ओल्या मातीचा सुगंध - १

जून महिन्याच्या सकाळी ११:०० ची वेळ; बाहेर पावसाचे दिवस असून पण कडकडीत उन पडलेले. आत laptop वर mail check करीत असतानाच त्याचा mobile vibrate झाला. बघितलं तर display वर तिचा number flash होत होता. त्याने call उचलून सुरुवात केली.
तो : hello शोना.
ती : ( एकदम मंद सुरतला कोमेजलेला आवाज) hello मी बोलतेय! मी घरी जाणार आहे आज half day  ने कारण i m not   feeling well .   चक्कर आल्यासारखा वाटतंय थोडासा काम आहे ते संपवून मी निघतेय.
तो :  hey Shona R U OK ना माझी पिल्लू . मी आत्ता तिकडे असतो ना तर तुला घट्ट मिठीत घेतली असती. काळजी घे ना बच्चू. 
ती : भेटू शकता का मला थोड्यावेळासाठी तुम्ही सोबत असाल तर मग माझी काळजी तरी घ्याल.
तो : ठीक आहे शोना तू ऑफिस मधून निघाली कि call कर मला.
bus डेपो दुपारचा २ वाजले तरी तिचा पत्ता नव्हता; त्यात low battery मुळे त्याचा cell switch off झालेला. phone बंद होण्यापूर्वी शेवटचे बोलणे एक तासापूर्वी झालेलं कि ५ मिनिटात निघते म्हणून; अजून पोहोचली नाही. रस्त्यात काही तिला झाला तर नाही ना त्याच्या मनाची घालमेल चालू झाली आणि आपसूक त्याची पावले समोरच्या PCO कडे वळली. तिचा नं. dial केला. इकडे ती डेपोत येऊन पोहोचली आणि तिला समोरच त्याची गाडी दिसली. ती गाडी जवळ पोहोचते तो पर्यंत तिचा cell वाजायला लागतो ती call pick up करते तोच त्याचा काळजीतला स्वर 
तो : शोना कुठे आहेस गं !
ती : आपल्या गाडीजवळ उभी आहे.
तो : ठीक आहे. मी येतो.
त्याला बघताच वेदनेत ही  तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा झळकते. त्याच्या चेहऱ्यावर मात्र लहान मुलासारखा निरागस हसू  पसरतं  व तो धावतच येतो.   
 तो : शोना खूप त्रास होतोय का ? इतकी मलूल का दिसतेस ?
ती : नाही ओ ! मी ठीक आहे .
तो : बर कुठे जायचं?
ती : कुठे हि चला मला इकडे उन्हाचा त्रास होत आहे.  
तो : sorry ! चल बस गाडीवर. ( गाडी start करतो) 
ती : कुठे चाललोय आपण ?
तो : तुला उन्हाचा त्रास होऊ नये ना म्हणून naturals (Ice cream Parlour ) मध्ये चाललोय 
ती : बर ठीक आहे.  
 तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिला naturals (Ice cream Parlour ) मध्ये तो तिला घेऊन गेला व तिने सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून तिला बळेबळेच ice - creame खायला लावली. ती खाताना पण तिला त्रास होत होता. म्हणून तिने पाणी मागितले. त्याने पण तत्परतेने तिला पाणी आणून दिले. कसं- बस  ice - creame संपवल्यावर ती दोघे निघाले AC  तून बाहेर निघाल्याने उन्हाचे चटके अधिक तीव्रतेने जाणवायला लागले होते.
तो: घरी जायचा आहे का तुला पिल्लू ?
ती: असा काही नाही. तुमच्या सोबत खुप बर वाटतय.
तस त्याने bike चा वेग थोडासा वाढवला, आणि ती त्याला घट्ट बिलगून बसली. ती तशी बसलेली पाहून त्याने bike station कड़े वळवली. गाड़ी थांबली ती स्टेशन जवळ असलेल्या pay & park मध्ये.  तिकडे गाड़ी ठेवली अणि ती दोघे हातात हात घालून स्टेशन च्या दिशेने निघाले. tickect house च्या जवळ आल्यावर तो तिला म्हणाला
तो : तुझ्याकडे coupns आहेत ना शोना!
ती : हो आहेत ना !
तो : ठीक आहे आपण mall मधे चाललोय.
अस बोलून त्याने तिने दिलेली coupns punch केली. व् ती दोघ पण train मधे चढले.   


क्रमश: 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Comments

  1. apratim, thodach nahi, kharach shabdach nahit majhykade. keep it up

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!