊन ते अविभक्तपणें स्वरूपनिष्ठ जीवन जगत होते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना विचारल्या गेलेल्या नेहमीच्या प्रश्नांची त्यांनी दिलेली पुढील पारमार्थिक उत्तरे होय : एके दिवशी एका वनातून जात असता दुपारी ते एका झोपडीत गेले. तिथे रहात असलेल्या वीस-एक वर्षाच्या मुलीने त्यांना विचारले  -
    प्रश्न  :  आपण कोण बरे?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमची जात?     
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचा पंथ / संप्रदाय?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचे नांव?
    उत्तर  : कबीर.
या एकशब्दीं उत्तरांनी विस्मित होऊन ती मुलगी उद्गारते, ‘मी अनेक साधू पाहिले पण अशाप्रकारे उत्तरे देणारा मात्र आजपर्यंत कुणी भेटला नाही.   ‘दि मोस्ट ब्युटिफूल नेम्स म्हणून अल्लाची जी ९९ नावे जपली जातात त्यापैकी ‘अल् कबीर' हे एक विशेष नाम होय. कबीर म्हणजे  श्रेष्ठ, ग्रेट, उत्कृष्ट व…

टर्मिनस- अस्वस्थ करणार्‍या ताज्या गूढकथा

मराठी ललित साहित्याला विशेषत: कथा-कादंबर्‍यांच्या प्रांतात थोडी मरगळ आलेली आहे की काय अशी वाटणारी आजची परिस्थिती.  त्यातच गूढकथा-विज्ञानकथा आदी आधीच दुर्लक्षित  साहित्यप्रकारांमध्ये लेखणी आजमावणारे नवोदित लेखक सापडणं दुर्मिळच. अशा काळात  अभिषेक अनिल वाघमारे या नवोदित लेखकाने आपल्या ‘टर्मिनस’ या पहिल्याच कथासंग्रहाद्वारे गूढकथांच्या या प्रांतात दमदार पाऊल टाकले आहे.       हा कथासंग्रह छोटेखानीच असला तरी त्यातील एकंदर दहा कथा या परस्परांपासून वेगळ्या आहेत. येथे सरसकट सगळ्या कथांना गूढकथा जरी म्हटलं असलं तरी त्या रूढार्थाने तशा नाहीत.  उदा. ‘सर्किट’ व ‘पाऊलखुणा’ या विज्ञानकथा या सदरातही मोडू शकतात. तर,‘ऑब्जेक्ट्स इन द मिरर...’,‘खोळ’ यासारख्या कथांना एक सामाजिक अंग देखील आहे. ‘चूक ?’ आणि ‘टर्मिनस’ या कथा तत्वज्ञानाचे चिंतन करणार्‍या आहेत तर ‘सुरकुत्या’,‘ काचेचे ग्लास’ या कथा कुटुंबकथेच्या वाटेने जाणार्‍या गूढकथा आहेत.
      शैलीदार लेखन कमी झाल्याच्या काळात वाघमारे स्वत:ची वेगळी शैली निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. मांडणीतील सुटसुटीतपणा, एक मिष्किल विनोदाचा ‘अंडरकरंट’,मध्येच पेरलेली चमकदा…

What an idea sirji!!!

ऐन गणपतीत आजारी पडल्याने गौरी साठी माहेरी येणे झालेच नव्हते. तेव्हा म्हटले आता बरे वाटत आहे माहेरी जाऊन यावे. यावेळी मुहूर्त निघाला तो संकष्टीचा, भाद्रपदातली संकष्टी म्हणजे साखर संकष्टी आमच्याकडे हिला साखर चौथ असे हि म्हणतात. ह्या साखर चौथीला हि आमच्या भागात गणपती बसतात. मामाकडे गणपती  बसत असल्याने माझ्या माहेरी येण्याच्या मुहूर्ताचा फायदा झाला, श्रींचे दर्शन हि झाले आहे सगळ्यांची भेटही झाली. साहजिकच आहे भेट झाली म्हणजे गप्पा होणार आठवणी उजळल्या जाणार अशीच एक गावातील मामांची आठवण निघाली आणि आम्ही खरच म्हणावे लागले What an idea sirji!!!

गणपती घरी येणार म्हटले कि सजावट आलीच सजावट म्हणजे मखर बनवण्यासाठी थर्माकोलचा प्रामुख्याने वापर आणि गणेश या मखरात विराजमान झाले कि अखंड जळणाऱ्या समया आणि अगरबत्ती. पूर्वी लहान अगरबत्ती यायची त्यामुळे कोणाला न कोणाला सतत तेथे राहावे लागायाचे मग कुणीतरी अक्कल वापरून मोठ्या अगरबत्त्या मार्केट मध्ये आणल्या त्यावेळी त्या खूप महाग असल्याने रात्रीच लावल्या जायच्या आपण झोपल्यावर देखील अगरबत्ती चालू राहावी हा उद्देश.
पण अशा अगरबत्त्या म्हणजे थर्माकोलच्या मखराला धोक…

महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

पुस्तकाचे नाव - महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

लेखकाचे नाव - सुनील पोटेकर

प्रकाशक - शब्दांजली प्रकाशन -पुणे. (संपर्क - ९२७०१०८०८०)
किंमत - रु.१२० /-

महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स या पोर्टलवर ‘ई-संस्कृती' या सदरात सुनीलचे महाराष्ट्र राज्यातल्या ई- क्षेत्रात अंमलबजावणी झालेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकांसाठीच्या योजना आणि त्यांची सोप्या भाषेतली आवश्यक अशी माहिती सुनील पोटेकरांनी या पुस्तकातून अतिशय सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम केलं आहे. भारत सुपर पॉवर झाला पाहिजे आणि भारतानं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा वापर जास्तीत जास्त तळापर्यंत झाला पाहिजे, पोचला पाहिजे. लोकांसाठी, लोकांना उपयुक्त असं जे जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजेच. पण त्याच बरोबर तांत्रिकदृष्ट्या त्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, हाताळण अवघड वाटत असेल , तर त्यासाठी त्यांना तयार केलं पाहिजे. त्यांना त्याची सवय लावली पाहिजे. गरज ही शोधाची जननी म्हणतात त्याप्रमाणेच काम व्हायला हवं. मोबाईल आला आणि तो अगदी तळागाळापासून ते डोंगरकपारीपर्यंत सर्वच ठिकाणी जिथे म्हणून माणूस आहे, तिथंपर्यंत जावून पोचला…

जन्म शाळेचा

“परीक्षा तुझ्यासारख्या पोरांनी द्यायच्या नसतात. तुमची औकात तरी आहे काय रे शाळेत शिकायची. म्हणे परीक्षेला का बसून देत नाहीत.” एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला झापत होते. “पुन मना ६० % परल्न मागचे सामाईन” तो विद्यार्थी खाली मान घालून आपल्या सरांना आपली योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. “तुझ्या बापाला येऊन भेटायला सांग, त्याला सांगतो मी तुला किती मार्क पडलेत ते.....” इति मुख्याध्यापक *******************
“मास्तर येऊ का?” एक शेतकरी वेशातील माणूस उभा होता. “कोण रे तू ?” मुख्याध्यापक गरजले “मी ते बोकडवीरा गावांशी पाटील, पोराला काल निरोप दिल्ताव म्हन्गुन आलतू” तो शेतकरी म्हणाला “हं..” एखाद्या तुच्छ किड्याबरोबर बोलावे तसे ते मुख्याध्यापक बोलत होते. “तुझ्या पोराला परीक्षा द्यायची आहे तेव्हा 2 पोती तांदळाची माझ्या घरी पाठवून दे, तर तुझ्या पोराला परीक्षा देता येईल, नाहीतर नाही समजल?” “बर मास्तर, देतो पाठवून” आपल्या पोराच्या भविष्यासाठी कोणताही वादविवाद न करता त्याने ते कबुल केले. त्याच शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण महालणातल्या (महालण तालुक्यातील १२ गाव म्हणजे एक म…

मोदक

“अग प्रतिभा, इकडे बघ अशा पाकळ्या आल्या पाहिजेत मोदकाला.” सासूने आपल्या नवीन लग्न होऊन आलेल्या आणि मोदक न येणाऱ्या सुनेला फार पेशन्सली सांगितले “एक काम कर तू हा पिठाचा गोळा घे आणि माझ्यासारखा मोदक तयार करायचा प्रयत्न करत रहा.” 
“हो आई!” सुनेने खालमानेने उत्तर दिले. 
सुनेला त्या मोदकाच्या पाकळ्या जमेपर्यंत सासूचे २१ मोदक झालेले असतात. “आई, तुमचे मोदक झाले आणि मला एक पण बनवता आला नाही.” हिरमुसल्या आवाजात सुनेने वाक्य म्हटले 

“अग असुदे, पुढच्या संकष्टीला प्रयत्न कर, काय फरक पडतो.” सासूने तितक्याच स्पोर्टिंग स्पिरीट मध्ये कोणताही टोमणा न देता तिला समजावले.
अशाच तीन चार संकष्ट्या गेल्यावर “आई बघा जमला मोदक” सुनेने असेच म्हणताच, “आरे वाह! जमला ग, आता दुसरा कर” सासूने आनंदाने सांगितले. 

“प्रतिभा, मोड तो मोदक, एक जमला पण...” सासूचे वाक्य अर्धवट तोडतच सुनेने विचारले “पण काय आई?” सासूने हसतच उत्तर दिले “अग, हा मोदक बघ आणि आत्ता तू बनवलेला मोदक बघ, एक लहान एक मोठा कसे चालेल, सगळे मोदक एक सारखे दिसले पाहिजे. आणि तो मोदक फोड आणि सारण कढाईत टाक आणि ते पीठ मात्र बाजूला ठेव ते मिक्स करू नकोस.” सासूने आधीच्…

"मेरे बारेमें इतना मत सोचो, दिल मे आता हुं, समज मे नही| "

"मेरे बारेमें इतना मत सोचो, दिल मे आता हुं, समज मे नही| " आज सलमान खान चा 'किक' हा नवीन चित्रपट बघितला कथानक ठीकठाक असले तरी उत्तम सादरीकरण आणि सिनेमॅटोग्राफी असल्याने चित्रपट बघण्यालायक झालेला आहे. 
कोणत्याही गोष्टीत "किक" असल्याशिवाय काम करायचे नाही अशा Devi Lal Singh (सलमान खान) ला शेवटी "किक" लहान मुलांच्या उपचारांसाठी Devil बनून चोरी करत असतो आणि रणदीप( इन्स्पेक्टर ) शेवट पर्यंत त्याच्या मागावर असतो सलमान खान चोर आहे हे कळूनही काही करता येत नाही ...........
शेवट तर अनएक्स्पेक्टेड आहे.........

रणदीप आणि Jacqueline यांचे काम उत्तम, सलमान @ his best मला तरी चित्रपट अतिशय उत्तम वाटला आहे.

त्यात राजे नी चित्रपट बघायला येण्यासाठी नकार दिल्याने Vinita aani Amey यांच्या सोबत चित्रपट बघितला (Raj न आल्याबद्दल धन्यवाद!) आम्हा तिघांना चित्रपट enjoy करता आला . आज विनिता सोबत गेल्याने मित्र मैत्रिणीसोबत बघितलेले चित्रपट आठवले सलमान च्या प्रत्येक entry ला शिट्या action सीन ला आवाज, टाळ्या बिनधास्त करत होतो. एकूण चित्रपट आणि आजचा दिवस एकदम ग्रेट


~●๋•ηινє∂ιтα ραт…

पिनकोड ..............

मी: Hello, नमस्कार मी पुस्तकजत्रा मधून बोलते. आपण...
पलीकडून ग्राहक : हा बोला (माझे वाक्य अर्ध्यात तोडत)
मी: आपण पुस्तकजत्रावर फलाना पुस्तकाची ऑर्डर दिली होती, तर तुमचा पत्ता कन्फर्म करायचा होता 
ग्राहक: पत्ता तिकडे दिलेला आहे....
मी: आहो तोच कन्फर्म करायचा आहे. (मी पत्ता वाचून दाखवला)
ग्राहक : बरोबर आहे! 
मी: तुमचा पिनकोड सांगता का ?
ग्राहक: पिनकोड?
मी: हो कारण पिनकोड च्या जागी तुम्ही "१२३४५" असे लिहिले आहे.
ग्राहक: तुम्ही तिथे "पिनकोड" लिहायच्या ऐवजी "पोस्टकोड" लिहिले होते मला कसे कळणार, तेथे "पिनकोड" लिहायचा आहे
मी: Sorry, पिनकोड देताय न?
ग्राहक: घ्या लिहून ४१ (बाजुच्याला आवाज देत) अरे आपला पिनकोड काय आहे.
मी: इट्स ओके, मी नेट वरून घेते. Thank u
ग्राहक : आधीच नेट वरून घायचा ना! ( फोन कट करताना पलीकडून कानी पडलेला आवाज)

तेव्हा Mr. Raj Jain आता तरी तो "पोस्टकोड" शब्द बदलून "पिनकोड" करा हो कृपया!!


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ९

बऱ्याच महिन्याने पुन्हा एकदा भारतच्या इतिहासातील एक हिरा समोर आणत आहे. त्या म्हणजे जैतपूरची राणी, आपल्या इतिहासात त्यांचे नाव पण नोंदवलेले नाही. त्या म्हणजे बुंदेलखंड प्रांतातील जैतपूरचे राजा परीक्षित यांच्या पत्नी म्हणजेच जैतपूरची महाराणी जिला “जैतपूरची राणी” म्हणूनच ओळखल जातं. १८४९ सालापासून चालू असलेल्या शीत युद्धाला राणीने मूर्त स्वरूप देऊन ब्रिटीशांची पळता भुई थोडी केली. पुर्वतिहास बुंदेलखंड प्रांतातील जैतपूर हे छोटेसे संस्थान राजा परीक्षित यांच्या नेतृत्वाखाली राज्य करत होते. जैतपूर संस्थान म्हणजे बुंदेलखंड राज्याचे राजे छत्रसाल यांच्या मृत्युनंतर बुंदेलखंड राज्यातून फुटून निर्माण झालेल्या ५ छोट्या राज्यांपैकी एक होते. आणि लॉर्ड डलहौजी च्या हडपनिती अंतर्गत  ब्रिटीशांनी आपली मैत्रीची भूमिका मांडली पण राजा परीक्षित हे स्वतंत्रता प्रेमी होते व त्यांना हि मैत्रीपूर्ण नजरकैद मंजूर नव्हती पण ते कंपनीच्या तुलनेत राजेसाहेबाकडे कमी सैन्य होते याचाच फायदा लॉर्ड एलनबरो यांनी घेतला आणि २७ नोव्हेंबर १८४९ मध्ये संस्थानावर ताबा मिळविला व राजा परीक्षित यांना पळवून लावले आणि आपल्या समर्थक असलेला र…

स्वप्न कि सत्य!

काल रात्री अचानक वीज कडकडाट झाला, अगदी झोपमोड होईपर्यंत मोठा आवाज, मनात म्हटलं “राजेंची सटकली काय?” उठून बघते तर राजे झोपलेले मग हसले कोण म्हणून आजूबाजूला नजर टाकली तर एका कोपऱ्यात चित्रगुप्त उभे येऊ का म्हणून विचारात होते, थांबा जरा मीच येते नाही तर आपल्या आवाजाने राजे जागे होतील!” “हं.. बोला काय झाले इतक्या रात्री आलात, रात्रीचे २ वाजलेत तुम्हाला काही झोप वगैरे येते कि नाही?” मी सरळ चित्रगुप्तांना फैलावरच घेतले.
“Actully , एका चमत्काराबद्दल विचारायला आलो होतो.” इति चित्रगुप्त
“कसला चमत्कार?” मी जरा वैतागतच विचारले एक तर झोपमोड झाली होती.
“ज्याच्या मुळे ब्रम्हदेवाने मला show cause notice दिली, व स्वतः डोक्याला अमृतांजन चोळत बसले तो राज जैन एकदम दाढी करून वर चकचकीत कोट वगैरे घालून होता अशी बातमी नारदांनी दिली, म्हणून विचारायला आलो!”
मी सरळ कप्पाळावर हात मारून घेतला आणि म्हटलं “काय मूर्खपणा आहे, ह्यासाठी झोप मोडायची काय गरज होती, FB वर मेसेज केला असता तरी मी उत्तर दिले असते!"
“पण ब्रम्हदेवाने मला पर्सनली यायला सांगितले होते म्हणून आलो.” चित्रगुप्तांचे स्पष्टीकरण आले समोरून.
“ब्रम्हदेव…

ज्ञानामृत आणि तेही साडीबद्दल

४ जानेवारी २०१४, सक्काळी सक्काळी नवऱ्याने आवाज दिला "तयार झालिस का? आज आपल्या मनराई आणि वृत्तबद्ध वृत्ती या पुस्तकांचे प्रकाशन आहे! काय करतेस किती वेळ? "

"काय कुरकुर लावली आहे सक्काळी सक्काळी? मी तयार आहे ! तुमचीच अंघोळ होण्याची वाट बघते आहे!" इति आम्ही
"झाली माझी अंघोळ! मला काय तुझ्यासारखा वेळ नाही लागत मेक अप करायला !" असे म्हणत बेडरूममध्ये राजे प्रकट झाले
आणि "आपल्या पुस्तकांचे प्रकाशन आहे आणि तू अशी चुरगळलेली साडी नेसालीस?" हे वाक्य इतक्या जोरात होते कि आमची आईपण काय झाले म्हणून किचनमधून धावत आमच्या बेडरूममध्ये आली.

"अरे ती चुरगळलेली नाहीये, Its crush.... " माझे उत्तर पूर्ण होण्याआधी आशा प्रकारची कोणतीही साडी नसते असे "ज्ञान" पाजळण्यास सुरुवात झाली.

शेवटी कसेबसे समजावून आम्ही सासवडला रवाना झालो. तेव्हा ह्यावेळी Raj Niveditaह्यांच्या साडीवरच्या अगाध "ज्ञानाला" स्मरून ह्यावेळी कोणतीही रिस्क न घेता सरळ सिल्क साडी सिलेक्ट केलेली आहे.!!


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

आठवण

माझ्या आजीने मला (त्यावेळी ती मुंबईला राहत होती आणि आम्ही गावी म्हणजे उरणला) एक ताट दिले होते. आजी इतक्या लांबून माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली कित्ती आनंद झाला. मी त्याच दिवसापासून त्या ताटात जेवायला सुरवात केली ती लग्न होईपर्यंत कायम! पण जेव्हा माझ्या मैत्रिणीनी विचारलं कि आज्जी काय गिफ्ट घेऊन आली तेव्हा मी ताट दाखवलं तर त्यांची Reaction होती कि, “ताट? तुला आजीने ताट दिले, खेळणी, खाऊ किंवा कपडे अस काही द्यायचं सोडून ताट दिलं?” त्यांची बोलणी ऐकून मी थोडं खट्टू झाली होती

पण माझ्यासाठी आजी गिफ्ट घेऊन आली हीच महत्वाची गोष्ट आहे. आणि तिची आठवण माझ्यासोबत असणं किती मोठी गोष्ट आहे हे मला ती गेल्यानंतर कळाल.

माझ्याकडे मात्र तिने दिलेले स्टील चे ताट आहे.

माझा वाढदिवस २४ मे ला असतो त्यावेळी मला ते ताट गिफ्ट केले, त्यामुळे माझा भाऊ लगेच तिला ताट गिफ्ट केले, मलापण हवे म्हणून भांडू लागला तेव्हा आजी त्याला म्हणाली तुझा वाढदिवस २७ जूनला आहे तेव्हा मी तुला देईन, पण १९ जूनला आजी देवाघरी गेली. आणि त्यानंतर जेव्हा माझ्या भावाचा वाढदिवस आला तेव्हा म्हणाला “आज्जी मला ताट गिफ्ट देणार होती आणि त्या आधीच देवाघरी ग…

१४ जून २०००

१४ जून २०००, घड्याळात ४ चे ४:३० झाले. आता माझा रिझल्ट कोण बघणार कारण त्यावेळी इंटरनेट वर निकाल जाहीर होत नव्हते आणि ज्याचा निकाल लागणार त्याला घराचे कधीच शाळेत पाठवत नसत कारण उगीच टेन्शन नको दुसरे कोणीतरी बघून यायचे, पण माझ्यासाठी कोण जाणार? शेवटी मीच तयार झाले. आजोबांना आवाज दिला “मी जाते आहे शाळेत निकाल घेऊन येते.”
“तू जाशील ना? नीट जा काही होऊ दे किती मिळतील तेवढे मिळतील चिंता करू नकोस.” असे म्हणून मला पाठवले.

मी अगदी झाशीच्या राणीच्या थाटात मी कोणाला घाबरत नाही (तस आजही मी कोणाला घाबरत नाही!) अशा अविर्भावात शाळेत दाखल झाले. पण आतून पुरती घाबरलेली होते कारण वर्गातील कोणीच दिसत नव्हते, कोणाचा भाऊ, बहिण, काका ई. लोक आले होते.  मी माझे हॉल तिकीट दाखवून रिझल्ट मागून घेतला. बघितला तर हुश्श! मी पास आले होते ५४% ने! घरी गेले.

आजोबा माझी वाटच बघत बसले होते मला बघताच म्हणाले “आलीस! किती पडले?” ( नशीब मी पास होणार हे गृहीत धरले होते, नाहीतर माझ्या मोठ्या वाहिनिसारख नाही केले, नववीत असताना वाहिनीने प्रश्न केला होता “ताई, तुमचे किती विषय गेले? मी ऑन द स्पॉट आउट! पास कि नापास पण नाही? सरळ किती व…