Posts

Showing posts from September, 2014

What an idea sirji!!!

ऐन गणपतीत आजारी पडल्याने गौरी साठी माहेरी येणे झालेच नव्हते. तेव्हा म्हटले आता बरे वाटत आहे माहेरी जाऊन यावे. यावेळी मुहूर्त निघाला तो संकष्टीचा, भाद्रपदातली संकष्टी म्हणजे साखर संकष्टी आमच्याकडे हिला साखर चौथ असे हि म्हणतात. ह्या साखर चौथीला हि आमच्या भागात गणपती बसतात. मामाकडे गणपती  बसत असल्याने माझ्या माहेरी येण्याच्या मुहूर्ताचा फायदा झाला, श्रींचे दर्शन हि झाले आहे सगळ्यांची भेटही झाली. साहजिकच आहे भेट झाली म्हणजे गप्पा होणार आठवणी उजळल्या जाणार अशीच एक गावातील मामांची आठवण निघाली आणि आम्ही खरच म्हणावे लागले What an idea sirji!!!

गणपती घरी येणार म्हटले कि सजावट आलीच सजावट म्हणजे मखर बनवण्यासाठी थर्माकोलचा प्रामुख्याने वापर आणि गणेश या मखरात विराजमान झाले कि अखंड जळणाऱ्या समया आणि अगरबत्ती. पूर्वी लहान अगरबत्ती यायची त्यामुळे कोणाला न कोणाला सतत तेथे राहावे लागायाचे मग कुणीतरी अक्कल वापरून मोठ्या अगरबत्त्या मार्केट मध्ये आणल्या त्यावेळी त्या खूप महाग असल्याने रात्रीच लावल्या जायच्या आपण झोपल्यावर देखील अगरबत्ती चालू राहावी हा उद्देश.
पण अशा अगरबत्त्या म्हणजे थर्माकोलच्या मखराला धोक…

महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

पुस्तकाचे नाव - महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स

लेखकाचे नाव - सुनील पोटेकर

प्रकाशक - शब्दांजली प्रकाशन -पुणे. (संपर्क - ९२७०१०८०८०)
किंमत - रु.१२० /-

महाराष्ट्र ई-गर्व्हनन्स या पोर्टलवर ‘ई-संस्कृती' या सदरात सुनीलचे महाराष्ट्र राज्यातल्या ई- क्षेत्रात अंमलबजावणी झालेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकांसाठीच्या योजना आणि त्यांची सोप्या भाषेतली आवश्यक अशी माहिती सुनील पोटेकरांनी या पुस्तकातून अतिशय सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम केलं आहे. भारत सुपर पॉवर झाला पाहिजे आणि भारतानं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हा वापर जास्तीत जास्त तळापर्यंत झाला पाहिजे, पोचला पाहिजे. लोकांसाठी, लोकांना उपयुक्त असं जे जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजेच. पण त्याच बरोबर तांत्रिकदृष्ट्या त्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरणं, हाताळण अवघड वाटत असेल , तर त्यासाठी त्यांना तयार केलं पाहिजे. त्यांना त्याची सवय लावली पाहिजे. गरज ही शोधाची जननी म्हणतात त्याप्रमाणेच काम व्हायला हवं. मोबाईल आला आणि तो अगदी तळागाळापासून ते डोंगरकपारीपर्यंत सर्वच ठिकाणी जिथे म्हणून माणूस आहे, तिथंपर्यंत जावून पोचला…

जन्म शाळेचा

“परीक्षा तुझ्यासारख्या पोरांनी द्यायच्या नसतात. तुमची औकात तरी आहे काय रे शाळेत शिकायची. म्हणे परीक्षेला का बसून देत नाहीत.” एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक आपल्या शाळेतील विद्यार्थ्याला झापत होते. “पुन मना ६० % परल्न मागचे सामाईन” तो विद्यार्थी खाली मान घालून आपल्या सरांना आपली योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. “तुझ्या बापाला येऊन भेटायला सांग, त्याला सांगतो मी तुला किती मार्क पडलेत ते.....” इति मुख्याध्यापक *******************
“मास्तर येऊ का?” एक शेतकरी वेशातील माणूस उभा होता. “कोण रे तू ?” मुख्याध्यापक गरजले “मी ते बोकडवीरा गावांशी पाटील, पोराला काल निरोप दिल्ताव म्हन्गुन आलतू” तो शेतकरी म्हणाला “हं..” एखाद्या तुच्छ किड्याबरोबर बोलावे तसे ते मुख्याध्यापक बोलत होते. “तुझ्या पोराला परीक्षा द्यायची आहे तेव्हा 2 पोती तांदळाची माझ्या घरी पाठवून दे, तर तुझ्या पोराला परीक्षा देता येईल, नाहीतर नाही समजल?” “बर मास्तर, देतो पाठवून” आपल्या पोराच्या भविष्यासाठी कोणताही वादविवाद न करता त्याने ते कबुल केले. त्याच शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण महालणातल्या (महालण तालुक्यातील १२ गाव म्हणजे एक म…