Friday, January 28, 2011

एक उनाड दिवस


मराठी buzz मंडळाने celebrate केलेला एक उनाड दिवस 
We @ Shivaji Park 

Cut the cake for new era start of friendship 
Band of Boys

ha khel savalyancha 

Sweet girls of Marathi buzz mandal 

we in frame 

We in frame 
Me & Kalpi vaghachya jabadyat :) 

Celebration @ dadar chaoupati 

Fun continues @ dadar choupati 
Me @ shivaji park 

we gonna take the Bottle of Pepsi :)


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, January 18, 2011

हुरहूर………………………………..४

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!


हुरहूर..............................१






रिक्षावाल्याला  depo जवळ  riksha थांबवायला  सानिग्तली. bye म्हणून ती जशी निघाली तसा त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला म्हणाला नीट जा पोहोचलीस कि मला काल कर आणि हात सोडला. तसं रिक्षा स्टेशन  च्या दिशेने निघाली.
*************************************************************************************************************
तिने त्याला  bye करायला  हात  हलवला  तसं  तिचा  हात  भिंतीवर  आपटला , ती  हळूच  ओरडली  आई  गं ! बघते  तर  काय  ती  वेडू  स्वताच्या  बेड  वर  पडून  होती  पण  त्याच्या  आठवणीत  ती  इतकी  हरवली  कि  त्याला  बेड  वरूनच  बये  करत  होती , तिचा  bed भिंती  जवळ  असल्याने  हात  भिंतीवर  आपटला  होता. ती  आपला  हात  चोळत  उठली  आणि  भिंतीला  पाठ  टेकवून  बसली. उशीजवळ  charging ला  लावलेला  cell तिने  घेतला  व  त्यावर  MP 3 Player चालू  करून  आपल्या  आवडीची  गझल  लावली. “होटो  से  छुलो  तुम  मेरे  गीत  अमर  कर  दो  बन  जो  मित  मेरे"  आणि  तिने  डोळे  मिटून  डोके  भिंतीला  टेकवून  बसली  होती . हो  तिची  सर्वात  आवडती  गझल  होती. ती  upset  किंवा तिला शांत राहायचे असले ना  कि  हीच  गझल  ऐकायची . 
तसं  पण  तिचा  boyfriend तिला  सोडून  गेल्यापासून  हि  गझल  तर  खूपच  जवळची  बनली  होती.  “आकाश  का  सुनापन  मेरे  तान्हा  मन  मी  पायाल  छान्कती  तुम  आजावो   जीवन  मी ” गझल  तिच्या  लयीत  चालू  होती  पण  तिचे  विचार  मात्र  वेगात  चालू  झाले  होते  ह्या  वेगाबरोबर  ती  दोन  वर्ष  मागे  गेली  होती. इकडे  गझल  चालूच  होती  “जग  ने  छीना  मुझसे  मुझे  जो भी  लागा  प्यारा  सब  जीता  किये  मुझसे  मै  हरदम  हि  हारा.” हे  कडवा  ऐकून  नकळत  पणे  तिच्या  डोळ्यातून  २  अश्रू  गालावर  ओघळले, आज हि त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी येत होतं, आणि तेव्हाही  किती  रडली  होती  ती  वेडी  ह्याच  bedroom मध्ये  जेव्हा  तो  तिला  सोडून  गेला  होता.  ७  Sept २००८  तिच्या  life मधला  सोनेरी  दिवस  कारण  तो  तिच्या  life मध्ये  आला  होता.  आणि  4 sept २००९  तिच्या  life मधला  कला  दिवस  कारण  त्याने  तिला  सोडून  दिले  होते. किती  प्रेम  करत  होती  ती  त्याच्यावर  ह्याचा  हिशेबच  नव्हतं  आणि  त्याला  त्याची  किंमत  नव्हती, तो  मात्र  त्याच्या  आनंदासाठी  तिला  वापरून  निघून  गेला  होता . तिला  त्याच्या  जाण्याचं दुख  नव्हतं; दुख  होता  ते  त्याच्या  खोटं  बोलण्याच. त्याच्यावर इतका प्रेम होता त्याने काही सांगितले अस्तते तिने ऐकले असते. पण  म्हाताऱ्या  आज्जीच्या  नावावर खोटं, सर्वात  जास्त  संताप  उसळला  होता. त्याच्या  बरोबर  वेळ  कसं  जायचा  ते  कळायचं नाही  आणि  तो  सुडून  गेल्यावर  वेळ  किती  वेळ  गोठून  पडला  होता  तेही  कळलं  नाही. गणपती  ला  गावी  गेला. परत  आल्यानंतर  तिला  अशी  breaking   news दिली  कि  ती  पूर्णच  break झाली  होती , गावी  गेलो  ना  तिकडे  आजी  ने  माझं  लग्न  ठरवलं आहे  आणि  नाही  म्हणू  शकलो नाही  कारण  ते  लोक  माझ्या  आजीचा  सांभाळ  करतात, तू  मला विसरून  जा. पण  तिचा  मन  मात्र  हि  गोस्त  मानायला  तयार  होत  नव्हतं; मोठा  दादा  असताना  लहान  भवाच  कसं  लग्न  ठरवलं? हा  मोठा  प्रश्न  तिला  पडला  होता. तरीही  त्याचा  बोलणं  खरं  मानून  ती  त्याला  समजावत  होती, ह्या  त्रास  मुले  ती  खूप  आजारी  पडली  होती , पण  तो  ऐकून  घ्यायला  तयार  नव्हतं, उलट  त्यानेच  तिला  स्वार्थी  ठरवलं. ती  गप्पं  झाली.
दोन  दिवसांनी  अचानक  तिला  notebook मध्ये  लिहिलेला  त्याच्या  email चा  pwd मिळाला. तो  call तर  नाही  उचलत  at least आपण  जे  mail पाठवतो  ते  तरी  मिळतात  का पाहूया . तिने  त्याचा  email open केला  आणि  तिला  schok बसला  एका  मुलीचा  mail होता  “I LOVE YOU” म्हणून . तिने  त्याचा  सगळा  mail box check केला. त्याच्या  Chat history मध्ये  तिला  त्याने  त्या  मुलीबरोबर  chat केलेले  वाचले  आणि  तिच्या  पाया  खालची  जमीन  सरकली , गेली  ६  months त्याचे  दुसर्या  मुलीबरोबर  प्रेम  होते  आणि  हा  तिला  अंधारात  ठेवून  फक्त  वापरत  होता. तिने त्याला आपले सर्वस्व मानले होते आणि त्याने असे केले. तिला  आपली  सगळी  शक्ती  संपून  गेल्यासारखे  वाटले. ज्या  प्रेमाच्या  विश्वासावर  त्याला  परत  आणायचे  स्वप्नं  बघत  होती, ते  त्याच्या  लेखी  प्रेमच  नव्हते. ती  पूर्णपणे  खचून  गेली  होती, तिने  त्याच्या  मित्रामार्फत  फक्त  निरोप  पाठवला  होता, “त्याला  म्हणव  खरं  सांगून  बघायचं  मी  त्यःच्या  कडे  मान  वळवून  बघितले  नसते.” तिने  कसे  बसे  स्वताला  सावरले  आणि  आपल्या  बेस्ट  Friend ला  call लावला  होता. Best Friend चा  आवाज  ऐकून  तिच्या  अश्रूंचा  बांध  फुटला. Best Friend शी  बोलल्यावर  जरी  तिला  बरे  वाटले  असले  तरी  ह्या  shock मधून  normal व्हायला  तिला  ६  months लागले  होते. दिवसभर  स्वताला  कामात  गुंतवून  ठेवायची  आणि  रात्री  डोळे  मितायची  भीती  वाटायची  कारण  डोळे  मिटले  कि  त्यःच्या  आठवणी  डोळ्यासमोर  फेर  धरून  नाचायच्या. रात्र  – रात्र  तिने  रडत  जागून  काढल्या  होत्या. तिला  कसल्या  संवेदनाच  उरल्या  नव्हत्या  एक  यंत्रवत  तिची  life चालू  होती. पण  हळू - हळू  ती  normal होत  होती. Normal म्हणजे  हळूहळू  तिचा  रात्रीचा  जागरण  सुटत  होता. रात्री  गपचूप  झोपून  सकाळी  वेळेवर  office ला  जाण्या  इतकी  ती  normal झाली  होती. ह्याचा  सर्वात  मोठं  कारण  होतं  तिचा  Best Friend ह्या  घटनेला  वर्ष  उलटून  गेला  होतं. तिने  प्रेम  हा  शब्द   आपल्या  dictionary मधून  काढून  टाकला  होतं. वरून  ती  जरी  tuff वाटत  असली  तरी  आतून  खूप  हळवी  झाली  होती. ती  tichya  Best Friend च्या  विश्वासावर  भक्कम  उभी  होती  आणि  best friend ने  पण  मैत्रीचे  वचन  नं  मोडता  तो  तिचा  आधारस्तंभ  बनला  होता.
कानात  कसलातरी  आवाज  झाला  ती  तंद्रीतून  भंवर  आली  check   केले  काय  वाजले  तर  SMS आला  होता. तो  पर्यंत  तिची  गझल  संपून  दुसरे  गाणे  पण  संपत  आले  होते. Jab we Met मधले गाणे चालू होते. “ आओगे  जाब  तुम  सजना  अंगना  फुल  खिलेंगे  बरसेगा  सावन, बरसेगा सावन   दो  दिल  ऐसे  मिलेंगे ” कसलं  काय  सावन  तर  बरसला  होता  पण  ना  दोन  दिलांचा  मेल  झाला  होता  ना  अंगणात  फुले  उमलली  होती. ती  वर्तमानात  परत  येत  नाही तर  तो  परत  तिला  आठवला. किती  वेगळा  होता  तो  तिच्या  ex-boyfriend पेक्षा , तसं  तिच्या  अश्रू  ओघालेल्या  चेहऱ्यावर  एक स्मित  रेषा  उमटली. तो  तिला  आवडला  होता  आणि  त्याही  पेक्षा   तिला  आवडलं  होता  ते  त्याचे  खरे  बोलणे . खरा  तर  मागच्या  घटने  पासून  खोटं  बोलणार्यांचा  तिला  तिरस्काराच  वाटत  असे. तिच्या  player वर  पुढचे  गाणे  चालू  झाले  होते. “ O रे  मानवा  तू  तो  बावरा  है|  तू  हि  जाणे  तू  क्या  सोचता  है |” आणि  हे  खरं  पण  होतं. तिच्या  डोळ्यासमोर  पहिल्या  भेटीनंतर  चे  दिवस  फेर  धरू  लागले  होते. शनिवारी  भेट  झाल्यावर. घरी  पोहोचली  कि  नाही, इतकाच   काय  तो  संवाद  झाला  होता, आणि  रविवारी  फारसा  बोलणं  होऊ  शकला  नाही. त्यामुळे  सोमवारची  ओढ  लागली  होती.
तिला  जसा  तो  आवडला  होता  तशी   ती  पण  त्याला  भावली  होती, म्हणून  सोमवारी  office ला आल्यावर  त्याने  gtalk sign in केला  त्याला  ती  OL दिसली  लगेच  त्याने  तिला  ping केला. किती आतुरतेने बोलत होता तो तिच्याशी, ती आजारी  असल्याचे कळल्यावर तिला ओरडला होता. डॉक्टर कडे जा म्हणून force केला होता. असाच  बोलताना  त्यांचा  विषय  निघाला  तेव्हा  त्याने  तिला  स्नागीतले  कि  त्याचं  एका  मुलीवर  प्रेम  आहे  पण  त्या  मुलीचा प्रेमावरच  विश्वास  नाही  काय  करू त्यात प्रोब्लेम कि तो तिच्याबरोबर लग्न करू  शकत नव्हता पण ती मुलगी मनापासून आवडली आहे काय करू वगैरे  तिला  हे  माहीतच  नव्हता  कि  तो  तिच्या  बद्दल  बोलतोय . ती  पण  त्याला  समजवत होती कि सांगून टाक त्या मुलीला आणि तुझा प्रोब्लेम पण सांग नक्की समजून घेईल. शेवटी  ती  संध्याकाळी  त्याच्या  रागावण्यामुळे  Doctor कडे  जाऊन  आली  तेव्हा  त्याने  तिला  call वर  सांगितले  कि  "I Love You" तिच्या  कानात  ते  शब्द  तेव्हा  तापलेल्या  शीश्याचा  रस  ओतावा  असे  पडले. तिने कसे बसे स्वताला सावरून त्याला सांगितले मला तुला काही सांगायचे  आहे. मी तुला उद्या सांगते.
तो: काय सांगणार आहेस?
ती: थांब बॉम्ब फोडते डोक्यावर
तो: मला पण काही सांगायचे आहे. मी पण बॉम्ब फोडणार आहे.
ती: ठीक आहे. 
असं म्हणून जरी तिने call cut  केला असलं तरी मनात वादळ उठले होते. तिला तोंडाने सांगायची हिम्मत नव्हती म्हणून तिने तिचा past mail मध्ये लिहून पाठवला. आणि त्याला बोलली मला काही कळत नाही पण मला तू आवडलास. i don't know  हे प्रेम आहे कि नाही. त्यावर त्याला काय बोलू हे tension आलं होतं हिला कसं सांगू चिडली तर एक मैत्रीण पण गमावून बसायचो. तरी हि त्याने सांगायचे ठरवले. कारण तिने हिम्मत करून खरं बोलली होती. 
तो: सोना तुला म्हटलं होतं ना कि मी प्रेम करतो पण लग्न करू शकत नाही तुला कारण ऐकायचा आहे का ?
ती: हो सांग ना plz
तो: I  have Girlfriend and i m committed with her 

क्रमश: 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, January 10, 2011

हुरहूर...............................३

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!

हा भाग प्रसिद्ध करायला फारच उशीर झाला त्या बद्दल क्षमा असावी.

हुरहूर..............................१



हुरहूर...............................२


त्याने call cut केलं  असला  तरी  तिच्या  मनात  त्याच्या   भेटीची  हुरहूर  लागली  होती . काय  होईल ? कसा  असेल  ? असे  सगळे  प्रश्न  तिला  पडले  होते? त्या सर्व  प्रश्नांची  उत्तरे  तिला  फक्त  ६  November ला  मिळणार  होती.

***********************************************************************************************************


ह्या  प्रश्नासरशी  तिने  डोळे  उघडले  घड्याला  कडे  लक्ष  गेले  तेव्हा  १२ :००  am वाजले  होते . ती  स्वतालाच  बोलत  होती  किती  वेडी  आहे  मी ?  किती  प्रश्न  विचारात  होती  तेव्हा  स्वतालाच? ती  स्वताशीच  हसली  आणि  इतक्यात  तिला  काहीतरी  आठवले  तशी  ती  पांघरूण  सारून  झरकन  उठली. तिने  तिचं  drawer उघडला  तर  त्यात  Springs कंपनी ची   १  ltr ची  रिकामी  पाण्याची  bottle होती, खरे  तर  त्या  bottle चा  shape   आवडला  होता  म्हणून  तिने  जपून  ठेवली  होती  पण  आज  त्याची  सर्वात  मोठी  आठवण  म्हणून  तिच्याजवळ  राहिली  होती. Hmmm आत्ता  झोपायला  हवे  उद्या  office ला  जायचे  आहे; म्हणून  मस्तपैकी  आळस  देऊन  ती  परत  bed वर  आडवी  झाली  पण  त्याच्या  आठवणींनी  आज  चंगच  बांधला  कि  हिला  झोपूनच  द्यायचे  नाही.
ते  दोघे  भेटणार  होते  म्हणून  ती  ६ तारखेची  ची  खूप  आतुरतेने वाट  पाहत  होती  १५  दिवस  आधी  program fix झाला  होता  देवाकडे  एकाच  प्रार्थना  होती  कि  तो  postpone होऊ  नये. Tickets चे  advance booking करून  झाले  होते . अखेर  तो  दिवस  उजाडला  आदल्या  दिवशी  सुट्टी  असल्याने  जास्त  काही  prob नव्हता  फक्त  घरी  कळून  द्यायचे  नव्हते  कि  ती  बाहेर  चालली  आहे . So तिने  गुपचूप  तयारी  करून  ठेवली . आवडत्या  ड्रेस  ला  press करून  ठेवले  bag भरून  ठेवली  काही  राहू  नये  म्हणून . As per her everything is ready. नेहमी  mam चा  alarm रडून  दमतो  तरी  उठत  नाही  snooze करत  राहते  आणि  झोप  काढते  पण  आज  तीच  alarm च्या  आधी  जागी  झाली  होती  चक्क! पण  लगेच  विचार  केलं  आत्ताच  उठली  म्हणजे  काहीतरी  घोळ  आहे  असे  समजून  मातोश्री  उलट  तपासणी  चालू  करायच्या  त्यात  परत  ती  office चे  कारण  सांगून  भेटायला  जाणार  होती  नाही  तर  permission मिळाली  नसती  म्हणून  ती  नेहमी  पेक्षा  उशीरच  उठली  कारण  office ला  उशिरा  जायचा  होता  ना. निघायची  तयारी  चालू  असताना  ती  मनाशीच   calculation करत  होती. Oh! 8.१५ झाले, निघायला  उशीर  झाला  नाही  ना  ह्या  तंद्रीत  ती  बाहेर  पडली. Stop घरापासून  फक्त  ५  min च्या  अंतरावर  होता  पण  stop वर  येऊन  आता  तिला  २०  mins झाली  होती   तरी  bus चा  पत्ता  नव्हता.  तिला  आता  थोडी  का  होईना  भीती  वाटत  होती  ह्या  bus च्या  गोंधळामुळे   आपल्यला  उशीर  तर  होणार  नाही  ना .  तिने मनातल्या  मनात  bus ला  शिव्यांची  लाखोली  वाहिली. शेवटी तिचा अंत  पाहत  ८ :४५  ला  bus आली  दिवाळीची  सुट्टी  असल्याने  bus ला  फारशी  गर्दी  नव्हती. सो  मानागोजाती  window seat पकडून  तिने  आपला  mobile मधला  MP ३  चालू  केला  आणि  पाहिलंच गाणं  चालू  झाला  ते  'कधी  दूर  - दूर  कधी  तू  समोर  मन  हरवते   आज  का ' हे  गाणं  ऐकून  तिची  कळीच  खुलली  conducter  ला  pass दाखवताना  तिच्या  लक्षात  आले  कि  ती  advance   बुकिंग  केलेली  tickets ची  printout घ्यायला  विसरली.
oh shit! आता  काय  करायचं  मागे  वळून  जायचं  म्हणजे  उशीर  होणार! आता  कसे  करायचे? तिचा  mood च  off झाला. Shit! आपण  कालपासून  तयारी  करतो  आणि   इतकी   साधी  गोष्ट  आपण  कशी  विसरलो. आता  काय  करायचे  इतक्यात  तिला  आठवले  कि  एक  copy आपल्या  mail मध्ये  पण  आहे. तिने  cell मध्ये  net चालू  करून mail check  केलं  कि  तिने  ती  copy ठेवली  आहे  कि  नाही? तर  ती  copy होती. ती  मनातून  सुखावली  असली  तरी  आता  प्रश्न  होता  कि  ह्याची  printout काशी  काढायची , पहिला  cyber शोधावा  लागेल, time management कसं  होणार , १० :४५  चा  show आहे . ह्या  सगळ्या  calculation च्या  नादात  जर  वारयामुळे   तिचे  डोळे  कधी  मिटले  तेच  कळले  नाही  तिला , जेव्हा  डोळे  उघडले  तेव्हा  ती  सानपाड्यात  होती . Oh  no! आपण  इतका  वेळ  झोपलो  होतो . कसा  होणार  माझं ? तो  कुठे  आहे  ह्याचा  वेध  गेण्यासाठी  त्याला  call केला  त्याने  ans दिला  कि  मी  निघालोय  १० :३०  पर्यंत  पोहोचतो  आहे  चालेल  ना  show १० :४५  चा  आहे  ना ? चालेल  ना  तुला . ती  बोलली  ठीक  आहे  ये  तू . तिच्या  stop वर  उतरली , वाशी  depo च्या  आसपास  कुठेतरी  cyber आहे   हे   तिला   माहित   होते   पण  नक्की  कुठे  हे  माहित  नव्हते . एकदाचा  cyber मिळाला . तिने  email open करून  printout घेतली , मोट्ठे  tension गेले . तिने  घड्याळाकडे  नजर  फिरवली  तर  आत्ता  १० :०५  am झाले  होते. तिच्याकडे  वेळ  शिल्लक  होता  कारण  तो  १० :३०  ला  येणार  होता  मग   कसे  करायचे  कारण  तो  वाशी  ला  आला  मग  tickets collect कारणे  वगेरे   probs झाले  तर  म्हणून  तिने  प्रथम  tickets collect करायचे  ठरवले  म्हणून  तिने  तडक  riksha पकडली  व  ती  galleria mall मध्ये  गेली , तिकडे  तिने  tickets  collect केले . इतक्यात  त्याचा  call आला   कि  10 mins   मध्ये  वाशीत  पोहोचतोय . म्हणून  मग  तिने  station वर  जायला  riksha पकडली . ती  rly station समोर  त्याची  वाट  बघत  बसली . तो  पोचला  त्याने  तिचे  pics बघितले  असल्याने  तिला  पटकन  ओळखले  आणि  ती  मंद  त्याचे  pics बघून  पण  त्यला  ओळखू  शकली  नाही  तो  तिच्यासामोरूनच  पुढे  गेला आणि  तिच्यापासून   थोड्या  अंतरावर  उभा  राहून   त्याने  तिला  call लावला .
ती : hello! कुठे  आहेस  ?
तो : तू  ओळखला  नाही  मला  तुझ्यासामोरून  तर  आलो  मी , blue dress घालून  उभी  आहेस  ना ?
ती : what? (तिची  नजर  भिरभिरत   होती  हा  कुठे  आहे , पण  ती  त्याला  ओळखूच  शकली   नव्हती ) हो  तू  कुठे  आहेस  सांग  ना 
तो : अगं  इकडे  बघ  (त्याने  हाथ  हलवला)
तिने  call cut केला  व  ती  तिकडे  गेली  hey  तू  आहेस  मी  बघितलं  तुला  , sorry पण  ओळखल  नाही ,
तो : होत  ग   राहू    दे , अरे  वाह  आपण  matching   केले .(त्याने  पण  blue shirt घातला  होता ) बघ  आपले  विचार  किती  जुळतात.  
ती :  चल  जाऊया  its १० :३० 
तो : चल 
ते  first   time भेटत  असले  तरी  formlity नव्हती   riksha पकडली  आणि  ते  galleria mall च्या  दिशेने  निघाले . Tickets तर  आधीच  collect केले  असल्याने  direct आत  गेले . movie   चालू  झाला . गोलमाल  असल्याने  सांगायची  गरज  नाही  हसून  हसून  गाल   दुखू  लागले . तिला  मध्ये  मध्ये  खोकल्याची  उबळ  येत  होती ; खरं  तर  ती  आजारी  होती  पण  तिने  त्याला  संगीतालाच   नाही . त्याने  विचारला   हि  काय  होतंय . तिने  काही  नाही  पाणी  हवं आहे  असं  सांगून  विषय  संपवला . interval मध्ये  त्याने  तिच्यासाठी  पाणी  आणि  snacks आणले  movie चालू  होते  joke   वरच्या  हसण्यामुळे  बोलणं  काही  होत  नव्हता . snacks संपवून  ती  pepsi पियाला  गेली  तर  लक्षात  आला  कि  straw विसरला  होता . मग  काय  आपल  indian stylene पियाली  ती . movie संपला  बाहेर  आले. 3 hrs कसे  संपले  कळलेच  नाही. 
आता  वेळ  होती  भेटीची , कारण  movie  मध्ये  बोलणे  झालेच  नाही . movie च्या  duration मध्ये  खाऊन  झाले  असले  तरी  lunch करूया  का  असे  तिने  विचारले  तर  तो  म्हणाला  ठीक  आहे  करूयात  कि  सो  काहीतरी  lite खाण्यासाठी  ते  जवळच्या   McD मध्ये  गेले . त्याने  तिकडे  काही   खाल्लेच  नाही  म्हणा. तिला  मात्र  पूर्ण  burger खायला  लावला आणि आणलेले Fries पण  . मग  काय  करायचे  म्हणून  ते  मिनी  sea shore la  गेले  तिकडे  फिरत  होते  पण   बोलत  कोणाच  नव्हते  सारख  तू  बोल  - तू  बोल  ना . तू  माघात  पासून  गप्पं  का  आहेस  हेच  बोलणं  होत  होता . chat वर  तर  किती  बोलतात  पण  प्रत्यक्षात  भेटल्यावर  बोलता  येत  नव्हते . Garden मध्ये  बसल्यावर  तो  काहीच  बोलत  नाही  पाहून  तिने  त्याच्याकडे  हट्ट  धरला  कि  तुझी  एखादी  कविता  तर  बोलून  दाखव  ना . तिच्या  हट्ट  पुरवीत  त्याने  तिला  त्याच्या  २  - ३  कविता  म्हणून  दाखवल्या . पूर्ण  sea shore ते  सागर  विहार  asa  by walk परिसर  फिरले . ते  बोलत  नव्हते  पण  मनाच्या   तर  कुठेतरी  ना  बोलता  जुळत  होत्या. घडल्याकडे  लक्ष  गेले  तर  ४ :३०  वाजले  होते . वेळ  कसं  निघून  गेला  ते  कळलाच  नाही . त्यानेच  तिला  विचारला  निघायचं  का  आपण. तिने  मानेनेच  होकार  कळवला. तो station वर  जाणार  होता  आणि  ती  वाशी  डेपो  ला. तोच  तिला  म्हणाला  कि  station साठी  riksha बघतो . तिकडे  जाताना  तुझा  depo येईलच  ना  तिकडे  तुला  drop करतो  चालेल  का  ? पण मनात मात्र जायचे नव्हते, घरी जायला उशीर होईल आणि दिवाळी पण होती ना मग त्रास नको म्हणून तर ते निघत होते नाहीतर त्या दोघांना हि तो मूक सहवास संपूच नये असं वाटत होता.  ती  हो  म्हणाली . तशी  station साठी  riksha पकडली  आणि  रिक्षावाल्याला  सांगितले  कि  depo road ने घ्या . ती  खरे  तर  खूप  कंटाळली  होती त्यात आजारी पण होती त्यामुळे  चालून थकवा आला होता  तसं  ती  त्याला  म्हणाली  सुद्धा ; तर  त्याने लगेच  तिला  सांगितले  कि  झोप  ना  माझ्या  खांद्यावर  डोकं  ठेवून , आणि  पुढची  5 mins   ती  त्याच्या  खांद्यावर  डोकं  ठेवून  झोपली  होती. जसा  depo जवळ  आला  तशी  ती  सरळ  बसली . रिक्षावाल्याला  depo जवळ  riksha थांबवायला  सानिग्तली. bye म्हणून ती जशी निघाली तसा त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला म्हणाला नीट जा पोहोचलीस कि मला काल कर आणि हात सोडला. तसं रिक्षा स्टेशन  च्या दिशेने निघाली.   

क्रमश:
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, January 03, 2011

क्रांतीज्योती - सावित्रीबाई फुले

१८०  वर्षापूर्वी   स्त्री  – पुरुष  समता  आणि  सामाजिक  न्यायासाठी  महात्मा  ज्योतिबा  फुले  यांच्या  सोबत  तळहातावर  प्राण  घेऊन  झगडणाऱ्या  क्रांतीज्योती  सावित्रीबाई  यांच्या  जयंती   निमित्त  त्यांच्या  कार्याचा  धावता  आढावा   घेत   त्याच्या  पवित्र  स्मृतीस  प्रणाम  करण्याचा  हा  अल्पसा  प्रयत्न!!!!

आज  स्वतंत्र  भारताच्या  राष्ट्रपतीपदावर   प्रतिभाताई  पाटील  मोठ्या  दिमाखात  विराजमान  आहेत. १८०  वर्षापूर्वी  महात्मा  फुले  आणि  सावित्रीबाई  फुले  यांनी  सुरु  केलेल्या  भिडेवाड्यातील  पहिल्या  मुलींच्या  शाळेला  आलेले  हे  एक  मधुर  फळ  होय.  आज  सभोवताली  नजर  टाकलीत  तर  स्त्रियांनी  सर्वच  क्षेत्रात  आपली  क्षमता  सिद्ध  करून  दाखविली  आहे.  त्या  पुरुषांच्या  बरोबरीनेच  नव्हे  तर  दोन  पावले  पुढे  राहून  काम  करताना  दिसतात. हि  कमळ  केली  आहे   दूरदृष्टीच्या   ज्योतिबा  आणि  सावित्रीबाई   फुले  यांनी!


१९  व्या  शतकाचे  दुसरे  दशक ; मराठी  राज्य  बुडालेले. पुरुषांच्या   चंगीभंगी  चाळ्यांनी   स्त्रियांना   समाजात  वावरणे  हि  अशक्य  झालेले , मुलींची  पाळण्यातच  लग्न  लाऊन  देणारे   आई -बाप , लग्न  म्हणजे  काय  हे  कळायच्या  आतंच  जर  मुलीचा  नवरा  मृत  झाला  तर  जन्मभर  काबाडकष्ट , अपमान  सोसत  एकत्र  कुटुंबात  ह्या  कोवळ्या  बालविधवेने   पिचत  पडायचे. अशा  स्थितीतच   कुणा  पुरुष  नातेवाईकाच्या  वाकड्या  नजरेची  शिकार  बनून  गर्भ  राहिला  तर  त्याचा  सारा  दोष  पुन्हा  ह्या  निष्पाप  मुलीच्याच  माथी. मग  समाजाच्या  दृष्टीने  झालेले  आपले  काळे  तोंड   लपविण्यासाठी  त्या  कोवळ्या   मुलीना  नदी  – विहिरीत  जीव  देण्यापलीकडे  दुसरा  मार्ग  नसे. ब्राम्हण  समजत  तर  विधवेचे  सुंदर  केस  कापून  तिला  विद्रूप  केले  जाई, काय  म्हणे  तर  तिला  सोवळी  केली  पती  मेल्यावर  सती  जायला  हि  भाग  पाडीत.

खंडोजी  नेवासे  आणि  लक्ष्मी  नेवासे  यांच्या  पोटी  ३  January १८३१ रोजी जन्मलेल्या   सावित्रीबींचे  त्या  काळातील  प्रथेनुसार  वयाच्या  ९ व्या  वर्षी  ज्योतिबा  फुले  यांच्याशी  विवाह  झाला . लग्नानंतर   ज्योतीबांनी  त्यांना  शिकण्याची  आवड  लावली  आणि  त्यांनी  हि  मन:पूर्वक  अभ्यास  करीत  चौथी ची  परीक्षा  उत्तीर्ण  केली. सगुण बाईला   घेऊन  त्यांनी  १८४७  सालीच  ज्ञानदानाच्या  कार्याला  सुरुवात  केली.


१  January १८४८  चा  दिवस  उजाडला . पुण्याला  भिडेवाड्यात  देशातील  पहिली  मुलींची  शाळा  सुरु  झाली . घनघोर  अंधारात  ज्ञानाचा  दीप  उजळला ! अन्यायाच्या  छाताडावर  स्त्रीने  पहिला  वार  केला. क्रांतीच्या  नव्या  पर्वबरोबरच  समजा कंटकांचा   त्रास  सुरु  झाला . त्यांनी  फुले  दाम्पत्याला  छालायला  सुरुवात  केली . त्यांच्या  अंगावर  शेंगोळे  फेकले  जात , आचकट -विचकट  शिव्या  दिल्या  जात , चारित्र्याबद्दल  शंशय  घेत . पण  हा  सगळा  छळ  सोसून हि   त्या  मुलीने  आपले  शिक्षणाचे  कार्य  अविरत  चालूच  ठेवले. म्हणूनच  आज  पहिल्या  भारतीय  शिक्षिका  म्हणून  त्यांचे  नाव  घेतले  जाते.
लवकरच  क्षुद्र  – अतिक्षुद्र  समजल्या  जाणाऱ्या  समाजासाठी  प्रौढ  शिक्षण  देणारी  शाळा  सुरु  केली . शिक्षण  हेच  दलित  उद्धाराचे  साधन  आहे  हे  नेमके  ओळखून  शिक्षण  प्रारंभ  केला.  फुले  दाम्पत्याने  “Native Female School” आणि  “The Society for Pramoting Edcation” अशा  संस्था  स्थापन  karun पुणे  परिसरात  शिक्षण  संस्थांचे   जाले  निर्माण  केले . विद्यार्थ्यांची  गळती  थांबावी  म्हणून  त्यांनी  “प्रोत्साहन  भत्ता ” आणि  “आवडेल  ते  शिक्षण ” अशा  अभिनव  कल्पना  राबवल्या . अभिरुची  संवर्धन  , चारित्र्याची  जडण -घडण  यावर  या  शाळातून  भर  दिला  जाई . सरकारी  शाळांपेक्षा  या  शाळांची  संख्या  म्हणूनच  १०  पटींनी  अधिक  होती .  शिवाय  परीक्षांमध्ये  हि  फुले  यांच्या  शाळेतील  मुळीच  पुढे  होत्या. फुले   दाम्पत्याच्या    या  महान  कार्याची  दाखल  घेऊन  १८५२  मध्ये  British Government ने  त्यांचा  खास  सत्कार  केला.

सावित्रीबाई  अष्टपैलू    व्यक्तिमत्वाच्या  होत्या  त्या  शिक्षिका  होत्या , लेखिका  होत्या , समाजसेविका  होत्या  आणि  पिडीत  व  दलितांच्या  माता  होत्या. तसेच  त्या  उत्तम  कवयत्री  हि  होत्या. शिक्षणा  सोबत  ह्या  दाम्पत्याने  जातीभेद  निर्मुलन  आणि  अनिष्ट   प्रथांचे  निर्मुलन  केले . तसेच  बालहत्या   प्रतिबंध  गृहाची  स्थापना  केली, एका  विधवेच्या  मुलाला  दत्तक  घेऊन  त्याला  डॉक्टर  बनविले  व  जातीबाहेर  विवाह  लावून  दिला 

ज्योतीबांच्या  मृत्युनंतर   हि  त्यांनी  आपले  कार्य  अविरत  चालूच  ठेवले . १८९७  साली  आलेल्या  plague च्या  साथीच्या  वेळी  रोग्यांची  शेव  केली  व  दुर्दैवाने  त्याच  plague ची  लागण  होऊन  १०  March १८९७  रोजी  हि  क्रांतीज्योत  मालवली  पण  त्यांनी  प्रज्वलित  केलेल्या  हजारो  मशाली  आजही  पेटत्या  आहेत  अनि  विश्वाच्या  शेवटापर्यंत  पेटत्या  राहणर  आहेत. त्या  जर  नसत्या  तर  कदाचित  हा  लेख  लिहिणारी  मी कुठे  असती  ह्याची  कल्पना  हि  करवत   नाही  तेव्हा  त्या  क्रांतीज्योतीला  मनाचा  मुजरा  !!!


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐