Posts

Showing posts from October, 2013

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

Image
पुस्तक:  चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक:  मारुती चित्तमपल्ली प्रकाशक:  मौज प्रकाशन गृह  परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवली त्यात मारुती चित्तमपल्ली चकवाचांदण हि होते, पुस्तके मिळताच त्यांनी चकवाचांदण बरेच दिवस शोधात होतो आता मिळाले अशा आशयाची पोस्ट फेसबुक वर टाकली त्यावेळी सर्वांचे लाडके मामाश्री व अमेयदा यांच्याशी झालेल्या बोलण्यामुळे वाटून गेले कि आपण चकवाचांदण वर लिहावे खरे तर मी खूप आधी हे पुस्तक वाचले होते, त्यावर लिहूनही ठेवले होते पण ते प्रकाशित केले नव्हते J आज अमेयदामुळे ती जुनी वही काढून लिहिते आहे...... पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत.   त्याच व्यसनामुळे आजपर्यंत बरीच पुस्तके वाचनात आली, त्यातली काही मनाला भावली, काहींनी तर मनात घरच करून ठेवले, अशाच काही पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणजे “चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद”. हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा वाटले होते कि त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे वन्यजीवनावर आधारित असेल पण वाचताना हळू हळू लक्षात येऊ लागले कि   हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे. ह्या पुस्तकात पहिल्या १२३ पानापर्