Posts

Showing posts from November, 2014

टर्मिनस- अस्वस्थ करणार्‍या ताज्या गूढकथा

मराठी ललित साहित्याला विशेषत: कथा-कादंबर्‍यांच्या प्रांतात थोडी मरगळ आलेली आहे की काय अशी वाटणारी आजची परिस्थिती.  त्यातच गूढकथा-विज्ञानकथा आदी आधीच दुर्लक्षित  साहित्यप्रकारांमध्ये लेखणी आजमावणारे नवोदित लेखक सापडणं दुर्मिळच. अशा काळात  अभिषेक अनिल वाघमारे या नवोदित लेखकाने आपल्या ‘टर्मिनस’ या पहिल्याच कथासंग्रहाद्वारे गूढकथांच्या या प्रांतात दमदार पाऊल टाकले आहे.       हा कथासंग्रह छोटेखानीच असला तरी त्यातील एकंदर दहा कथा या परस्परांपासून वेगळ्या आहेत. येथे सरसकट सगळ्या कथांना गूढकथा जरी म्हटलं असलं तरी त्या रूढार्थाने तशा नाहीत.  उदा. ‘सर्किट’ व ‘पाऊलखुणा’ या विज्ञानकथा या सदरातही मोडू शकतात. तर,‘ऑब्जेक्ट्स इन द मिरर...’,‘खोळ’ यासारख्या कथांना एक सामाजिक अंग देखील आहे. ‘चूक ?’ आणि ‘टर्मिनस’ या कथा तत्वज्ञानाचे चिंतन करणार्‍या आहेत तर ‘सुरकुत्या’,‘ काचेचे ग्लास’ या कथा कुटुंबकथेच्या वाटेने जाणार्‍या गूढकथा आहेत.
      शैलीदार लेखन कमी झाल्याच्या काळात वाघमारे स्वत:ची वेगळी शैली निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. मांडणीतील सुटसुटीतपणा, एक मिष्किल विनोदाचा ‘अंडरकरंट’,मध्येच पेरलेली चमकदा…