Sunday, March 13, 2011

Untitled

दिवसभराच्या धावपळीत अनेक प्रसंग येतात. म्हटले तर सगळेच नोट करण्यासारखे असतात म्हटले तर नाही देखील. असचे काही छोटे प्रसंग जे गेल्या दोन दिवसात घडले ते येथे देते आहे.

प्रसंग पहिला : 

शुक्रवार दिनांक ११-०३-२०११, मार्च एंडिंग असल्याने नेहमी पेक्षा अधिक काम, त्यामुळे निघायला उशीर झाला रात्रीचे ७:४५ झाले होते ८ ची ३१ नंबर ची बस पकडण्याची धावपळ कारण त्या नंतरच्या बस चा भरोसा नाही किती वाजता येईल. त्यामुळे घाईतच. अशातच डेपो जवळच्या सिग्नल जवळ पोहोचली असता एक काकू थोड्याश्या चिंताग्रस्त दिसल्या, मी त्यांच्याकडे बघितले पण बस पकडण्याच्या धावपळीत असल्याने दुर्लक्ष केले आणि डेपोच्या दिशेला निघाले, इतक्यात पाठून आवाज आला "बेटा सुनो" मी टर्न मारून बघितले, तर त्या काकुनी मला हाक मारली इतक्यात त्यांना खोखाल्याची उबळ आली त्याही परिस्थितीत त्यांनी मला विचारले "बेटा डेपो किधर है!" नीट बोलता हि येईना मला पण थोडी काळजीच वाटली कि काय झाले. म्हणून मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना विचारले "आंटी आप ठीक हो ना? " आणि त्यांना बरे वाटे पर्यंत मी त्यांच्या पाठीवर हात फिरवला, आणि बोलली "आंटी आप इधर आओ डेपो इस साईड है." डेपो च्या बाहेर मस्त बसायची व्यवस्था आहे तिकडे मी त्यांना बोलली "आंटी आप यहा बैठो मी पानी लाती हू! " कारण नेहमीच्या सवयीने माझ्या बॅग मध्ये पाणी नव्हते पण दोनच मिनिटात त्या नॉर्मल झाल्या आणि मला बोलल्या "बेटा थॅंक्स, अच्छा लागा , पाणी कि कोई जरुरत नाही है." आणि डेपोच्या दिशेने हात दाखवून म्हणाल्या "डेपो इसी साईड है ना." मी होकारार्थी मान हलवत "जी आंटी" म्हटले. तश्या त्या चालत माझ्या पुढे निघून गेल्या. आणि मी भानावर आली. आई शपथ! माझी बस म्हणून मग मी भराभर चालू लागले तर त्या काकू पनवेल बस च्या स्टॉपला थांबलेल्या मला दिसल्या. मी तिथून पास होत असताना त्यांनी मला एक स्माइल दिली. तिकडून मग मी माझ्या बस स्टॉपवर आली. 
मला फक्त एकाच प्रश्न पडला होता आपुलकी ने भरलेलं "आंटी आप ठीक हो ना? " हे वाक्य इतका काम करून गेला असेल का ? 

प्रसंग दुसरा: 
शनिवार दिनांक १२-०३-२०११ दुपारचे २:३० झाले असतील मला दादर ला एका मित्राला भेटायला जायचे होते म्हणून मी घाईतच ऑफीस मधून निघाले. स्टेशन जवळ आल्यावर वाटले अरे यार मी इतक्या घाईत निघाले थोडं फ्रेश तरी व्हायला हव होत म्हणून मी जवळच असलेल्या इरोर्बीट मॉल मध्ये गेले. वाश्रूम शोधून त्यात गेले. थोडं चेहऱ्यावर पाणी मारलं, इतक्यात एक छोटी मुलगी माझ्या बाजूला उभी राहिली मी तिला एक स्माइल दिली तसा तिने हि मला एक रिटर्न स्माइल दिली. मी मग मी तिकडे असलेल्या बेंच वर येऊन बसली आणि आपले तोंड पुसत असतानाच ती मुलगी परत माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. तसं मग मी तिला स्माइल देत खुणेनेच विचारले काय झाले तर ती " कुछ नाही" असा म्हणाली. इतक्यात तिच्या आईने तिला आवाज दिला "सिद्धी" ती बिच्चारी पळत आईकडे गेली आणि तिच्या मातोश्रिनी मला एक मस्त लुक दिला जणू मी काही लहान मूलना चोरून नेणर्‍या टोळीची सदस्य आहे. मी स्वताला म्हटलं मॅडम आटपा आणि पाला इथून नाही तर मातोश्री आपली धुलाई करायच्या.

इकडे मला प्रश्न पडला कि माणसाच्या माणसावर विश्वास आहे कि नाही ?


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

4 comments: