प्रवाहातील रंगभूमी.....................१


         “रंगभूमी” हा विषय खरतर गतवर्षी आंतरजालावर भटकंती (सर्फिंग) चालू असताना डोक्यात आलेला. परंतु हा विषय इतका मोठा हे कि डोक्यात आला आणि लगेच लिहून अनुदिनीवर पोस्टवला असं करू शकत नाही. म्हणून ह्या विषयाचा अभ्यास करायचा ठरवलं. अभ्यास तसा अजूनही अपूर्णच आहे. परंतु गेल्या वर्षभरात जो काही अभ्यास केला, त्या आधारे हा ब्लॉग लिहितेय, हो पोस्ट म्हणजे फक्त रंगभूमीच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा प्रवाह आहे, डीटेल मध्ये लिहायचे झाले तर यात दिलेल्या प्रत्येक मुद्यांवर एक स्वतंत्र पोस्ट लिहावी लागेल. रंगभूमीचा प्रवाह लिहिलेला असल्याने ह्या पोस्टला “प्रवाहातील रंगभूमी” असे नाव दिले आहे. ह्या साठी आंतरजालावरून बरेच संदर्भ  घेतले आहेत. हा प्रवाह लिहिण्यासाठी केलेल्या अभ्यासावर एक नवीन पोस्ट टाकू शकेन असो मी आत्ता इकडे तुम्हाला जास्त बोर न करता सुरुवात करते. काही उल्लेख अनवधानाने राहिले असल्यास लक्षात आणून द्यावेत आणि चुकीबद्दल क्षमा असावी. लेख खूप मोठा झाल्याने २ भागात देते आहे. 

        गेली अनेक शतके भारतीय रंगभूमी म्हणजे संस्कृत रंगभूमी असे मानण्यात येत असे. पण आता किमान २० भाषांतील रंगभूमी असे तिचे स्थित्यंतर झाले आहे. भारतीय रंगभूमीची सुरुवात कुठून झाली ते नक्की सांगता येत नाही. पण अनुकरण करणे आणि आनंद वाटणे या मनुष्याच्या सहजप्रवृत्ती आहेत. त्याअर्थी माणसाच्या जन्माबरोबरच नाट्याचा जन्म झाला असला पाहिजे. नाट्याचा उगम कदाचित सामुहिक कलेत विकसित झालेल्या नाट्याचा आरंभ असावा.

          नाट्य शास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्य शास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २००च्या दरम्यान नाट्यशास्त्राची निर्मिती केली गेल्याचे कळते. भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात.भरत मुनींनी संस्कृत मध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागात विभागणी केली आहे. भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे. हाच "पाचवा वेद" होय. ह्या वेदाचा अधिकार शूद्रांना सुद्धा दिला होता. भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे. हाच "पाचवा वेद" होय. ह्या वेदाचा अधिकार शूद्रांना सुद्धा दिला होता.

नाट्योत्सव सुवर्णयुग

         पूर्वीच्या भास व भवभूतीच्या नाटकांद्वारे असे प्रत्ययास आले कि राज्यारोहण - जन्मदिवस- युद्धात विजय - वसंतोत्सव- विवाह- यात्रा आदि प्रसंगी नाट्य प्रयोग केले जात. देवालयाच्या आवारात, उघड्या मैदानात, नाटक केली जात. ते पाहायला सर्व जातींच्या लोकांची झुंबड उडे. यावरून पूर्वीच्या काळी भारतीय रंगभूमीचा धर्माशी काडीमात्र संबंध उलट नाटक सर्वमान्य जनतेच्या सामाजिक, संस्कृतीक व आर्थिक जीवनातील एक महत्वाचा घटक मानण्यात येत असे. नाट्यगृहाची उभारणी ज्या दोरीच्या मोजमापाच्या सहाय्याने केली जाई त्याला सुत म्हणजेच सूत्र असे नाव होते त्यावरूनच सूत्रधार शब्द बनला. येथे सूत्रधार म्हणजे नाट्य मंडपाची आखणी करतो तोच पुढे नाटकाचा निर्माता- व्यवस्थापक होतो. नटांनी अभिनयात तरबेज असावे, म्हणून नाट्यविषयाच्या आंगोपांगाचे तपशीलासह इतके विस्तृत विवेचन "नाट्यशास्त्रात" भरतमुनींनी केले आहे. त्याला आजही तोड नाही. अगदी लेखकांनी नाटक कसे लिहावे व प्रेक्षकांनी ते कसे पहावे याचेही मार्गदर्शन त्यात केले आहे. 

          नाट्यशास्त्राचे ठरीव नियम व रूढ संकेत न जुमानणारा "भास" स्वयंभू नाटक कलाकार होता. तर कालिदास विदग्ध - व्युत्पन्न व कसलेला कलावंत होता. भासाने आपली कथानके महाभारतावरून निवडली होती तर कालिदासाने पुरण वाड्मयाकडे आपले लक्ष वळविले. त्या नंतरचा मोठा नाटककार भवभूती (इ.स. सातवे शतक) त्याने "मालती माधव" महावीरचीत व उत्तररामरचित अशी ३ नाटके लिहिली त्या नंतर राजकीय विषयावर विशाखादत्त याने "मुद्राराक्षस" हे एकच नाटक लिहिले. जगातील सर्वश्रेष्ठ नाटकात ज्याची गणना होते, "मृच्छकटिक" (मातीचा गाडा) ते शूद्रक नावाच्या राजाने लिहिले होते असे मानले जाते. एकूण भास, कालिदास, भवभूती, विशाखादत्त, शूद्रक ह्यांनी नाट्य वाड्मयात सुवर्णयुग निर्माण केले होते.

नाट्यप्रयोगाचे सादरीकरण


                  बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा नाटकावर प्रतिकूल परिणाम झाला, तो असा कि, नाट्यशास्त्रात म्हटले आहे कि , स्त्री पात्राच्या भूमिका स्त्रीयानीच कराव्या. त्यामुळे मुख्य नटी किंवा नर्तीकेला विशेष स्वरूपाचा राजाश्रय हि मिळत असे. त्यामागचा उद्देश तिचे कलाशिक्षण प्रापंचिक अडथळे न येता चालावे हा होता. पण पुढे बदलत्या काळात स्त्री भूमिका करणार्‍या नटीना राजाश्रयाऐवजी देव्लायाचा आश्रय मिळू लागला आणि म्हणून त्यांना पुढे 'देवदासी' हि संज्ञा मिळाली.

चारण, संत, कीर्तनकार यांचा आधुनिक भारतीय रंगभूमीच्या प्रारंभावर फार मोठा प्रभाव पडला होता. लोकनाट्य निर्मितेच हेच मुख्य घटक होते. या प्रचलित लोकनाट्यात ग्राम्य भाषेतील चटकदारपणा, कल्पकता व बुद्धिमत्ता हि वैशिष्ट्ये आजही टिकून राहिली आहेत. सुप्रसिद्ध संत कवी चैतन्य ( इ. स. १४८६ ते १५३४) यांनी तत्कालीन "यात्रा" नावाच्या लोकनाट्यात चैतन्य ओतले. पण या कालखंडात नाट्यशास्त्रात सांगितलेली एक परंपरा पाळली गेली नाही. जवळ-जवळ संपूर्ण देशात तिची उपेक्षा झाली, ती परंपरा म्हणजे स्त्री पत्राची भूमिका स्त्रीनेच करावी. 

रंगभूमीची लोकप्रियता वाढत चालल्याने धार्मिक पौराणिक कथानका ऐवजी चालू विषयांवर भर देण्यात आला. त्यातूनच काश्मीरचे "भांड" व "दर्जा पाथेर" ची निर्मिती झाली. तर या नंतरच्या काळात महाराष्ट्रात "तमाशा" हा अत्यंत लोकप्रिय असा लोकनाट्याचा प्रकार रूढ झाला. वाटचालीवर लक्ष दिले तर दिसून येईल १७ व्या शतकापर्यंत लोकनाट्य स्थिर होऊन संस्कृत नाटके काळाच्या पडद्याआड गेल्याचे दिसून येईल. 

आधुनिक भारतीय रंगभूमीचे बीजारोपण कसे झाले ते नक्की सांगता येत नाही. पण भारतावर ब्रिटिशांनी वर्चस्व स्थापिले तेव्हा जुन्या परंपरा पासून दूर गेलेला भारतीय त्याचे अनुकरण करू लागला. अशा पार्श्वभूमीवर गोकालनाथ दास व हेरासिम लेबडेक यांनी " लव इस द बेस्ट डॉक्टर" व "डीसगारिग्ज" या सुरवात नाटकांचे बंगालीत भाषांतर केले. त्यापैकी दास बंगाली होता व लेबडेक रशियन होता. त्यांचा बंगाली रंगभूमी स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला.  नवीन सुधारकी विचारांना वाचा फोडणारे पहिले बंगाली नाटक "कुलीन कुल सर्वस्व" हे पंडित रामनारायण तर्करत्न यांनी बहुपत्नीकत्वाचा निषेध करण्यासाठी लिहिले. अशा त~हेने समाज सुधारणेची चळवळ रंगभूमिपर्यंत पोहोचली. 




क्रमशः

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!