Posts

Showing posts from July, 2013

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ 8

मागील भाग २०१० जुलै मध्ये " सन १८५७ च्या वीर महिला" हि मालिका लिहायला सुरुवात केली आजही ती अपूर्ण आहे. आज त्यात एका नावाची भर पडली आहे ते नाव म्हणजे "राणी द्रोपदी बाई"!! राणी द्रौपदी म्हटले कि आपल्याला महाभारत आठवते पण हा लेख वाचाल्यावर तुम्हा महाभारता बरोबर १८५७ चे स्वातंत्र्यसमर हि आठवेल. २२ मे १८५७ ते ३० ऑक्टोबर १८५७ ह्या ५ ते ६ महिन्याच्या काळात ह्या राणीने ब्रिटिशानां घाम फोडला होता!!! धारच पुर्वैतिहास धार हे १८५७ च्या युद्धातले एक महत्वपूर्ण ठाणे होतं. २२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला. त्यातून संस्थानाचा उगम झाला. मराठ्यात महत्वाच्या ठरलेल्या शिंदे- होळकर- पवार ह्या त्रयी पैकी हे पवारांच घराणे. स. १८१७ त इंग्रज जेव्हां पेंढाऱ्याच्या उच्छेदाकरितां माळव्यांत शिरले तेव्हां पवारांच्या ताब्यांत केवळ धार शहरच होतें पुढें इंग्रजांचा व धारकर यांचा तह होऊन इंग्रजांनीं राज्याचें रक्षण करण्याचें काम पत्करून ३५ हजार वसुलाचा मुलुखहि मिळवून दिला. त्यानंतर १८१९ मध्ये भिल्ल पलटणी ठेवायची इच्छ