Posts

Showing posts from October, 2011

डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक

पुस्तक:  डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक लेखक:  अ‍ॅन फ्रँक, मंगला निगुडकर प्रकाशक:  मेहता प्रकाशन आज कितीतरी दिवसांनी मनाला भिडणारे पुस्तक वाचले. “ मंगला निगुडकर यांनी अनुवादित केलेले “डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक” हे पुस्तक मार्च १९८८ ला प्रथम प्रसिद्ध करण्यात आले. प्रत्यक्षात हि डायरी “Het Achterhuis” १९४७ साली डच भाषेत तर १९५२ साली इंग्रजी भाषेत “अ‍ॅन फ्रँक – द डायरी ऑफ ए यंग गर्ल” या नावाने प्रकाशित झाले नंतर ते इतके गाजले कि, जवळ-जवळ प्रत्येक भाषेत त्याची भाषांतरे झाली आहेत. असे काय आहे ह्या डायरीत? असा तुम्हाला प्रश्न पडेल. मलाही पडला. पुस्तक वाचायला लागल्यावर अगदी मग्न झाले. अ‍ॅन फ्रँक हि हॉलंड मध्ये राहणारी १२ वर्षाची मुलगी होती. तिने आपल्या या डायरीचे नाव “किटी” ठेवले होते. १४ जून १९४२ ते १ ऑगस्ट १९४४ या २ वर्षाच्या काळात तिने डायरीमध्ये जे उतरवले आहे ते या पुस्तकात दिले आहे. त्यानंतर तिने डायरी लिहिणे बंद केले का ?? नाही! पण १ ऑगस्ट १९४४ रोजी तिने जे डायरीत लिहिले ते तिचे शेवटचे लिखाण होते. कारण ४ ऑगस्टला तिच्या संपूर्ण कुटुंबाला जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्या नाझी सैनिकांनी पकडले. अ‍ॅन फ्रँक च…