Thursday, June 19, 2014

आठवण


माझ्या आजीने मला (त्यावेळी ती मुंबईला राहत होती आणि आम्ही गावी म्हणजे उरणला) एक ताट दिले होते. आजी इतक्या लांबून माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली कित्ती आनंद झाला. मी त्याच दिवसापासून त्या ताटात जेवायला सुरवात केली ती लग्न होईपर्यंत कायम! पण जेव्हा माझ्या मैत्रिणीनी विचारलं कि आज्जी काय गिफ्ट घेऊन आली तेव्हा मी ताट दाखवलं तर त्यांची Reaction होती कि, “ताट? तुला आजीने ताट दिले, खेळणी, खाऊ किंवा कपडे अस काही द्यायचं सोडून ताट दिलं?” त्यांची बोलणी ऐकून मी थोडं खट्टू झाली होती

पण माझ्यासाठी आजी गिफ्ट घेऊन आली हीच महत्वाची गोष्ट आहे. आणि तिची आठवण माझ्यासोबत असणं किती मोठी गोष्ट आहे हे मला ती गेल्यानंतर कळाल.

माझ्याकडे मात्र तिने दिलेले स्टील चे ताट आहे.

माझा वाढदिवस २४ मे ला असतो त्यावेळी मला ते ताट गिफ्ट केले, त्यामुळे माझा भाऊ लगेच तिला ताट गिफ्ट केले, मलापण हवे म्हणून भांडू लागला तेव्हा आजी त्याला म्हणाली तुझा वाढदिवस २७ जूनला आहे तेव्हा मी तुला देईन, पण १९ जूनला आजी देवाघरी गेली. आणि त्यानंतर जेव्हा माझ्या भावाचा वाढदिवस आला तेव्हा म्हणाला “आज्जी मला ताट गिफ्ट देणार होती आणि त्या आधीच देवाघरी गेली.”

तिची हि आठवण आता माहेरी आहे पुढल्या वेळी गेली कि माझे ताट आईकडून घेऊन यायला हवे. आजीची शेवटची आठवण आहे माझ्याकडे

19 जून १९९२ ते आज २०१४ आठवण येतेच! Miss u आजी तू लवकर का गेलीस?





~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

No comments:

Post a Comment