स्वप्न कि सत्य!

काल रात्री अचानक वीज कडकडाट झाला, अगदी झोपमोड होईपर्यंत मोठा आवाज, मनात म्हटलं “राजेंची सटकली काय?” उठून बघते तर राजे झोपलेले मग हसले कोण म्हणून आजूबाजूला नजर टाकली तर एका कोपऱ्यात चित्रगुप्त उभे येऊ का म्हणून विचारात होते, थांबा जरा मीच येते नाही तर आपल्या आवाजाने राजे जागे होतील!” “हं.. बोला काय झाले इतक्या रात्री आलात, रात्रीचे २ वाजलेत तुम्हाला काही झोप वगैरे येते कि नाही?” मी सरळ चित्रगुप्तांना फैलावरच घेतले.

Actully , एका चमत्काराबद्दल विचारायला आलो होतो.” इति चित्रगुप्त

“कसला चमत्कार?” मी जरा वैतागतच विचारले एक तर झोपमोड झाली होती.

“ज्याच्या मुळे ब्रम्हदेवाने मला show cause notice दिली, व स्वतः डोक्याला अमृतांजन चोळत बसले तो राज जैन एकदम दाढी करून वर चकचकीत कोट वगैरे घालून होता अशी बातमी नारदांनी दिली, म्हणून विचारायला आलो!”

मी सरळ कप्पाळावर हात मारून घेतला आणि म्हटलं “काय मूर्खपणा आहे, ह्यासाठी झोप मोडायची काय गरज होती, FB वर मेसेज केला असता तरी मी उत्तर दिले असते!"

“पण ब्रम्हदेवाने मला पर्सनली यायला सांगितले होते म्हणून आलो.” चित्रगुप्तांचे स्पष्टीकरण आले समोरून.

“ब्रम्हदेवाचे नाव काढू नका,” माझ्या तोंडाचा पट्टा चालू झाला. “ब्रम्हदेव I hate him, मला म्हणे तुला आता एक Challenge देतो, आणि मी राज जैन ह्यांच्याबरोबर लग्न करावे अशी परिस्थिती निर्माण केली, यथावकाश आमचे लग्न देखील झाले आणि आज पाठवतायेत तुम्हाला बातमी काढायला! असो पण चित्रगुप्त काका, खर सांगू का? मला Challenge देण्याच्या नावाखाली ब्रम्हदेव आजोबांनी मस्त चल खेळली आणि माझ्यासारखे Torture त्याच्या गळ्यात मारले. पण ठीक आहे; आजोबांना त्यांचा राग काढायचा होता ना! असो, आता कालच्या कार्यक्रमाविषयी, काल जे काही पाहिलेत तो चमत्कार नव्हता, ते सत्य होत, त्याच कारण म्हणजे साध सरळ आहे. कि त्याला तो काय करतो आणि काय करायला हवे याची त्याला जाणीव आहे....”

“.... त्याला आणि जाणीव.... Are you in your sense?” माझे बोलणे अर्धवट तोडत चित्रगुप्त तुच्छतापूर्ण सुरु झाले.
एक मोठा सुस्कारा सोडला आणि म्हणाले आहो काका ऐकून तर घ्या, “तुम्ही सगळ्यांनी त्याला एकाच फुटपट्टीत मोजण्याचा प्रयत्न केलात, आजूबाजूच्या मुलांबरोबर त्याला Compare करत बसलात पण त्यावेळी  तुमच्या हे लक्षात आले नाही कि तो वेगळा आणि extra talented आजूबाजूच्या मुलांपेक्षा.....” ह्यावर काकांनी फक्त मान डोलावली आणि मी पुढे माझे प्रवचन चालू ठेवले .... “काका ह्या अडीच वर्षाच्या काळात मी जे त्याला ओळखला आहे ते तुम्हाला त्याचा भाग्य लिहून पण कळाल नाही कि तो कसा आहे ह्याच वाईट वाटत बघा, कारण माझ्यासारख्या arrogant,  खडूस, Short tempered, मुलगी सांभाळणे मज्जा आहे काय?”

“त्याला शिक्षा व्हावी म्हणून तुझ्याशी लग्न लावून दिले आहे. बाळा!” काका मध्येच बडबडले.

पण त्यांना तिथेच थांबवत मी पुन्हा सुरु झाले, “ ब्रम्हदेवाने काय केले ते महत्वाचे नाही इथे आपण राज बद्दल बोलत आहोत, गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मी त्याची अनेक रूपे बघितली आहेत, ‘तुला काही लक्षातच राहत नाही, सारखा मोबाईल विसरत असतेस’ असे म्हणत तो टिपिकल नवऱ्यासारखा वागतो, तर “Dont Worry! तू करशील बरोबर प्रास्ताविक!” असे म्हणत माझ्या मित्राची भूमिका हि सहजपणे पडतो, तर कधी माझा प्रियकर म्हणून समोर येतो तर कधी माझ्या वडिलांसारखा पण वागतो, प्रत्येक क्षणाला सोबत असतो, तो अतिशय संवेदनशील, कवी मनाचा आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न केला म्हणून तो तुम्हाला समजला नाही, त्याला मोकळा सोडा, तो अपोआप सगळ समजून घेतो, पण जर त्याला बंधनात, नियमात बांधायला गेलात तर मग तुमची साडेसाती चालू करेल! हेच गमक आहे कालच्या कार्यक्रमात तो इतका चकचकीत आणि अत्माविश्वाने वावरत होता, इथेही त्याने स्वतः पुढे न येता मला पाठवले. मी समोर असले तर Back stage ला राहून सगळ शांतपणे manage करत होता. सो आता ब्रम्हदेव आजोबांना जाऊन सांगा अमृतांजनच्या कंपनीला ऑर्डर देऊन ठेवा, कारण आम्ही दोघ एकमेकांच्या साथीने धुडगूस घालणार आहोत. Get ready!!”

इतक्यात राजेंनी आवाज दिला “काय बडबडते आहेस झोपेत? झोप शांतपणे उगीच कुरकुर करू नकोस, झोपेत कुरकुर करत असते”


“कुरकुर? आणि माझी?” असे बडबडत मी घड्याळाकडे बघितले तर सकाळचे ४ वाजले होते, आयला हे चित्रगुप्त काका झोपेचे २ तास खाऊन गेले.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐
 ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................