प्रवाहातील रंगभूमी.....................२ (अंतिम)

"प्रवाहातील रंगभूमी" चा पहिला भाग येथे वाचा. 

आधुनिक रंगभूमी                      मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी सीतास्वयंवर या नाटकाचा प्रयोग सांगलीकरांच्या प्रेरणेने केला. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले. नृत्य, गायन, अभिनयदेव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली.

                  त्या काळच्या नाटकांचे स्वरूप : प्रथम रंगभूमीवर आपल्या साथीदारांसह सूत्रधार येत असे. मृदंग व पखवाज वाजवले जात असत. मंगलाचरण, ईशस्तवन झाल्यावर विदूषक आचरट कोट्या करुन विनोद करत असे. त्यानंतर नाटकाचा विषय काय आहे हे सांगून कागदाच्या लगद्यापासून सोंड तयार केलेला गणपती सोंड हलवत यायचा. गणपतीचे स्तवन झाले की कथानकाच्या अनुषंगाने पात्रांकडून संवाद आणि कृती यातून नाटक उभे राहात असे. अभंग, ओवी, कटाव आणि वेगवेगळी काव्यवृत्ते यांचा आधार घेत नाटक सादर केले जात असे. पौराणिक नाटकांत संवाद गद्यपद्य रूपात असत. नाटकाला संहिता असायची. अशा संहितेचे पुस्तक होऊ शकते याची कल्पना वाढत चाललेली होती. पौराणिक नाटके लोकप्रिय होत असतांना इ.स.१८५६ मध्ये मुंबईत अमरचंद वाडीकर मंडळींनी फार्स एक हा नाटकाचा एक नवीन प्रकार हाताळला. त्याद्वारे असंभाव्य गोष्टी, उथळ विनोद असलेला एक नाट्य प्रकार रंगभूमीवर अवतरला. इंग्रजी नाटकेही याच काळात मुंबईत होत असायची. इंग्रजी रंगभूमीच्या अनुकरणाने मराठीत फार्स रुढ होत गेला.

          मराठी रंगभूमीला आरंभापासूनच श्रेष्ठ दर्जाचे गायक आणि नट मिळाले. इतकेच नव्हे तर सव्यसाची कलावंत हि लाभले. नारायण राजहंस उर्फ बालगंधर्व आणि केशवराव भोसले हे दोन संगीतसम्राट एकाच वेळी मराठी रंगभूमीवर आपले राज्य गाजवत होते. बालगंधर्वांना नाट्य विषयक शिक्षण "किर्लोस्कर नाटक मंडळी" मध्ये मिळाले. पुढे त्यांनी स्वताची “गंधर्व नाटक मंडळी” हि कंपनी सुरु केली. या कंपनीने पुढे ३० वर्षे मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अधिराज्य केले. केशवराव भोसले यांची “ललित कलादर्श नाटक मंडळी” आपल्या अलौकिक तेजाने तळपत होती. तसेच मराठी वाङ्मयातील श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथकार नाट्यक्षेत्रात स्वताहून पुढे आले. याच काळात म्हणेज मार्च १९११ साली काकासाहेब खाडिलकरांनी लिहिलेला संगीत मानापमान हे नाटक रंगभूमीवर आले. आज २०११ हे वर्ष “संगीत मानापमान” ह्या नाटकाचे शतक महोत्सावी वर्ष आहे. त्या काळात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, न.चि. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर, कवी राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला ने तर त्यावेळी हि सामाजिक समस्या मांडली तसेच नाट्याला आपले जीवन वाहिलेले भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांचे उल्लेख प्रामुख्याने येतात. वरेरकरांच्या मार्गदर्शनाखाली ललित कलादर्श ने सामाजिक नाटके रंगभूमीवर आणली. १९२० ते १९३० ह्या १० वर्षात महाराष्ट्रात लहान-मोठ्या किमान ३० कंपन्या होत्या. 

रंगभूमीचे बदलते रंग 
१९३० साली बोलपटांचे आगमन झाल्यावर रंगभूमीला उतरती कळा लागली. त्यानंतर एका तापाने रंगभूमीची रंगीत पताका पुन्हा एकदा झळकू लागली. त्यावेळच्या राजकीय जागृतीतून पुरोगामी (डाव्या) तत्वाचा उदय झाला. हि लाट साहित्याक्षेत्रापर्यंत हि पोहोचली. यातूनच मग पुरोगामी रंगभूमी इंडिअन पीपल्स थिएटर असोसिएशन म्हणजेच “इप्टा चि स्थापना झाली. त्यात ख्वाजा अहमद अब्बास, मन्मथ रॉय यांची नाटके रंगभूमीवर आली. स्वातंत्र्यसैनिका कमलादेवी चटोपाध्याय यांनी “इंडिअन नॅशनल थिएटर ची स्थापना केली. मुंबई सारख्या बहुभाषिक शहरात तिने बहुभाषी नाटेक निर्माण केली. आंध्रमध्ये “तेलगु लिटील थिएटर, गुजरात मधील "कला केंद्र ची स्थापना झाली. तसेच मुंबई मराठी साहित्य संघाची डॉ. भालेराव यांनी स्थापना केली. या सर्वानी व्यवसायिक रंगभूमीला नवजीवन दिले. याबाबातील पृथ्वीराज कपूर यांचे पृथ्वी थिएटर (इथे आजही नाटकाचे प्रयोग होताच असतात.) व मद्रास चा "सेवा संघ" यांचा हि निर्देश करावा लागेल. बंगाल मध्ये सचिंद्रनाथ सेन गुप्त, विधायक भट्टाचार्य आदि व रविंद्रनाथ टागोर यांच्या अष्टपैलू बुद्धिमत्तेचा फायदा बंगाली रंगभूमिला मिळाला.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कला व साहित्याकडे सरकारने लक्ष पुरवावे म्हणून जी मागणी झाली. त्यानुसार “साहित्य अकादमी” व “ललित अकादमी” , “संगीत नाटक अकादमी” अशा तीन मध्यवर्ती संघटना झाल्या. दिल्ली येथे “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा” हि रंगभूमीच्या अंगोपांगाचे शिक्षण देणारी अर्धव्यावसायिक संस्था आहे. या संस्थेतर्फे प्रामुख्याने ग्रीक नाटके, शेक्सपिअरची नाटके भारतीय भाषांत रुपांतरीत करून सादर केली जातात. १९६० मध्ये मराठीत स्वतंत्र गणले गेलेले नाटक काही व्यावसायिक नटांनी रंगभूमीवर आणले ते म्हणजे विनायक जनार्दन कीर्तने यांचे "थोरले माधवराव पेशवे" तर दीनबंधू मित्रांचे "नील दर्पण" या द्वारे तत्कालीन समाजजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या नाट्यकर्त्याचा एक वर्ग निर्माण झाला.         

आधुनिक मराठी रंगभूमीचे शिलेदार 

                      महाराष्ट्रात प्रतीभाशाली नाटककार आचार्य अत्रे यांची लब्ध प्रतीष्ठांच्या कोरडे ओढीत भरपूर हसवणारी आनंद्पार्यावसायी नाटके हि गाजली. त्यांना साष्टांग नमस्कार या  त्यांचे  तो मी नव्हेचहे फिरत्या रंगमंचाचा वापर करणारे मराठीमधील पहिले नाटक आहे. पु. ल. देशपांडे हे मुंबई मराठी साहित्य संघातून उद्याला आले. त्यांची तीन पैशाचा तमाशा, अंमलदार सुंदर मी होणारइ. नाटके गाजली. तर तुझे आहे तुझपाशी ह्या नाटकाने साहित्य क्षेत्रात खळबळ माजविली तर कुसूमाग्रज यांना नटसम्राट १९७४ साली साहित्य अकादमी अवार्ड मिळाला. चिं, त्र्यं. खानोलकर यांचे १९६६ मधे एक शून्य बाजीरावहे नाटक रंगभूमीवर आले. बाळ कोल्हटकर यांची वाहतो हि दुर्व्याची जुडी आणि वेगळा व्हायचा आहे मला हि नाटके गाजली.  

       वसंत कानेटकर यांच्या रायगडला जेव्हा जाग येते या नाटकाने सर्वांची झोप उडवली. तर त्यांच्या अश्रूंची झाली फुले या नाटकावर आधारित हिंदी चित्रपट निघाला. विजय तेंडूलकर यांच्या  'शांतता  कोर्ट  चालू  आहे'  यासारख्या  नाटकातून  समाजाला  प्रसंगी  बंडखोर वाटणार्‍या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. तर जयवंत दळवी यांचे पुरुष हे नाटक गाजले पुढे या नाटकावर आधारित हिंदी चित्रपट हि निघाला आहे. यानंतर मो. ग. रांगणेकर यांनी नाट्यनिकेतनया आपल्या संस्थेची स्थापना करुन स्वत::ची नाटके रंगमंचावर आणली. आपल्या नाटकांतून त्यांनी मध्यमवर्गीय मराठी माणसाला जवळचे वाटणारे विषय मांडले.आशीर्वादनाटकातून मिळवत्या मुलीचा प्रश्र्न किंवा कुलवधूनाटकातून कलावंत स्त्रीचा प्रश्र्न त्यांनी मांडला. विद्याधर गोखले यांनी रंगशारदा प्रतिष्ठानची स्थापना करून त्याद्वारे आपले नाटके रंगभूमीवर आणली. 

                त्रिधारा या नाटय़ प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत. रुद्रवर्षां,  वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, गाबरे, सुलतान (संग्रह एकांकिका) हि एलकुंचवारांची गाजलेली नाटके आहेत. संगीत कट्या काळजात घुसलीया पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या नाटकांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. मधुकर तोरडमल यांचे तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक गाजले. चंद्रकांत कुलकर्णी, रत्नाकर मतकरी, शाम मनोहर, मधुसूधन कालेलकर अशी अनेक नावे घ्यावी लागतील. या सर्वांच्या लोकप्रियतेचा मराठी व्यावसायिक रंगभूमीला स्थैर्य मिळवून देण्यात फार मोठा हात आहे

           आधुनिक नाटकाकारांमध्ये प्रेमानंद गज्वी यांचे ‘गांधी आणि आंबेडकर’ हे नाटक, प्र. ल. मयेकर यांचे दीपस्तंभ व अग्नीपंख तसेच अशोक पाटोळे यांचे ‘आई रिटायर्ड होतेय हे गाजलेले नाटक.  सतीश आळेकरांनी समकालीन अनुभवातून, मराठी वातावरणातून निर्माण होणारी विसंगती महानिर्वाणसारख्या ’Dark Comedy’ तून व्यक्त केली.  गंगाराम गवाणकर यांचे “वस्त्रहरण”  व संतोष पवार यांचे “यदा कदाचित” हि फुल कॉमेडी नाटके, तर प्रशांत दळवी यांच्या “चारचौघी” व अजित दळवी यांच्या "डॉक्टर तुम्हीसुध्दा??" ने तर समाज जीवनात वादळ उठविले होते. त्यामुळे मराठी रंगभूमी हि समाज जीवनाचा आरसा ठरली.

       शरीर विज्ञानाच्या आधारे अभिनयावर प्रकाश टाकणाऱ्या स्टॅन  स्लालस्कीच्या द बिल्ड युअर कॅरक्टर चा प्रभाव अलीकडील अभिनयावर दिसतो. भरतच्या नाट्यशास्त्रात त्याज्य समजल्या जाणाऱ्या गोष्ठी आज रंगभूमीवर प्रामुख्याने आढळतात उदा. मृत्यू, शृंगार यांची रेलेचेल दिसते परंतु नाट्यशास्त्रातील अनेक नियम पाळले जातात. हा नव्या- जुन्या तत्वांचा संगम आधुनिक रंगभूमीवर आपणास बघायला मिळतो.  मराठी रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यवसायिक असाह दोन्ही प्रकारची नाटके सादर केली जात असली तरी नाटक हे समाजमनाचा आरसा मानले गेले आहे आणि त्यामुळे समाजातील अनेक विषय रंगमंचावर मांडले गेले. एखाद्या गोष्टीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नाटकाचा वापर करावा की केवळ मनोरंजन म्हणून नाटक असावे. हे प्रत्त्येकाचे वैयक्तिक मत आहे. एकूणच अनेक बदल घडूनही रंगभूमीची लोकप्रियता कायम आहे व राहील.

समाप्त 


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

 1. छान लिहिलं आहेस निवी... अभ्यासपूर्ण.. आणि भरपूर नवीन माहिती समजली...

  ReplyDelete
 2. मस्त.

  अभ्यासपूर्णे लेखन. :) खूप उजळणी झाली.

  ReplyDelete
 3. आवडेश! बरिच काय भरपुर माहिती मिळाली. दोन्ही भाग एकामागोमाग वाचून काढले! मनापासून आवडले!

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................