ओल्या मातीचा सुगंध - २











त्याने bike चा वेग थोडासा वाढवला, आणि ती त्याला घट्ट बिलगून बसली. ती तशी बसलेली पाहून त्याने bike station कड़े वळवली. गाड़ी थांबली ती स्टेशन जवळ असलेल्या pay & park मध्ये. तिकडे गाड़ी ठेवली अणि ती दोघे हातात हात घालून स्टेशन च्या दिशेने निघाले. tickect house च्या जवळ आल्यावर तो तिला म्हणाला


तो : तुझ्याकडे coupns आहेत ना शोना!
ती : हो आहेत ना !
तो : ठीक आहे आपण mall मधे चाललोय.
अस बोलून त्याने तिने दिलेली coupns punch केली. व् ती दोघ पण train मधे चढले. 

आता पुढे 

************************************************************************


Train सुरु झाली. दुपारची वेळ असल्याने त्यांना window seat मिळाली. एकमेकांना खेटून , जग आपल्याकडे बघतंय ह्याची जाणीव त्यांच्या खिजगणतीतही नव्हती, एकमेकात हरवून गेलेले ते दोघे मात्र कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात होते; तरही ती जवळ असूनही आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा आनंद दिसत नव्हता.
तो : पिल्लू तुला त्रास होतोय का ग! 
ती : नाही मी ठीक आहे.
तो : एक काम कर तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोप तुला थोडं बरं वाटेल.
त्याच्या ह्या वाक्यावर ती फक्त हसली आणि आपला डोकं तिने त्याच्या खांद्यावर ठेवलं. त्याने तत्परतेने आपल हात तिच्या खांद्यावर टाकून पूर्णपणे नसलं तरी तिला कवेत घेतलं. 
तो : शोना तुझा cell देना, काही नं बोलता तिने bag मधून Cell कडून दिला. इकडे ट्रेन ने खांदेश्वर स्थानकात प्रवेश केला. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर असलं तरी तिचे डोळे खिडकीतून बाहेर बदलणाऱ्या वातावरणाचे वेध घेत होते. आकाशात हळू-हळू काळे ढग जमा होऊ लागले; इकडे earphone चा एक ear तिच्या कानात देवून त्याने दुसरा ear स्वतः च्या कानाला लावला, train मानसरोवर च्या परिसरात येईपर्यंत पावसाने हलके- हलके बरसायला सुरवात केली होती. अचानक तिच्या कानात स्वर गुंजले " अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे , आणि धुंदावती भाबडी लोचने" तसं तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावरून काढलं
तो: की झाला सोनू ?
ती : (नेहमीप्रमाणे हसून ) काही नाही. आपण door मध्ये जाऊया का उभं राहायला. ( श्वास गंधाळती, शब्द भांभावती , रोम- रोमातली कंपने बोलती. गाण्याचे स्वर अजूनही येत होतेच )
तो : नको काही गरज नाही , पिल्लू, आधीच तू आजारी आहेस त्यात बाहेर पाऊस पडतोय भिजलीस तर आणखीन आजारी पडशील ! (सांग ना रे मना, सांग ना रे मना , हे नवे भास अन ह्या नव्या चाहुली. गाण्याचे बोल तिच्या कानावर पडत होते.)
ती : (पाऊस पडताना बघून प्रफुल्लीत झालेला तिचं चेहरा पडला होता ) please जाऊ या ना. 
तो : नको शोना !
ती : बरं तुम्ही नका येऊ मला तरी जाऊ द्या ना please !
तो : शोना अगं (असा म्हणे पर्यंत ती door कडे निघाली सुद्धा) hey शोना थांब ना. मी पण येतो.
ती दारात पोहोचली तो पर्यंत train ने खारघर स्टेशन सोडून ती पुढच्या प्रवासाला लागली होती. हळू हळू पावसाचा जोर पण वाढत train बेलापूर स्टेशन मधून बाहेर पडली तसं तिने पावसाचा आनंद घेण्यासाठी हाथ बाहेर काढला. आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू पसरलं. काही सेकंदातच पावसाचा वेग वाढला तसं ती भिजू लागली ओल्या हाताने train च्या door मधल्या rod ला हाथ धरला आणि दुसरा हाथ बाहेर काढून ती येणाऱ्या पावसाचा आनंद घेऊ लागली. इकडे त्याने गण लावला होता ( तेरा होने लागा हूँ | ) त्याचा लक्ष तिच्याकडे गेलं तर ती लहान मुलांसारखी हातावर पडणाऱ्या पावसात खेळत होती. इतक्यात त्याच्या लक्षात आला कि ती आर्धी train च्या बाहेर आहे. आणि तिने एका हाताने rod पकडलाय; तो हात पण ओला आहे. कधी पण सरकू शकतो. त्या दोन seconds  मध्ये त्याच्या मनात अनेक विचार येऊन गेले. आणि तळमळीने तो तिला ओरडला 
तो : शोना ! नीट हात पकड गं ! सटकला तर काय होईल?
ती : काही होणार नाही मी खाली पडेन !
तो : शोना ! त्या आधी मी जातो ना 
ती : R U mad ? तुमच्या आधी मी जाणार! 
तो : गप्पं बस ना शोना हे बोलायलाच हवं का? 
तसं तिने आपलं नेहमीचा खोडकर हसू चेहऱ्यावर आणून म्हणाली.Sorry , love U, आणि अचानक एक आवाज झाला त्या आवाजाबरोबर 
ती : ( ओरडली ) आई गं !


क्रमश:

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Comments

  1. sundar rachna.,,,

    aapratim ....

    no wordz for "OLYA MATICHA SUGANDHA"

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!