Posts

Showing posts from November, 2011

मराठेशाहीतील मनस्विनी

पुस्तक:  मराठेशाहीतील मनस्विनी लेखक:  डॉ. सु. र. देशपांडे प्रकाशक:  मेहता पब्लिशिंग हाउस  आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपल्या कर्तृत्वावर जोरावर भरारी घेताना दिसतात. स्त्रीमुक्ती कडे वाटचाल करणारी, आजच्या म्हणजे आधुनिक काळातील स्त्री ही अधिक धीट, अधिक स्वतंत्र, अधिक व्यापक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारणारी आहे. आजच्या स्त्रीचे हे धडाडीचे व्यक्तिमत्त्व आपण आज कौतुकाने स्वीकारतो. पण अशाच धडाडीच्या, शूर आणि कर्तुत्ववान स्त्रिया तीनशे – चारशे वर्षापूर्वी ही होत्या. कट्टर पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील या स्त्रिया प्रवाह विरुद्ध जाण्याची धडाडी ठेवत. इतिहास शिकण्याच्या निमित्ताने ह्या स्त्रियांचा परिचय आपल्याला झाला असला तरी त्यांचे मूळ जीवनचरित्र माहिती नसल्याने त्यांच्या विषयी निर्माण झालेले प्रवाद आणि त्यांच्या कामगिऱ्याच स्मरणात राहतात. राजघराण्यातील स्त्रिया म्हणजे नाजूक, परावलंबी असतात. महालापलीकडे त्यांचे जग नसते असा सर्वसाधारण गैरसमज असलेला दिसून येतो, पण मराठेशाहीतील काही स्त्रिया आपल्या वैध हक्कासाठी, कर्तव्यासाठी, मुलांसाठी, स्व