Posts

Showing posts from December, 2014

श्रीकबीरदर्शन

श्रीकबीरदर्शन - लेखक - डॉ. विजय बाणकर,  पृष्ठ संख्या - १६६,  मूळ किंमत - १६०/-  प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये १२० /- रू.  (उपलब्ध - १२/०१/२०१५ रोजी) आजच आपली प्रत नोंदवून ठेवा! वर्ण, जात, पंथ वगैरे संकुचित देहनिष्ठ भावांच्या पलीकडे जाऊन ते अविभक्तपणें स्वरूपनिष्ठ जीवन जगत होते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना विचारल्या गेलेल्या नेहमीच्या प्रश्नांची त्यांनी दिलेली पुढील पारमार्थिक उत्तरे होय : एके दिवशी एका वनातून जात असता दुपारी ते एका झोपडीत गेले. तिथे रहात असलेल्या वीस-एक वर्षाच्या मुलीने त्यांना विचारले  -
    प्रश्न  :  आपण कोण बरे?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमची जात?     
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचा पंथ / संप्रदाय?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचे नांव?
    उत्तर  : कबीर.
या एकशब्दीं उत्तरांनी विस्मित होऊन ती मुलगी उद्गारते, ‘मी अनेक साधू पाहिले पण अशाप्रकारे उत्तरे देणारा मात्र आजपर्यंत कुणी भेटला नाही.   ‘दि मोस्ट ब्युटिफूल नेम्स म्हणून अल्लाची जी ९९ नावे जपली जातात त्यापैकी ‘अल् कबीर' हे एक विशेष नाम होय. कबीर म्हणजे  श्रेष्ठ, ग्रेट, उत्कृष्ट व…