१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - १

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात राणी लक्ष्मीबाईसह अनेक रणरागीणींनी आपल्या प्राणाची बाजी लावली. अशा या  रणरागीणींचा इतिहास सांगणारी हि लेखमालिका मी ब्लोग वर प्रसिद्ध  करत आहे. 

१८५७ चे समर हे भारतीय स्वातंत्र्याचे युद्ध नव्हते तर ते केवळ शिपायांचे बंड होते असे मतलबी व स्वार्थी इंग्रज लेखकांनी लिहून ठेवले आणि भारत जोवर गुलाम होतं तोपर्यंत अनेक हिंदी लेखकांनीही त्यांचीच री ओढली हे सर्वाना ठावूक आहे. पण १९५७ साली या स्वातंत्र्य समराची शताब्दी साजरी करण्यात आली आणि पारतंत्र्याची शृंखला तोडणारा; आपले हिरावले गेलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी भारतीयांनी केलेला तो एक महान  स्वातंत्र्य- संग्राम होता यावर आपल्या शासनानेही शिक्कामोर्तब केले. 

या स्वातंत्र्य युद्धात स्त्रियांनी जे कर्तुत्व गाजविले त्याची खूप माहिती उपलब्ध झाली असली तरी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, अवधची बेगम हसरतमहल आणि दिल्लीच्या समर्थ बहादूरशहाची बेगम झीनतमहल यांची नवे तर अग्रणी आहेत. पण ज्यांची नामावली इतिहासात प्रसिद्ध नाही अश्या कितीतरी स्त्रिया १८५७ च्या रणांगणावर प्रत्यक्ष उतरल्या होत्या. 

१८५७ चा संग्राम हा १० मे १८५७ रोजी मेरठ येथे सुरु झाला हे सर्वाना ज्ञात आहे, पण ह्या उठवमागाची प्रेरणा स्त्रियांची होती हे कितीजणांना माहित आहे ? दिनांक ६ मे रोजी नवीन चरबीची काडतुसे मेरठच्या ९० हिंदुस्थानी शिपायांना आली व ती त्वरित वापरण्याचा हुकुम झाला. त्यापैकी ८५ सैनिकांनी हा हुकुम मान्य करण्याचे नाकारले. तेव्हा त्यांचे "Court Marshal" (लष्करी खटला) होऊन त्यांना आठ - आठ, दहा - दहा वर्षाच्या कैदेची शिक्षा थोतावण्यात आल्या दि. ९ मे रोजी कवायतीच्या मैदानावर इतर सर्व शिपायांबरोबर या ८५ शिपायानाही हजार करण्यात आले. त्यांचा गणवेश काढून घेण्यात आलं आणि त्यांच्या हात - पायात बेड्या ठोकण्यात आल्या आणि मोठ्या बंदोबस्ताने त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या प्रकाराने इतर  हिंदी शिपायांचे रक्त उसळून आले. पण प्रत्यक्षात ते काहीच करू शकले नाही. आपलं संताप त्यांनी मनातल्या मनात गिळला. 

मे च्या ९ तारखेला हि घटना वस्तुत: लष्करात घडली. हि कादेकोतातील वार्ता बाहेर काशी फुटली कोण जाणे? पण फुटली हे खरे! हां हां म्हणतं सर्व मेरठ शहरात पसरली. शहरातील बाजारात, घरांघरात, दुकानात, कट्ट्याकट्ट्यावर आणि प्रत्येक अड्ड्यावर एक चर्चेचा विषय बनली. हीच चर्चा स्वयंपाक घरातील स्त्रियांच्या चर्चेचा विषय बनली. आणि तीच चर्चा महिला वर्गात अधिक तीव्र झाली. या वरून हेच सिद्ध होते कि, महिला वर्गाचे किती लक्ष किती सावाधाणपणे लष्करातील घटनांवर होते! त्या किती जागरूक होत्या! भारतीय स्वत्वाचा उपमर्द त्यांना सहन झाला नाही. आणि ज्या दिवशी म्हणजेच ९ मे ला ८५ हिंदी सैनिकांना तोफांच्या दबावाखाली हातापायात लोखंडी बेड्या ठोकून तुरुंगात पाठविण्यात आले त्याच दिवशी ९ मे लाच संध्याकाळी जेव्हा लष्करातील शिपाई शहरात फेरफटका मारायला आले तेव्हा शहरातील वातावरण प्रक्षुब्ध असल्याचे दिसून आले. विशेषता: नगरवाशी महिला ते जेथे जातील तेथे त्यांचा धिक्कारच करू लागल्या. १८५७ च्या घटनांचा जो अधिकृत वृत्तांत J. C. Wilson याने लिहिला आहे त्यात मेरठच्या महिलांनी हिंदी शिपायांचा जो धिक्कार केला त्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. ' शहरात जेथे - जेथे  हे शिपाई गेले तेथे - तेथे नागरिक स्त्रियांनी त्यांचा धिक्कारच  केला आणि असे बोलून दाखविले कि, " तुमचे बंधू तिकडे तुरुंगात खितपत पडले असताना तुम्ही येथे बाजारात माशा मारीत आहात! धिक्कार असो तुमच्या जिण्याला! शिपायांच्या मनात आधीच विद्रोहाची भावना ठासून भरली होती. त्या भरलेल्या कोठ्रावार आगीची ठिणगी टाकण्याचे काम या प्रमाणे मेरठच्या महिलांनी केले.' 

अश्याप्रकारे महिलांचे बोलणे शिपायांच्या काळजालाच झोंबले. त्याच दिवशी रात्री त्यांनी छावणीत गुप्त सभा घेतल्या आणि दुसर्याच दिवशी त्यांनी उठावणी करण्याचा निर्णय घेतला.  तसेच त्वरित दिल्लीच्या हिंदुस्थानी शिपायांना निरोप पाठवण्यात आला कि " उद्याच मेरठ ताब्यात घेऊन आम्ही दिल्ली चालून येत आहोत. आणि मग ठरल्या प्रमाणे १० मे ला त्यांनी उठाव केला. इंग्रजांची घरे जाळली. लष्करावर ताबा मिळवला. तुरुंगाच्या भिंती फोडून आपल्या सैनिक बांधवाना मुक्त केले. सदर बाजाराची लूट केली आणि इंग्रजांचा "Union Jack" उतरवून स्वातंत्र्याचा हिरवा ध्वज उभारला. या एका दिवसातच मेरठच्या ब्रिटीश सत्तेचा विनाश करून व स्वातंत्र्य घोषित करून सर्व हिंदी सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले आणि येथून पुढे स्वातंत्र्य संग्रामाची सुरवात झाली. १० मे चा मेरठ उठाव घडवून आणण्यासाठी व स्वातंत्र्य संग्रामाचा मुळारंभ करून देण्यास तेथील महिला अश्या त-हेने कारणीभूत ठरल्या. 

ह्या सर्व महिलांनी जो हिंदी शिपायांचा तिरस्कार केला त्यात केव्हढा वणवा भडकविण्याचे सामर्थ्य होते हे ह्यावरून सिद्ध होत. या सर्व घरगुती महिला होत्या. त्यांनी स्वयंस्फूर्तीने सदर बाजारात उघड-उघड शिपायांचा तिरस्कार करून त्यांच्यातील स्वातंत्र्याचा  वणवा भाद्कावला. तेव्हा त्यांना इंग्रज सत्तेची भीती वाटली नाही. या १८५७ च्या स्वातंत्र्य समराला चेतवणार्या महिलांची नामावली कुठेच नाही. या मेरठच्या रणरागीणींना मनाचा मुजरा.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Comments

 1. खरच खूप छान आहे...
  वाचून मन भरून आले आणि अभिमानही वाटला कारण
  मी ज्या मातीती त्याच मातीत महिलांनी आपले रक्त
  सांडून स्वत्नत्र्य्साठी प्राण गमावले.....

  अश्या भगिनींना शत: शत: प्रणाम..

  ReplyDelete
 2. Tuje sagale lekh ekdam chant aahet ni me te satat vachat aahe. khrokhar tu khup chan lihites agadi pahilya sarakhi
  Khup Chan.

  From: Shailu

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................