मोदक

“अग प्रतिभा, इकडे बघ अशा पाकळ्या आल्या पाहिजेत मोदकाला.” सासूने आपल्या नवीन लग्न होऊन आलेल्या आणि मोदक न येणाऱ्या सुनेला फार पेशन्सली सांगितले “एक काम कर तू हा पिठाचा गोळा घे आणि माझ्यासारखा मोदक तयार करायचा प्रयत्न करत रहा.” 
“हो आई!” सुनेने खालमानेने उत्तर दिले. 
सुनेला त्या मोदकाच्या पाकळ्या जमेपर्यंत सासूचे २१ मोदक झालेले असतात. “आई, तुमचे मोदक झाले आणि मला एक पण बनवता आला नाही.” हिरमुसल्या आवाजात सुनेने वाक्य म्हटले 

“अग असुदे, पुढच्या संकष्टीला प्रयत्न कर, काय फरक पडतो.” सासूने तितक्याच स्पोर्टिंग स्पिरीट मध्ये कोणताही टोमणा न देता तिला समजावले.
अशाच तीन चार संकष्ट्या गेल्यावर “आई बघा जमला मोदक” सुनेने असेच म्हणताच, “आरे वाह! जमला ग, आता दुसरा कर” सासूने आनंदाने सांगितले. 


“प्रतिभा, मोड तो मोदक, एक जमला पण...” सासूचे वाक्य अर्धवट तोडतच सुनेने विचारले “पण काय आई?” सासूने हसतच उत्तर दिले “अग, हा मोदक बघ आणि आत्ता तू बनवलेला मोदक बघ, एक लहान एक मोठा कसे चालेल, सगळे मोदक एक सारखे दिसले पाहिजे. आणि तो मोदक फोड आणि सारण कढाईत टाक आणि ते पीठ मात्र बाजूला ठेव ते मिक्स करू नकोस.” सासूने आधीच्याच पेशन्सने सांगितले. आज्ञाकारी सुनेने लगेच तसे केले आणि दुसरा मोदक तयार करायला घेतला. गणपती येऊन गेले पण इंडिपेंडन्टली करता येत नव्हते पूर्ण २१ मोदकात ३ किंवा ४ मोदक इतकेच मोदक असायचे. सुनेला मोदक जमावे म्हणून प्रत्येक संकष्टीला मोदक करायचा घाट घातला जायचा. आणि ९ किंवा 10व्या संकष्टीला २१ मोदक सासूचे ६ ते ७ मोदक होते आणि उरलेले सुनेचे...... सुनेने मोदक तयार केले म्हणून अत्यानंद झालेला.


गावातून मुंबईत आलेल्या आणि भात, भाकरी (तांदळाची), कालवण आणि भाजी याखेरीज कोणताही पदार्थ न येणाऱ्या सुनेला मोदक, पुरणपोळी, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, करंज्या, शंकरपाळ्या यासारखे प्रत्येक सणाला बनणारे, नॉर्मल जेवणात बनणारे सगळे पदार्थ पेशन्स ने शिकावेले आणि तोच पेशन्स हि सुनेला शिकवला. आज ती सासू नाहीये ती सून आहे आपल्या सून कधी येईल याची वाट बघते आहे.... पण सून येण्यापूर्वी तोच पेशन्स तिने तिच्या लेकीवर देखील वापरला ““अग बाय, कार्टे! इकडे बघ अशा पाकळ्या आल्या पाहिजेत मोदकाला. नाहीतर सासरी माझ्या नावाचा उद्धार होईल. लेकीला मोदक पण करायला शिकवले नाहीत.” 


“तुझ्या सासूने कधी तुझ्या आईचा उद्धार केला होता का तुला मोदक येत नव्हते म्हणून?” इति तिची लेक म्हणजे मी. “बाय सगळ्याच सासवा माझ्या सासुसारख्या नसतात” इति ती सून.


वेल ती सासू म्हणजे माझी आजी होती ती सून म्हणजे माझी आई आणि बाय म्हणजे मी (आमच्या मातोश्री आम्हाला बाय म्हणतात कधी कधी. सो आई तुझ्या आणि तुझ्या सासुसारख्या मोदकाच्या पाकळ्या जमल्या नाहीत पण केलेत ट्राय मी मोदक.....~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................