महाराष्ट्र हे अनेक गुणांनी समृद्ध असे राज्य आहे. इथे महाभारतातील पुरातन वस्तूपासून ते तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली, छत्रपती शिवाजी महाराज, ब्रिटीशांचे राज्य यांच्या गाथा, कथा योग्य जपून ठेवल्या आहेत. तसेच सांस्कृतिक व कलाक्षेत्रातसुद्धा महाराष्ट्र मागे नाही. अभंग, पोवाडा, भारुड, नमन, गोंधळ असे अनेक वेगवेगळ्या लोककला अजूनही प्रसिद्ध व जपून ठेवल्या आहेत. गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ठाणे जिल्हा आहे. येथे "वारली" म्हणून आदिवासी राहतात. त्यांच्याकडे चित्रकलेची एक वेगळी परंपरा त्यांनी अजूनही जपून ठेवली आहे. आज मुंबई व सुरात हि दोन प्रगत शहरे जवळ असल्यामुळे व या दोन शहरांच्या "cosmopolitan" होण्याने "वारली paintings " ना पुन्हा चांगले दिवस आले आहेत.
वारली चित्रकला हि साधारण १० व्या शतकात सुरु झाली असावी. त्यावेळी अक्षर नसल्यामुळे चित्रांद्वारे आपले विचार त्यावेळची लोक मांडत असावी. पण नंतरच्या काळात हि कला लुप्त होऊन पुन्हा १७ व्या शतकात सुरु झाली. पण अशीच चित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका गुफांमध्ये पाहायला मिळतात. या गुफांमधली चित्रे मनसे व जनावरांच्या चित्रांनी रंगवली आहेत. हि चित्रे "इड्स civilization " पासून सुरु झाली असावीत. पण काही तज्ञांच्या मते हि चित्रकला २५०० ते ३००० वर्षापूर्वी सुरु झाली असावी. या चित्रकलेद्वारे रोजच्या दिनक्रमाची व संस्कुतीची चित्रे रेखाटली जात असत. साधारण १९७० सालापासून वारली चित्रकलेला लग्नाच्या मंडपात, बंगल्यामध्ये सुशोभित करण्यासाठी वापरली जात आहे.
वारली हि जमात साधे व असलेल्या उत्पादनात सुखात व समाधानी राहतात. त्यांना आपल्या फावल्या वेळात चित्र रंगवायला आवडतात. चित्र रंगवायला पहिली पूर्ण भिंत शेणाने सरावली जाते. नंतर त्यावर गेरू (लाल रंगाची माती) ने सारवली जाते. ती संपूर्ण सुकल्यावर त्यावर तांदळाचे बारीक पीठ पाण्यात भिजवून त्याने चित्रे काढली जातात. वारली जमातीमध्ये २ चित्रे अत्यंत महत्वाची आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांचे "तारपा नृत्य" महत्वाच्या दिवशी करण्यात येते. याचे हे चित्र प्रत्येक भिंतीवर रेखाटली जातात. 'तारपा' हा मध्यभागी उभा राहून वाद्य वाजवत असतो व त्याच्याभोवती सर्व स्त्री - पुरुष नृत्य करीत असतात. नृत्य करताना नर्तक त्याच्याकडे पाठ करत नाहीत. या संपूर्ण नृत्याचे हुबेहूब चित्र प्रत्येक झोपडीवर रेखाटलेले असते. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये सरळ रेषा कधी वापरली जात नाही. त्रिकोण, गोल, फुले, पाने, झाडे, तीपके, एवढेच वापरून चित्रे काढण्यात येतात.
दुसरे महत्वाचे चित्र म्हणजे लग्नाच्या आधी स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवर "देवी पालघट" चे चित्र काढण्यात येते. हे चित्र काढण्यासाठी दोन विवाहित सुहासिनिना मध्याबघी चोकोन काढून त्यामध्ये "देवी पालघट" हिचे चित्र रेखाटले जाते. हि देवी म्हणजे शेतीची, धनाची व लग्नाची संमती देणारी देवी तिची पूजा व स्थापना या चित्राद्वारे दोन्ही लग्नघरी रेखाटून तिची संमती मिळवली जाते. त्या दोन सुवासिनींनी काढलेल्या देवीच्या चित्राभोवती गावातील अनेक सुवासिनी चित्र पूर्ण करण्यासाठी एकत्र जमतात व झाड, फुले. माणसे, हरण, मोर अशी विविध चित्रे काढून ते चित्र पूर्ण करण्यात येते. देवीच्या एका बाजूला पाच डोके असलेल्या घोड्यावर बसलेल्या व्यक्तीचे चित्र काढण्यात येते. त्याच्या पाठीमागे चंद्र, सूर्य, केळीची झाडे आदी चित्रे काढण्यात येतात. वारली जमातीमध्ये स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात पूज्य व आदरणीय स्थान मानले जाते. हे चित्र पूर्ण करायला गावातल्या सौभाग्यवती महिला अतिशय उत्सुक असतात. या चित्राचा अर्थ दोन व्यक्तींचे मिलन नसून संपूर्ण जातीचा एकत्रित सहभाग होय.
वारली चित्रकलेवर निसर्गाची मोठी पकड दिसून येते. सफेद रंग म्हणजे तांदळाच्या पीठाने बनवलेला रंग, शेणाने व गेरूने सारवलेली भिंत व चित्रांमध्ये दाट झाडी. फुले, पणे, जनावरे, सूर्य, चंद्र हे प्रामुख्याने दिसून येते. या चित्रामध्ये त्यांचे साधे राहणीमान व स्वभाव हेही दिसून येते.
साधारण १४ ते १६ व्या शतकामध्ये पर्शियन व मोघल कलाकृती प्रसिद्ध झाल्या. यात राजस्थानातील चित्रकलाही भारतात पसरली. बाकीच्या चित्रकलेत महागडी व कलाकुसर असलेली चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. पण वारली चित्रकलेत आपल्याला साधी, स्वस्त, सोपी व आकर्षक चित्रकला पाहायला मिळते महाराष्ट्राची अस्मिता असलेली हि चित्रकला जगभर आपले नाव गाजवतेय.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
वारली चित्रकलेवर एकदा TV वर प्रोग्राम बघितला होता ... चित्र काढण्याची STYLE मस्त सोपी असते
ReplyDeleteजास्तीत जास्त PATTERN STYLE वापरतात
अतिशय छान लेख... बर्याच गोष्टी नव्याने कळल्या! लिहित राहा! :)
ReplyDeleteवारली चित्रकले विषयी जी माहिती तू दिली आहेस ती अतिशय चांगली आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण ती पाहतो तेव्हा त्याची रंगत काही वेगळीच असते.
ReplyDeleteतसच तू ज्या पद्धतीने तिथे हि चित्रकला Explain केली आहे ते अप्रतिम, आणि धन्यवाद या पोस्टबद्दल
वारली चित्रकला ज्याने जगात पोहोचवली ते आदरणीय जिवा सोमा माशे .त्यांना फ्रान्समध्ये सन्मानित करण्यात अाले.
ReplyDelete