श्रीकबीरदर्शन

श्रीकबीरदर्शन - लेखक - डॉ. विजय बाणकर,  पृष्ठ संख्या - १६६,  मूळ किंमत - १६०/-  प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये १२० /- रू.  (उपलब्ध - १२/०१/२०१५ रोजी) आजच आपली प्रत नोंदवून ठेवा!
वर्ण, जात, पंथ वगैरे संकुचित देहनिष्ठ भावांच्या पलीकडे जाऊन ते अविभक्तपणें स्वरूपनिष्ठ जीवन जगत होते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना विचारल्या गेलेल्या नेहमीच्या प्रश्नांची त्यांनी दिलेली पुढील पारमार्थिक उत्तरे होय : एके दिवशी एका वनातून जात असता दुपारी ते एका झोपडीत गेले. तिथे रहात असलेल्या वीस-एक वर्षाच्या मुलीने त्यांना विचारले  -
    प्रश्न  :  आपण कोण बरे?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमची जात?     
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचा पंथ / संप्रदाय?
    उत्तर  : कबीर.
    प्रश्न  :  तुमचे नांव?
    उत्तर  : कबीर.
या एकशब्दीं उत्तरांनी विस्मित होऊन ती मुलगी उद्गारते, ‘मी अनेक साधू पाहिले पण अशाप्रकारे उत्तरे देणारा मात्र आजपर्यंत कुणी भेटला नाही.   ‘दि मोस्ट ब्युटिफूल नेम्स म्हणून अल्लाची जी ९९ नावे जपली जातात त्यापैकी ‘अल् कबीर' हे एक विशेष नाम होय. कबीर म्हणजे  श्रेष्ठ, ग्रेट, उत्कृष्ट वा महान होय. ‘अणुरेणुहूनही लहान असलेल्या अशा आपल्या जीवाला स्वरूपाचे दर्शन घडून, संत श्रीतुकाराम म्हणतात त्याप्रमाणे, तो ‘आकाशाएवढा देवचि होऊन जातो तेव्हा तोे खरया अर्थाने ‘कबीर म्हणजे ‘महान' झालेला असतो, होतो. श्रीकबीर या अर्थाने महान झाले होते/होते. म्हणूनच त्यांना महात्मा म्हणूनही अनेकदा संबोधले गेले आहे.
‘ओवी ज्ञानेश्वराची, ‘अभंग तुकयाचा आणि ‘दोहा कबिराचा, हे समीकरण आता सर्वश्रुत होऊन गेले आहे. अर्थात, ‘तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदान्त वाहे पाणी।। हे अभंग विधान श्रीकबिरांच्याबाबतीतही सत्य आहे. श्लोक, ओव्या, अभंगांमधील विश्वकल्याणकारी ज्ञान श्रीकबिरांच्या दोह्यांमध्ये देखील अभिव्यक्त झाले आहे. उपरोक्त संतांच्या अभिव्यक्तीतही इतकी साम्ये आहेत, की सर्वच संत जणू श्रीकबीर गेले त्याच ईश्वर दिग्दर्शित वाटेवरून जात आहेत, असे वाटत राहते. (याप्रकारच्या अभ्यासपूर्ण नोंदीही काही विद्वानांनी करून ठेवल्या आहेत.) प्रस्तुत भावानुवाद व टिपा वाचताना अभ्यासू वाचकांना देखील तसे जाणवेल. कारण, दोह्यांचा अर्थ समजून घेत अनुवाद करताना श्रीज्ञानेश्वर तुकारामादी संतांचे सम विचार नुसते आठवतच नव्हते तर त्यातील अनेक शब्दही कळतनकळतपणे त्यात सामावून गेले आहेत. संत साहित्याचे सदैव संशोधन होत असते. भाविक जनतेकडूनही त्याचे मोठ्या प्रमाणात वाचन/गायन/पारायण होत असते. श्रीकबिरांच्या दोह्यांचे गद्य, पद्य अनुवादही उपलब्ध आहेत. असे असतानाही त्यांच्या दोह्यांचा भावानुवाद करावयाचे मनाने घेतले याचे एकमेव कारण, श्रीज्ञानेश्वरादी संतांनी आधी केलेल्या व मग सांगितलेल्या ‘खरया भक्तिबाबत व खरया देवाचे दर्शन घडविण्याबाबत मार्गदर्शक असणारया, माझे गुरुदेव श्रीहंबीरबाबा यांनी लिहिलेल्या ‘जीवनकलेची साधना' या धर्मग्रंथाचा इंग्रजी अनुवाद करताना त्यांनी त्यात उद्धृत केलेल्या संत श्रीकबिरांच्या दोह्यांचा झालेला अभ्यास, हे होय.

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!