Posts

Showing posts from September, 2012

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ७

मागील भाग

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ७

१८५७ चा स्वातंत्र्यसंग्रामाला प्रकाशित करणारी आणखी एक ज्योत म्हणजे तुलासीपूरची राणी ईश्वरी कुमारी देवी. तुलसीपूरहे अवध या प्रांताच्या शेजारी व नेपाळ च्या सीमेवरील एक राज्य होते. आज तुलसीपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील एक तालुका असून या तुलसीपूर तालुक्याची उत्तर सीमा नेपाळ शासित प्रदेश आहे व दक्षिण बाजू भारत शासित प्रदेश आहे. नेपाळ शासना अंतर्गत येणार्या या प्रदेशाला “तुलासीपूर/ डांग” म्हणून ओळखले जाते व भारत शासित प्रदेशाला “तुलसीपूर परगणा” म्हणून ओळखले जाते. १८५७ च्या काळात हे हिंदुस्थानात समाविष्ठ होते राणी ईश्वरी कुमारी देवी यांचा पूर्ववृत्तांत तुलसीपूरराज्याचा ४४ वा राजा दृग नारायण सिंह ह्याना ही इतर राजांप्रमाणे ब्रिटिशांच्या कडून खलिता गेला की त्यांच्या राज्यात सामील व्हा. त्यावेळी राजा दृग नारायण सिंग यांनी विरोध दर्शविला. इस्ट इंडिया कंपनीचे मांडलिकत्व स्वीकारायला दिलेला नकार व वेळोवेळी क्रांतीकार्याना केलीली मदत याच्या विरोधात ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर कारवाही करून त्यांना व त्यांचे वडील लखनऊ येथे …