किल्ले रोहिडा ----- पहिला ट्रेक

शनिवार वेळ रात्री ११:१५
राजे आपली बाहेरची बैठक उरकुन घरी आले. आणि आल्याआल्या आम्ही त्यांची हजेरी घ्यायला सुरवात केली उद्या ट्रेक ला जाणार आहात तरी इतक्या उशीरा घरी आलात. लवकर झोपा आता रात्री लॅपटॉप लावुन आता जागरण नका करु, यावर राजे म्हणाले थांब ग! जरा ईकडे थोडा गोंधळ झाला आहे. आता काय झाले म्हणुन मी त्यांच्याकडे पाहीले तर उत्तर आले की प्लॅन चेंज केला आहे. विसापुर ऐवजी किल्ले रोहिडा करायचा आहे. ह्या पुढे माझे काम फक्त राजेंच्या हलचाली बघण्याचे व ऐकण्याचे होते. हा किल्ला भोर जिल्ह्यात असल्याने स्वामींना हिंजेवाडीतुन पिकअप करुन भोर कडे जाणे थोडे त्रासदायक असल्याने स्वामींचे येणे आपोआपच रद्द झाले. यावर श्री. मोदक यांना एक कॉल झाला. आता मात्र माझे डोळे पेंगु लागले असल्याने राजेंना म्ह्टले की तुमचे चालु दे मी झोपते. त्यानंतर ही राजेंचे बरीच काही खटपट चालु होती. सरतेशेवटी मला उठवले आणि सांगितले की आपण दोघे रोहीड्याला जात आहोत.
रविवार
पहाटे ६ वाजता सगळे आवरून आम्ही निघालो चांगले उजाडले होते. श्री मोदक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले मित्र सागर पाध्ये हे पुणे सातारा रोड वर थांबले आहेत अशी माहिती दिली. हाय वे वर थोडी शोधाशोध केली असता सागर भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाच श्री. मोदक व श्री. किसन देव यांचे आगमन झाले. त्यांच्याशी ओळख करुन घेतली व आणखी दोघेजण येणे बाकी होते म्हणुन तेथेच वाट पहात थांबलो. तेवढ्यात आधी ट्रेक केला आहे का म्हणुन मोदकांनी विचारणा केली. आधी ट्रेक केला नसल्याने मी सरळ नकारार्थी मान हलवली. ठिक आहे! आपण सांभाळुन घेउ असे म्हणत असतानाच श्री. गणेशा व मयुर जोशी यांचे आगमन झाले. त्यांच्याशी ओळख करून घेतली व आम्ही गडावर जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
वाटेत गाडीला तेल पाजण्यासाठी ब्रेक घेतला व स्वत: हि कॉफी- चहा घेतला तेथेच नाश्ता भोर मध्ये जाऊन करू असे ठरले. तेथून पुढे भोर एस.टी. स्थानाकावरून उजवी कडे वळून जरा पुढे गेलो व लगेच नाश्तासाठी ब्रेक घेतला. नाश्ता करून जे सुसाट निघालो ते थेट पायथ्याशी असणार्‍या शाळेजवळ. रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती. याचा फायदा घेत शाळेच्या व्हरांड्यात बाईक पार्क केल्या. तेथुनच किल्ले रोहीडाचे घडलेले पहिले दर्शन
001.jpg
आरामात थट्टामस्करी करीत गडावर पोहोचलो. तेथेच सुहास झेले व अन्य लोकांची धावती भेट झाली. पुढे गड फिरायला निघालो ह्या गडाला तीन प्रवेश द्वार असून पहिला दरवाजा पार केल्यावर काही पायऱ्या लागतात त्या चढून गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो येथून आत गेल्यावर पाण्याचे टाके लागते.
दुसऱ्या दरवाजाकडे जाणाऱ्या पायर्‍या 008.jpg हेच ते पाण्याचे टाके 012.jpg दुसरे प्रवेशद्वार पार केल्यानंतर विश्रांतीसाठी बसलेले आम्ही 020.jpg मयुर जोशी, किसन शिंदे, सागर पाध्ये, गणेशा, राजे आणि मोदक येथून बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर तिसरे प्रवेशद्वार लागते येथेच देवनागरी व फारसी भाषेत शिलालेख कोरलेला आहे तसेच दरवाजाच्या दोन्ही बाजूंस हत्तीचे मस्तक कोरण्यात आलेले आहे. तिसरे प्रवेशद्वार 116.jpg देवनागरीतील शिलालेख 113.jpg फारसी भाषेतील शिलालेख 115.jpg
येथून सरळ चालत गेल्यास ओळीत थोड्या अंतराने दोन बुरुज नजरेच्या टप्प्यांत येतात. त्यातला पहिला बुरुज हा सदरेचा बुरुज म्हणून ओळखला जातो या बुरुजासामोरच झेंडा लावण्यासाठी खांब रोवलेला आहे.
सदरेच्या बुरुजावर आम्ही. 031.jpg येथून जरासे सरळ चालत गेल्यास आणखी एक बुरुज लागतो. सदरेच्या बुरुजावरून शिरवले बुरुजाचा काढलेला फोटो 022.jpg येथून डावीकडे चालत जाताना सलग भक्कम तटबंदी दिसून येते या तटबंदीमध्ये एक छोटेसे द्वार दिसून येते (कदाचित चोर दरवाजा असावा) येथून सरळ चालत राहिल्यास फत्ते बुरुज आहे 057.jpg फत्ते बुरुजावर बसलेले आम्ही 072.jpg फत्ते बुरुजावरून उजवीकडे गेल्यास मध्ये मध्ये किल्ल्याची तटबंदी बघयला मिळते तसेच या भागात सलग पाण्याचे टाके बनवलेले आहेत 076.jpg पाण्याचे टाके व त्यात उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्या 077.jpg एकमेकास लागून असलेले पाण्याचे टाके 079.jpg येथून पुढे चालत गेल्यास गड बांधाण्यासाठी वापरण्यात येणारया चुन्याचा घाणा बघावयास मिळतो. 082.jpg
या घाण्याच्या जवळूनच तुम्हाला तुम्हाला वाघजाई चा बुरुजाचे प्रथम दर्शन घडते येथे जावयाचे असल्यास थोडे खाली उतरून जावे लागते कारण किल्ल्याला जोडून असलेल्या रस्त्याची पडझड झालेली आहे. तसेच खाली उतरून जाताना काळजी घ्यावी कारण येथे आता बांबूचे बेट तसेच अनेक छोट- छोटी झुडुपे वाढलेली आहेत.
बांबूच्या बेट व झाडाझुडपांच्या वेढ्यात असलेला वाघाजाई बुरुज 096.jpg
येथुन उजवीकडे वळल्यास पाहिले लक्ष जाते ते किल्ल्यावर असलेल्या मंदिराकडे परंतु सरळ चालत जावे ते मग रांगेत तुम्हाला पाटणे बुरूज व दामगुडे बुरुज आहे.आज हे दोन्ही बुरुज सुस्थितीत नाहीत.दामगुडे बुरुजावरून डावीकडे थोडे अंतर चालून गेल्यास किल्यावर असलेले मंदिर लागते. मंदिराजवळ एक लहानसे पाण्याचे टाके आहे. तसेच पूर्वी या मंदिरासमोर दीपमाळ असावी. आता तेथे दीपमाळ नसली तरी त्याचे अवशेष दिसून येतात, तसेच येथे ४ सामाधीस्थळे हि दिसून येतात. समाधीच्या बाजूलाच असलेल्या दगडावर शंकराची पिंड कोरलेली दिसून येते.
लांबून दिसणारे मंदिर 105.jpg मंदिराच्या आतील मूर्ती 097.jpg मंदिराजवळचे पाण्याचे टाके 098.jpg मंदिराच्या आवारात असलेली सामाधीस्थळे 102.jpg दगडावर कोरलेले शिवलिंग 100.jpg येथेच पूर्वी दगड हे चुना तसेच इंटर लॉकिंग सिस्टम मध्ये बांधत असत ह्याचा नमुना दाखवण्यासाठी उचलेल्या दगडाखाली ह्या महाराजांनी दर्शन दिले. 110.jpg
येथील मंदिराच्या डावीकडे मोठा तलाव बांधलेला आहे. किल्ले रोहीडाचा घेर थोडा लहानच आहे. किल्ल्याचे बुरुज सुस्थितीत आहेत. परंतु सदर, किल्लेदाराची निवासस्थाने, घोड्यांच्या पागा, यासाठी केलेल्या बांधकामाचे अवशेष आता पहावयास मिळतात.
३६६० उंची असलेला हा किल्ला १६५६ नंतर स्वराज्यात आला. म्हणजे आणण्यात आला. त्या आधी ह्या किल्ल्यावर कृष्णाजी बांदल ह्यांची जहागिरी होती. भोरच्याजवळ असलेल्या सिंध येथील बाजीप्रभू देशपांडे हे बांदालांचे मुख्य कारभारी होते व त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे हे सरदार होते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना स्वराज्यात सामील व्हा, म्हणून खलिता पाठवला. तिकडून ह्या खालीत्याला नकारार्थी उत्तर आल्याने महाराजांनी आबाजीच्या मदतीने रोहीड्यावर हल्ला केला. त्यात कृष्णाजी बांदल मारले गेले. या लढाईनंतर रोहीडा व बाजीप्रभू दोन्ही स्वराज्यात सामील झाले. असा आहे रोहीड्याचा इतिहास.
हा किल्ला तास ते दीड तासात फिरून होतो. व चढायला किमान तसे ते दीड तास लागतो.अशी तासाभराची चढण चढून मग मस्तपैकी किल्ला फिरलो. पण ह्या दोन – अडीच तासाच्या पायपिटीनंतर भूक ही लागली होती मग श्री. मोदक यांनी पराठे व सागर ने आणलेला साजूक तुपातील शिरा खाऊन घेतले मग पुन्हा एकदा जरा सदरेच्या बुरुजावर जाऊन जमलेल्या ढगांचा आस्वाद घेतला. व परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत जाताना एक शंकराचे मंदिर लागते. इथला फोटो घेता आला नाही. नंतर मस्तपैकी मोदक यांनी दाखवेल्या धाब्यावर यथेच्छ भोजन केले. व सरळ परतीची वाट पकडली.
काहि क्षणचित्रे 009.jpg 016.jpg 011.jpg 013.jpg 084.jpg ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

  1. बरं लिहिलं आहे.

    ReplyDelete
  2. tu kay ya killyachi guide aahes kay??? kuthun aanali etaki mahiti...? baki lihalay mastach :)

    ReplyDelete
  3. Very nice.. I liked the way it is written.. Keep it up.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................