Sunday, June 20, 2010

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

Friends "HAPPY FATHER'S DAY ".   "वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे" हे title बघून थोडं आश्चर्य वाटले ना कि वडील आणि गोड गऱ्या सारखे? वडील तर किती खडूस असतात. ओरडतात , अभ्यास नाही केलं म्हणून मारतात पण अजिबात काळजी करत नाही. आई काशी चांगल - चांगलं खाऊ देते. प्रेमाने समजावते. आई म्हणजे ज्योत जी घराला प्रकाश देते; पण त्या ज्योतीला आधार देणाऱ्या समईला आपण सोयीस्कररित्या विसरतो. पण प्रत्यक्षात समईवरच जास्त ताण पडतो. हे आपण कधी लक्षातच घेत नाही. आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ आहे. पहिलटकरणीचे कौतुक होते; पण त्याच वेळी हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे फेऱ्या घालणारे वडील कोण बघतच नाही. 
आजारी पडल्यावर दिवसभर जवळ बसणारी आई दिसते पण ऑफिस मधून ४ वेळा phone करून तब्येत विचारणारे, 'जास्त बर नसेल तर डॉक्टर कडे घेऊन जा.' ' झोपला / झोपली का नीट त्रास होत नाही आहे ना ' म्हणून विचारणारे बाबा कधी आठवतच नाहीत. रात्री झोपेत आपल्याला थोडा जरी  त्रास झाला तर पटकन उठून बघणारे आणि आईला सांगणारे कि ," बघ गं काय झालाय ते"  असे बाबा . खाऊ देणारी आई दिसते पण तोच खाऊ कामावरून सुटल्यावर आठवणीने आणून आईकडे देणारे व सगळ्यांना सारखा दे म्हणून सांगणारे बाबा दिसतच नाहीत." पप्पा, मला नवीन बूट हवेत ! " असा हट्ट केला कि " ठीक आहे. बघू " बोलणारे आणि आपल्या नकळत आईकडे पैसे देताना बजावून सांगणारे कि " त्याला हवे ते बूट घेऊ दे . उगाच ओरडू नको मी माझ्यासाठी घेईन नंतर. " आपले बाबाच असतात.दिवाळीला नवीन कपडे घेताना " मी आत्ताच नवीन घेतलेत तेव्हा मुलांना नवीन कपडे घेऊया" म्हणून स्वत: जुने कपडे वापरून मुलांसाठी नवे कपडे, फटाके घेणारे आपलेच बाबा असतात ना. स्वत: काही न बोलता मुलांचा शिक्षणाचा खर्च, pocketmoney , कपडे, ई. सगळे कोणतीही अपेक्षा न ठेवता करणारे आपलेच बाबा असतात.   
कुठे पडलो किंवा खरचटले कि लगेच तोंडातून निघत "आई गं!" पण मोठ्या अपघातातून वाचलो कि " बाप रे!" असे उद्गार तोंडातून निघतात. कारण छोट्या संकटांसाठी आई आठवत असली तरी मोठी वादळे पेलताना बाबांची साथ लागते. आई रडते म्हणून तिचं दुख: दिसत पण बाबा रडत नाहीत तर संयमाने वागून पूर्ण परिस्थिती सावरतात दुख: त्यांना पण होत असतं पण ते दाखवत नाहीत.
माझे दादा पण अशेच आहेत. दादा म्हणजे माझे वडील मी त्यांना दादा म्हणते. खरं तर ते घरात सगळ्यात मोठे त्यामुळे सगळे त्यांना दादा हाक मारत त्यामुळे आम्ही पण दादा हाक मारायला शिकलो. आज मी हा ब्लोग लिहिती आहे ना तो पण त्यांच्या मुळे, त्यांनी मला ब्लोग लिहायला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले आहे ( अप्रत्यक्षपणे कारण त्यांना माहित पण नाही मी हा ब्लोग लिहिते पण माझी लेखनकला हि त्यांची देणगी आहे.) असा म्हटलं जाता कि आई हि प्रथम गुरु असते पण मी गर्वाने सांगते कि माझे दादा माझे  प्रथम गुरु आहेत. त्यांच्या मुळे मी एक वक्ती होऊ शकली. आज पर्यंत खूप वक्तृत्व स्पर्धा केल्या काहींमध्ये बक्षिसे पण मिळाली. वयाच्या ३ वर्ष्या पासून ह्या स्पर्धा करते आहे. ह्याचा श्रेय माझ्या दादांना जातं. त्यांच्या मुळे मला लेखन करण्याची पण सवय लागली. माझे दादा म्हणजे एक अजब रसायन totally unpredictable पण तरीही मनाने श्रीमंत दारात शत्रू जरी उभं राहिला तरी त्यःच्या स्वागताला धावून जाणारे.  हेच संस्कार आमच्यातही उतरवले आणि आम्हाला कळलं पण नाही. 
माझ्या लहान पाणी मी आई- दादांसोबत झोपायची तेव्हा light कोण घालवणार म्हणून माझ्याशी खोटं- खोटं भांडणारे दादा आजही आठवतात पण आत्ता भांडायला मिळत नाही ( कारण बेडरूम वेगळी केली ना) आता मोठी झाली ना! पण आजही त्यांच्या सोबत "TOM & JERRY" बघताना केलेली "TOM & JERRY" सारखी केलेली मस्ती लहानपणाची आठवण करून देते. आम्ही दोन्ही भावंड म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघे पण दादांजवळ जास्त असतो काही काम असले तरी दादा. आई तर सांगते कि generally लहानपणी मुलं आईच्या नावाने रडतात. मी तर तशी पण खूप कमी रडायची ती पण दादांच्या नावाने. 


"HAPPY FATHER'S DAY "
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Friday, June 18, 2010

ओल्या मातीचा सुगंध -अंतिम









तो : शोना ! नीट हात पकड गं ! सटकला  तर काय होईल?
ती : काही होणार नाही मी खाली पडेन !
तो : शोना ! त्या आधी मी जातो ना 
ती : R U mad ? तुमच्या आधी मी जाणार! 
तो : गप्पं बस ना शोना हे बोलायलाच हवं का? 
तसं तिने आपलं नेहमीचा खोडकर हसू चेहऱ्यावर आणून sorry म्हणाली. love उ, आणि अचानक एक आवाज झाला त्या आवाजाबरोबर  

आता पुढे
*************************************************************************************************************

ती : ( ओरडली ) आई गं !  अश्या अवतारात तुम्ही माझा फोटो काढलात.
तो : असा अवतारात म्हणजे काय शोना ? u always look beautiful . पावसात भिजल्यावर माझी शोना तर एकदम सुंदर दिसू लागली आहे ( असा बोलत असतानाच त्याने तिच्या चेहऱ्यावरचे  बदलणारे भाव पटापट cam मध्ये टिपले. जसा पावसाचा जोर कमी जास्त होत होता तसाच ते एकमेकात हरवत होते हळू - हळू ट्रेन मधली गर्दी वाढत होती तशी मग ती door मध्ये मस्ती करणं थांबवून एका कोपर्यात उभी राहिली तसा तो पण सावरला आणि तिला गर्दीचा त्रास होणार नाही किंवा कोणाचा धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेवून तो बरोबर तिच्यासमोर उभं राहून तिला cover up केलं. 
तो: शोना पावसामुळे तुझा चेहरा किती खुलला आहे गं!
ती: मी आहेच पावूस वेडी ! पण तुम्ही भिजू नका नाहीतर सर्दी होईल तुम्हाला!
तो : बरं शोना नाही भिजणार 
ती :पिल्लू तुम्ही माझे pics काढलेत ना; बघू दाखवा ना plz 
तो: दाखवतो  ना शोना काय घाई आहे का बघ आत्ता आपला स्टेशन येईल mall मध्ये गेल्यावर बघ ना निवांतपणे गाडी ने हळू हळू स्टेशन मध्ये enter करायला सुरवात केली. ती दोघे पण हातात हात घालून उतरले.  तसा ती त्याला खेटूनच चालू लागली. 
तो: मला sim card  घ्यायचं आहे भावासाठी थोडं वेळ लागेल चालेल ना 
ती : त्यात काय विचारायचं.
तो : शोना बाहेर पाऊस बघ किती जोरात पडतोय 
ती : पिल्लू तुम्ही सांभाळून; भिजलात कि सर्दी होते तुम्हाला 
तो : अगं शोना नाही होणार काही. तू tension घेऊ (काहीतरी विसरलेला लक्षात येवून.) शोना आधी license च्या xerox घ्याव्या लागतील.
ती: ठीक आहे पिल्लू. तुम्ही पहिले हि कॅप डोक्यावर घाला म्हणजे डोकं तरी जास्त भिजणार नाही.
समोरच असलेल्या xerox च्या दुकानातून xerox घेऊन opposite side असलेल्या the mobile store मध्ये जाण्यास निघाले. पुढून वळसा घेऊन चालत जाण्यापेक्षा त्याने समोरचा divider cross करून जाण पसंत केलं कारण त्यामुळे त्यांचा फेरा वाचणार होता. पण दिविदेर उंच असल्याने तिला चढायला कठीण जात होता. चढायला - उतरायला हात दिला जशी ती उतरली तसा तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलकेच जवळ ओढून त्याने प्रेमाने विचारले 
तो   : शोना तुला त्रास नाही ना झाला i m sorry माझ्या लक्षातच नाही आलं कि तो divider तुझ्यासाठी उंच पडेल.
ती  : (उत्तरादाखल गोड हसून) जाऊ द्या हो! 
ती दोघंपण तशीच हसत the mobile store मध्ये दाखल झाले. त्याने TATA Docomo चे sim विचारले. हवा तो no . select   केल्यावर त्या attender ने scheme सांगितली कि Rs . १०/- extra pay करा तुम्हाला Loop चा sim मिळेल. मग त्याने एक मस्त no . शोधून  घेतला तसा तिने पण हट्ट सुरु केलं मला पण पाहिजे. तिच्याकडे documents नसल्याने तिच्या हट्टासाठी  त्याने स्वत:च्या  documents वर तिच्यासाठी पण card घेतलं. पैसे paid करून ते बाहेर पडताना 
ती  : आत्ता mall मध्ये जाऊया
तो : ठीक आहे.
इतक्यात तिचे लक्ष घड्याळाकडे जाते बघते तर काय ४:३० वाजले. 
ती: अरे बापरे! आपल्याला निघायला हवं ४:३० आपल्याला निघायला हवं. तुम्हाला ५:३० पर्यंत घरी पोहोचायचं होता ना मग आत्ता आपल्याला निघावा लागेल 
तो: हम्म काय करूया? घरी जायला निघूया?
ती : ठीक आहे चालेल (चेहरा मात्र हिरमुसलेला )
तो : नको आपण mall मध्ये जाऊया. ५ किंवा ५:१५ पर्यंत निघूया 
ती : पण mumma ओरडेल ना तुम्हाला
तो: जाऊ दे गं चल; ते चालायचंच. तू सकाळपासून काही खाल्लं पण नाहीस थोडं खावून घे मग निघू. 
ती : ठीक आहे पिल्लू !
तसा ती दोघं हातात - हात घालून चालू लागली अचानक त्याने तिच्या हातातून हात सोडवून घेतला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून तिला हलकेच कवेत घेतलं आणि चालू लागला. स्टेशन पासून Inorbit Mall ५ मिनिटावर आहे. तिकडे पोहचल्यावर. but obvoius तिने काही खाल्लं नव्हता so ते food mall कडे वळले. तिकडे गेल्यावर बरेच म्हणजे burger , Chinese , वगेरे रेजेच्त केल्यावर इंडिअन फूड खायचं ठरला तरी काय खावूया मग पाणीपुरी, पावभाजी असे पर्याय पण reject करत शेवटी veg - बिर्याणी खावी ठरले. तो पर्यंत ५:०० वाजले होते. ५ वाजले बिर्याणी येईपर्यंत ५:१५ होणार मग कसं करणार.
तो : पिल्लू तू टिफिन आणला आहेस ना आज 
ती  : हो, 
तो : काय आहे ?
ती: तुम्हाला आवडता ते फिश आहे.
तो : पिल्लू मला फिश आवडतात पण तुला माहित आहे ना आजच्या दिवशी मी फिश खात नाही ते 
ती : oh !sorry i forgot .
तो: नो need to say sorry बच्चा, अच्छा  पिल्लू तू फिश खा मी बिर्याणी खातो
उत्तरादाखल ती फक्त हसली. इतक्यात veg - बिर्याणी की order आली. तो पर्यंत तिचं थोड खाऊन  झालं होतं. बिर्याणीचा वास नाकात गेला. तश्यात टिफिन मधला जेवण थंड झालं होतं. गरम - गरम बिर्याणीचा खमंग वास. तिला टिफिन side ला ठेवून बिर्याणी  खायची इच्छा झाली.
ती   : पिल्लू मी बिर्याणी खाऊ 
तो : खा ना बच्चा त्यात की विचारायचं आपल्यासाठी मागवली आहे ना शोना ! आणि आपण दोघे काय वेगळे आहोत का एकमेकांपासून 
ती: नाही रे बच्चा sorry  मी आलेच. 
असा म्हणून ती पळाली. एक २ minutes मध्ये return पण आली. 
तो  : ए शोना कुठे गेली पळत - पळत तुला बरं वाटत नाही आहे आणि तुझी काय धडपड चालू आहे शांत बस ना पिल्लू 
ती: बच्चू हात धुवायला गेली होती फिश खाल्लं ना आणि तुम्ही फिश खाणार नाही ना मग काय तुम्ही पण 
असाच हसत खेळत आपल्या future च्या गप्पा मारत बिर्याणी वर ताव मारला. बिर्याणी संपल्यावर घड्याळ बघितले तर ५:३० होत आले होते. तसा त्यांच्या लक्षात आलं कि आत्ता आपल्याला उशीर होतोय.तसे सलग पटापट उरकून ते स्टेशन कडे निघाले बाहेर येऊन बघतात तर काय पाऊस पडतोय. 
ती : पिल्लू चला पाऊस नाही पडत आहे.
तो  : पण शोना हे पाणी पडतंय ते बघ ना 
ती: काही नाही 
चला असा बोलून ती पुढे चालू लागली. 
तो: ये शोना मी पण येतो थांब ना किती घाई  करते
तशी ती दोघं हे स्टेशन च्या दिशेने चालू लागली. स्टेशन पोहोचाच coupans check केले तर ते संपले होते मग ticket साठी line लावण्यापेक्षा coupns घेऊन ते ट्रेन पकडायला निघाले बघितलं लागलेली ट्रेन बेलापूर होती so पनवेल साठी wait कारण भाग होतं. तश्यात तिचे पाय दुखत होते म्हणून तिला बसायचा होतं पण स्टेशन वरचे benches पण full होते म्हणून मग तिला कट्ट्यावर बसायचं होतं , पण तिची हेईघ्त कमी पडत होती काय करणार ह्या विचारात असतानाच त्याने कोणाच्याही लक्षात येण्या आधी  तिला अलगद उचलून तिकडे बसवलं प्रथम तिला पण लक्षात नाही आलं काय झालं ते. जेव्हा कळलं तेव्हा लाजून thanks म्हणली. बेलापूर गाडी जाऊन जशी पनवेल गाडीची announcement झाली. तशी ती खाली उतरली. आणि त्याचा हात धरून राहिली.
तो  : शोना पनवेल गाडीला खूप गर्दी असेल तू ladies compartment मध्ये जा.
ती : मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही 
जसा ट्रेन ने enter केलं तसा ते दोघे समोरच थोडं रिकामा दिसणाऱ्या compartment मध्ये चढले. एक seat रिकामी दिसली म्हणून त्याने तिकडे तिला बसायला सांगितले व तो उभं राहिला एव्हाना baher  पावसाची रिप-रिप पुन्हा चालू झाली होती. थोड्या  वेळाने समोरची seat रिकामी झाली. तशी ती fourth seat वरून उठून तिकडे shift झाली. बराच थकवा आल्याने तिने डोळे मिटले. त्यःच्या समोर जरी मी ठीक आहे दाखवत होती तरी आतून त्रास होत होता. ती डोळे मिटून निपचित पडून होती. तो एकदा - दोनदा आता नजर टाकून गेला कि ती ठीक आहे ना. ह्याची जाणीव तिला अजिबात नव्हती पनवेल स्टेशन आलं तसा तो door जवळ असल्यामुळे पटकन उतरला ती ग्लानी मुळे आत पडून राहिली तिला हे हि कळले नाही कि स्टेशन आले बाजूच्या ने हाक मारून सांगितले कि मंदम पनवेल स्टेशन आले. तशी ती स्वत: ला सावरीत उठली. मनातल्या मनात थोडं आश्चर्य पण वाटलं कि तो कुठे गेला. स्टेशन आलं हे हा stranger सांगतोय. खरा तर त्याने यायला हवं होता. इतक्यात त्याने तिला हाक मारली शोना कुठे आहेस चल ना 
ती : तुम्ही कुठे होतात त्या काकांनी मला उठवला
तो: अगं शोना door मध्ये होतो ना त्यामुळे उतरावं लागला मला वाटल मागून तू उतराशील पण तू दिसली नाहीस म्हणून मग तुला शोधात आलो तुला टाकून जाईन असा कधी होईल का ?
ती  : ठीक आहे चला आधीच उशीर झालं आहे 
बाहेर नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे तळं साचलं होतं वातावरण मात्र प्रसन्न वाटत होतं.ते पार्किंग मध्ये गेले व आपली गाडी काढली pay  & park वाल्याला पैसे देवून ते निघाले. तशी ती त्याला घट्ट बिलगून बसली गाडी पनवेल bus depo च्या दिशेन दिशेने वळवली. 
तो : शोना मी तुला डेपो मध्ये सोडतो आणि घरी  निघतोय  चालेल  ना
ती : हो चालेल  
तो : नीट  जा काळजी  घे  आणि पोहोचलीस  कि मला sms तक 
ती : ok   बच्चा  
गाडी डेपो मध्ये येऊन  लागली तशी दोघांच्या  मनाला  हि दूर जाणार म्हणून हुरहूर  लागली. ती bike वरून उतरताच  गाडी थोड्या  दुसऱ्या  side ला वळवली व तिला खून केली कि तिकडे ये.
तो : पिल्लू नीट जा घरी काळजी घे 
ती: ok बच्चा तुम्ही पण काळजी घ्या पावसात भिजू नका तुम्हाला सर्दी होते व तुम्ही आजारी पडता कळाल.
ती : ठीक आहे माझी  बच्चुडी 
त्याने एकदम तिला जवळ घेतलं आणि हलकेच तिच्या कपाळावर आपले ओठ टेकले.
तो : i love u lots माय बच्चा take care  पिल्लू मी आता निघतोय sorry  तुझी बस येईपर्यंत नाही थांबता येणार cause घरी mumma school मधून घरी आली असली तर थोडं ओरडा पडेल.
ती : काही प्रोब नाही तुम्ही जा 
एकमेकांचा हात दोन क्षण घट्ट धरला दोघांना हि हे संपूच नये असाच वाटत होतं पण काय  करणार घरी तर जायचं होतं so शेवटी जड पावलांनी एकमेकांपासून दूर होऊन घरी जाण्याची प्रवासाला  ते  दोघे पण लागले. 

समाप्त
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Monday, June 14, 2010

ओल्या मातीचा सुगंध - २











त्याने bike चा वेग थोडासा वाढवला, आणि ती त्याला घट्ट बिलगून बसली. ती तशी बसलेली पाहून त्याने bike station कड़े वळवली. गाड़ी थांबली ती स्टेशन जवळ असलेल्या pay & park मध्ये. तिकडे गाड़ी ठेवली अणि ती दोघे हातात हात घालून स्टेशन च्या दिशेने निघाले. tickect house च्या जवळ आल्यावर तो तिला म्हणाला


तो : तुझ्याकडे coupns आहेत ना शोना!
ती : हो आहेत ना !
तो : ठीक आहे आपण mall मधे चाललोय.
अस बोलून त्याने तिने दिलेली coupns punch केली. व् ती दोघ पण train मधे चढले. 

आता पुढे 

************************************************************************


Train सुरु झाली. दुपारची वेळ असल्याने त्यांना window seat मिळाली. एकमेकांना खेटून , जग आपल्याकडे बघतंय ह्याची जाणीव त्यांच्या खिजगणतीतही नव्हती, एकमेकात हरवून गेलेले ते दोघे मात्र कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात होते; तरही ती जवळ असूनही आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचा आनंद दिसत नव्हता.
तो : पिल्लू तुला त्रास होतोय का ग! 
ती : नाही मी ठीक आहे.
तो : एक काम कर तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोप तुला थोडं बरं वाटेल.
त्याच्या ह्या वाक्यावर ती फक्त हसली आणि आपला डोकं तिने त्याच्या खांद्यावर ठेवलं. त्याने तत्परतेने आपल हात तिच्या खांद्यावर टाकून पूर्णपणे नसलं तरी तिला कवेत घेतलं. 
तो : शोना तुझा cell देना, काही नं बोलता तिने bag मधून Cell कडून दिला. इकडे ट्रेन ने खांदेश्वर स्थानकात प्रवेश केला. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर असलं तरी तिचे डोळे खिडकीतून बाहेर बदलणाऱ्या वातावरणाचे वेध घेत होते. आकाशात हळू-हळू काळे ढग जमा होऊ लागले; इकडे earphone चा एक ear तिच्या कानात देवून त्याने दुसरा ear स्वतः च्या कानाला लावला, train मानसरोवर च्या परिसरात येईपर्यंत पावसाने हलके- हलके बरसायला सुरवात केली होती. अचानक तिच्या कानात स्वर गुंजले " अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे , आणि धुंदावती भाबडी लोचने" तसं तिने आपलं डोकं त्याच्या खांद्यावरून काढलं
तो: की झाला सोनू ?
ती : (नेहमीप्रमाणे हसून ) काही नाही. आपण door मध्ये जाऊया का उभं राहायला. ( श्वास गंधाळती, शब्द भांभावती , रोम- रोमातली कंपने बोलती. गाण्याचे स्वर अजूनही येत होतेच )
तो : नको काही गरज नाही , पिल्लू, आधीच तू आजारी आहेस त्यात बाहेर पाऊस पडतोय भिजलीस तर आणखीन आजारी पडशील ! (सांग ना रे मना, सांग ना रे मना , हे नवे भास अन ह्या नव्या चाहुली. गाण्याचे बोल तिच्या कानावर पडत होते.)
ती : (पाऊस पडताना बघून प्रफुल्लीत झालेला तिचं चेहरा पडला होता ) please जाऊ या ना. 
तो : नको शोना !
ती : बरं तुम्ही नका येऊ मला तरी जाऊ द्या ना please !
तो : शोना अगं (असा म्हणे पर्यंत ती door कडे निघाली सुद्धा) hey शोना थांब ना. मी पण येतो.
ती दारात पोहोचली तो पर्यंत train ने खारघर स्टेशन सोडून ती पुढच्या प्रवासाला लागली होती. हळू हळू पावसाचा जोर पण वाढत train बेलापूर स्टेशन मधून बाहेर पडली तसं तिने पावसाचा आनंद घेण्यासाठी हाथ बाहेर काढला. आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू पसरलं. काही सेकंदातच पावसाचा वेग वाढला तसं ती भिजू लागली ओल्या हाताने train च्या door मधल्या rod ला हाथ धरला आणि दुसरा हाथ बाहेर काढून ती येणाऱ्या पावसाचा आनंद घेऊ लागली. इकडे त्याने गण लावला होता ( तेरा होने लागा हूँ | ) त्याचा लक्ष तिच्याकडे गेलं तर ती लहान मुलांसारखी हातावर पडणाऱ्या पावसात खेळत होती. इतक्यात त्याच्या लक्षात आला कि ती आर्धी train च्या बाहेर आहे. आणि तिने एका हाताने rod पकडलाय; तो हात पण ओला आहे. कधी पण सरकू शकतो. त्या दोन seconds  मध्ये त्याच्या मनात अनेक विचार येऊन गेले. आणि तळमळीने तो तिला ओरडला 
तो : शोना ! नीट हात पकड गं ! सटकला तर काय होईल?
ती : काही होणार नाही मी खाली पडेन !
तो : शोना ! त्या आधी मी जातो ना 
ती : R U mad ? तुमच्या आधी मी जाणार! 
तो : गप्पं बस ना शोना हे बोलायलाच हवं का? 
तसं तिने आपलं नेहमीचा खोडकर हसू चेहऱ्यावर आणून म्हणाली.Sorry , love U, आणि अचानक एक आवाज झाला त्या आवाजाबरोबर 
ती : ( ओरडली ) आई गं !


क्रमश:

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Sunday, June 13, 2010

प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, १८९८ - जून १३, १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणत़ज्ज्ञ, राजकारणी, वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
१९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ 'रत्नाकर' व १९२९ साली 'मनोरमा' ही मासिके सुरू केली. पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली.जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, १९६२ पर्यंत ते चालू होते. जून २,१९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, १९५६रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी १९३७साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

अश्या ह्या महान लेखकाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.’ 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Tuesday, June 08, 2010

ओल्या मातीचा सुगंध - १

जून महिन्याच्या सकाळी ११:०० ची वेळ; बाहेर पावसाचे दिवस असून पण कडकडीत उन पडलेले. आत laptop वर mail check करीत असतानाच त्याचा mobile vibrate झाला. बघितलं तर display वर तिचा number flash होत होता. त्याने call उचलून सुरुवात केली.
तो : hello शोना.
ती : ( एकदम मंद सुरतला कोमेजलेला आवाज) hello मी बोलतेय! मी घरी जाणार आहे आज half day  ने कारण i m not   feeling well .   चक्कर आल्यासारखा वाटतंय थोडासा काम आहे ते संपवून मी निघतेय.
तो :  hey Shona R U OK ना माझी पिल्लू . मी आत्ता तिकडे असतो ना तर तुला घट्ट मिठीत घेतली असती. काळजी घे ना बच्चू. 
ती : भेटू शकता का मला थोड्यावेळासाठी तुम्ही सोबत असाल तर मग माझी काळजी तरी घ्याल.
तो : ठीक आहे शोना तू ऑफिस मधून निघाली कि call कर मला.
bus डेपो दुपारचा २ वाजले तरी तिचा पत्ता नव्हता; त्यात low battery मुळे त्याचा cell switch off झालेला. phone बंद होण्यापूर्वी शेवटचे बोलणे एक तासापूर्वी झालेलं कि ५ मिनिटात निघते म्हणून; अजून पोहोचली नाही. रस्त्यात काही तिला झाला तर नाही ना त्याच्या मनाची घालमेल चालू झाली आणि आपसूक त्याची पावले समोरच्या PCO कडे वळली. तिचा नं. dial केला. इकडे ती डेपोत येऊन पोहोचली आणि तिला समोरच त्याची गाडी दिसली. ती गाडी जवळ पोहोचते तो पर्यंत तिचा cell वाजायला लागतो ती call pick up करते तोच त्याचा काळजीतला स्वर 
तो : शोना कुठे आहेस गं !
ती : आपल्या गाडीजवळ उभी आहे.
तो : ठीक आहे. मी येतो.
त्याला बघताच वेदनेत ही  तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा झळकते. त्याच्या चेहऱ्यावर मात्र लहान मुलासारखा निरागस हसू  पसरतं  व तो धावतच येतो.   
 तो : शोना खूप त्रास होतोय का ? इतकी मलूल का दिसतेस ?
ती : नाही ओ ! मी ठीक आहे .
तो : बर कुठे जायचं?
ती : कुठे हि चला मला इकडे उन्हाचा त्रास होत आहे.  
तो : sorry ! चल बस गाडीवर. ( गाडी start करतो) 
ती : कुठे चाललोय आपण ?
तो : तुला उन्हाचा त्रास होऊ नये ना म्हणून naturals (Ice cream Parlour ) मध्ये चाललोय 
ती : बर ठीक आहे.  
 तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिला naturals (Ice cream Parlour ) मध्ये तो तिला घेऊन गेला व तिने सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून तिला बळेबळेच ice - creame खायला लावली. ती खाताना पण तिला त्रास होत होता. म्हणून तिने पाणी मागितले. त्याने पण तत्परतेने तिला पाणी आणून दिले. कसं- बस  ice - creame संपवल्यावर ती दोघे निघाले AC  तून बाहेर निघाल्याने उन्हाचे चटके अधिक तीव्रतेने जाणवायला लागले होते.
तो: घरी जायचा आहे का तुला पिल्लू ?
ती: असा काही नाही. तुमच्या सोबत खुप बर वाटतय.
तस त्याने bike चा वेग थोडासा वाढवला, आणि ती त्याला घट्ट बिलगून बसली. ती तशी बसलेली पाहून त्याने bike station कड़े वळवली. गाड़ी थांबली ती स्टेशन जवळ असलेल्या pay & park मध्ये.  तिकडे गाड़ी ठेवली अणि ती दोघे हातात हात घालून स्टेशन च्या दिशेने निघाले. tickect house च्या जवळ आल्यावर तो तिला म्हणाला
तो : तुझ्याकडे coupns आहेत ना शोना!
ती : हो आहेत ना !
तो : ठीक आहे आपण mall मधे चाललोय.
अस बोलून त्याने तिने दिलेली coupns punch केली. व् ती दोघ पण train मधे चढले.   


क्रमश: 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•