सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ९

 बऱ्याच महिन्याने पुन्हा एकदा भारतच्या इतिहासातील एक हिरा समोर आणत आहे. त्या म्हणजे जैतपूरची राणी, आपल्या इतिहासात त्यांचे नाव पण नोंदवलेले नाही. त्या म्हणजे  बुंदेलखंड प्रांतातील जैतपूरचे राजा परीक्षित यांच्या पत्नी म्हणजेच जैतपूरची महाराणी जिला “जैतपूरची राणी” म्हणूनच ओळखल जातं. १८४९ सालापासून चालू असलेल्या शीत युद्धाला राणीने मूर्त स्वरूप देऊन ब्रिटीशांची पळता भुई थोडी केली.
पुर्वतिहास
बुंदेलखंड प्रांतातील जैतपूर हे छोटेसे संस्थान राजा परीक्षित यांच्या नेतृत्वाखाली राज्य करत होते. जैतपूर संस्थान म्हणजे बुंदेलखंड राज्याचे राजे छत्रसाल यांच्या मृत्युनंतर बुंदेलखंड राज्यातून फुटून निर्माण झालेल्या ५ छोट्या राज्यांपैकी एक होते. आणि लॉर्ड डलहौजी च्या हडपनिती अंतर्गत  ब्रिटीशांनी आपली मैत्रीची भूमिका मांडली पण राजा परीक्षित हे स्वतंत्रता प्रेमी होते व त्यांना हि मैत्रीपूर्ण नजरकैद मंजूर नव्हती पण ते कंपनीच्या तुलनेत राजेसाहेबाकडे कमी सैन्य होते याचाच फायदा लॉर्ड एलनबरो  यांनी घेतला आणि २७ नोव्हेंबर १८४९ मध्ये संस्थानावर ताबा मिळविला व राजा परीक्षित यांना पळवून लावले आणि आपल्या समर्थक असलेला राजा सामंत यांचा राज्याभिषेक केला. आपली हार झाली व एका फितुराचा राज्याभिषेक करण्यात आला हे गोष्ट सहन न होऊन राजा परीक्षित यांचा मृत्यू झाला.
संग्राम
राजा परीक्षित यांच्या मृत्युनंतर सारी सूत्रे त्यांच्या पत्नीने आपल्या ताब्यात घेतली, त्याच वेळी राणीला ब्रिटीशांकडून शरणागती पत्करण्यासाठी खलिते येऊ लागले होते, राणीने त्या खलित्यांना भीक घातली नाही. प्रत्यक्षात तिने शरणागती पत्करली नसली तरी ति शांत झाली होती. ब्रिटीशांना आपल्या प्रांतातून उखडून टाकण्यासाठी ति फौजा गोळा करत होती  शाहगढ प्रांतामध्ये तिला आश्रय मिळाला. तिने आपल्यासाठी तर फौजा गोळा करत असतानाच तिने ब्रिटीशांच्या विरोधात छोट्या –मोठ्या कारवाया चालूच ठेवल्या होत्या. शाहगढ, बानपूर सारख्या प्रांतात तिने ब्रिटीशांच्या विरोधात क्रांती ज्योत पेटवली. तसेच जैतपूर भागातील इतर ठाकूर राजपूत यांच्यात हि तिने क्रांतीज्योत पेटवण्याचे कार्य चालू ठेवले तोपर्यंत इकडे स्वतंत्र संग्रामाचे लोण पोहोचले.

प्रत्यक्ष संग्रामाची सुरुवात
 १९ जुलै १८५७ रोजी राणी ने स्थानिक ठाकुरांच्या मदतीने ब्रिटीशांनी ताबा मिळवलेल्या आपल्याच राज्यावर हल्ला केला, जैतपूरच्या ब्रिटीशांनी घोषित केलेल्या राजाचे धाबे दणाणले, पण कर्नल Liddell याने युद्धाची बाजू सांभाळली.
आपल्या तयार केलेल्या फौजेसह राणीने दोन महिने कडवी झुंज देत, राणीच्या मदतीला मावा, बानपुर आणि शाहगढ़ इथले राजेही आले आणि  कर्नलला पळवून लावले जैतपूर वर पुन्हा एकदा ताबा मिळविला, तसेच तेथील तहसीलदाराच्या कार्यालयावर व तेथील खजिन्यावर ताबा मिळविला. परंतु ब्रिटीशांनी हि हार सहजासहजी पत्करली नाही, जनरल Withlobk आणि ब्रिगेडियर Munsey यांनी पुन्हा एकदा ताज्या दमाच्या सैनिकांसह १० ऑक्टोबर १८५७ रोजी जैतपूरवर हल्ला केला.
राणीने माघार न घेता आपली झुंज चालू ठेवली, एक स्त्री निकराने ब्रिटीशांबरोबर लढत होती पण फितुरीचा शाप पाचवीलाच पुजलेला असल्याने, सामंत तसेच चरखेरीचे राजा यांनी आपले संस्थान ब्रिटीशांचे असलेले मैत्रीपूर्ण संबध कायम राहावे म्हणून राणीची बाहेरच्या संस्थानकडून येणारी रसद तोडली तसेच राणीबरोबर युद्ध हि चालू केले सर्वच आघाड्यांवर लढावे लागत असल्याने अखेर राणीची पीछेहाट होऊ लागली, तिला जैतपूर सोडून पळून जावे लागले. ति टिहरी ठाण्याच्या दिशेने निघाली परंतु ब्रिटीश सैन्याने तिला पकडले व तिला आजन्म कारावासाची शिक्षा दिली. परंतु राणी फार काळ त्या कारावासात राहिली नाही पकडले गेल्यानंतर लगेच ४ महिन्यात तिला मृत्यू आला.

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!