Friday, December 31, 2010

पर्यावरण संवर्धन.................. 1


This is what I never expect from myself. The Worst performance ever i gave in my life till date.






Below link is for original speech which i prepare for the competition.


पर्यावरण संवर्धन...................




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, December 29, 2010

हुरहूर

"हुरहूर"  ह्या  माझ्या  नवीन  कथे  विषयी  थोडस !!

वाचून  प्रश्न  पडला  असेल  ना  २  भाग  publish केल्यावर  हि  प्रस्तावना  का  टाकतेय ? पण  बरायचं  लोकांकडून  personal remark आल्यामुळे  तसेच  विचारणा  झाल्यामुळे  हे  मला  लिहावासा  वाटतंय. मुळात  म्हणजे  ह्या  कथेचा  जन्म  हा  माझ्या  व  माझ्या  मित्राच्या  discussion मधून  झाला. 

 “ओल्या  मातीचा  सुगंध ” ह्या  नंतर  मी  एकही  कथा  लिहिली  नाही  आहे . पहिल्या  story   च्या  वेळी  situation real होती; पण  त्यावर त्याचा  म्हणन  असं  होतं  कि  मी  खूप  छान  लिहिते  so माझ्या  लिखाण  करण्याला  real situation पाहिजे  असं  नाही , मी  fictional   पण  उत्तम  प्रकारे  लिहू  शकते   so मी  हा  प्रयत्न  करीत  आहे  परंतु  ह्या  story मध्ये  वापरण्यात  आलेले  details जसा  dates, place etc. ह्या  मुळे  काही  लोकांनी  मला   विचारणा  केली  तू  इतक्या  particularly कसं  काय  लिहू  शकतेस ? हि  तुझी  story आहे  का ? इतक्या  details   देऊ  नको  fictional असेल  तर ! तू   तुझाच  nick name वापरला  आहेस  असं  का ?
 प्रत्यक्षात   story लिहिताना  मी  इकडे  माझं  nick name वापरला  आहे . मी  ज्यांचं  blog ची  follower आहे  त्यांनी  आपल्या  blog   वर  जाऊन  check केलं  तर  खरच  माझं  नाव  “SONA” दिसत. तसा   पण  ह्या  story मध्ये  पुढे  अश्या  बऱ्याच  twist आणि  घटना  add होणार  आहेत . हि  कथा  पूर्णपणे  काल्पनिक  आहे . ह्यात  mention   केलेल्या  गोष्टी  अश्या  आहेत  ज्यांच्या  सानिध्यात  मी  वावरते  like our buzz. Blogs, place त्यावरून  कदाचित  हि  सत्यकथा  किंवा  माझी  story वाटण्याची   शक्यता  आहे  पण  ते  माझ्या  आजुबाजूच   वातावरण  असल्याने  मी  ते   ह्या  कथेत  गुंफले  आहे.

हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!

हुरहूर..............................१


हुरहूर...............................२




धन्यवाद  
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, December 28, 2010

हुरहूर...............................२


Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!

धन्यवाद मित्रानो आणि मैत्रिनिनो तुम्ही जो part १ ला प्रतिसाद दिलात.  

हुरहूर..............................१

ती  ह्या  कुशीवरून  त्या  कुशीवर  वळली  तसं  तिला  त्याच्या  आठवणी  आणखीनच  घेरू  लागल्या . त्याच्या  सोबत  चा  buzz  वरील  पहिला  भांडण  आणि  नंतर  अचानक  1 month   ने  तिच्या  blog   वरील guest chat apps वापरून  तिला  केलेलं   ping  आणि  मग   त्याच्या  बरोबर  वाढत  गेलेल्या  गप्पा  सगळंच  तिला  टप्प्याटप्प्याने  आठवू  लागले.  

आता पुढे 
***********************************************************************************************************

त्याचं  ते  रोज  ping करण  आणि  GM केल्याशिवाय  कामाला  सुरवात  ना  करणं, तिचं  सकाळी  लवकर  online  येऊन  त्याच्या  येण्याची  वाट  बघणं, त्याला wish केल्यावरच  दिवसाची  सुरवात  करणं. तिच्या  ओठी  अलगद  हसू  फुलवून  गेलं; असाच  त्याने  ping केलं.   
तो: hi सोना
ती: hey तुला  माझा  nick name कसं  कळलं?
तो: कळलं  मला.  आपल्या  आवडत्या  माणसाची  बातमी  ठेवावी  लागते.
ती: जा  बाबा  तू  सांगत  नाही  ना  मला  मी  नाही  बोलणार  तुझ्याशी.
तो: बरं  तू   चिडू  नको  मी  सांगतो  अगं  तू  माझ्या  blog   ला  follow करते   आहेस ना  तिकडे  तुझा  सोना  display होतंय  म्हणून  मला  कळलं

ती:
तो: बरं  ते  जाऊ  दे  मी  एक  कविता  post केली  आहे  buzz वर  ती  check कर  आणि comment दे
ती: बरं 
काय  सुंदर  लिहिली  आहे  कविता  ह्या  वेड्याने  पण माझी commet का  जात  नाही.    
त्याला  विचारले  पाहिजे. इतक्यात  त्यानेच  ping केले.
तो: सोना   comment नाही  दिली  
ती: वेड्या  मी  comment नाही  देऊ  शकत  रे
तो : की  झाले
ती: अरे  i dont have permission to post comment
तो: wait मी  check करतो  काय  झाले  ते.
ती: k 

तो:  sorry तू  block झाली  होतीस  ग  रागावू  नको  मला  नाही  माहित  कशी  काय . i m sorry plz
ती: ok रे  sorry नको  म्हणू  मला  माहित  आहे  मी  block  का  होती.
तो: i m sorry मी  नाही  केलं  ते  मला  खरच  माहित  नाही  गं.
ती: अरे  वेड्या  माझं  ऐकून  घे  आधी  मला  माहित  आहे  मी  block का  होती  . अरे  1month पूर्वी  आपला  buzz वर  भांडण  झालं  होतं  म्हणून  तू  रागाने  मला  block   केलं  होतास  कळलं का?
तो : ok म्हणजे  ती  तू  होतीस  तर
ती  आता  परत  मला  block करणार  का ?
तो : नाही  ग  sona नाही  block करत  

ह्या  आठवणी  सरशी  तिचं  तिलाच  हसू  आला  आणि  ती  bed वर  उठून  बसली  जवळच  असलेया  बाटलीतून  पाण्याचा  घोट  घेतला  व  घड्याला  कडे  बघितलं  तर  रात्रीचे  १० :४५  वाजले  होते. आणि  तिला  परत  आठवले  कि  आपण  सकाळी  १०:४५  चा  show बघितला होता   पहिल्या  भेटीत.  ती  पुन्हा  bed वर  आडवी  झाली  आणि  ती  अंगावरची  चादर  सरळ  करता - करता त्याच्या आठवणीत  परत  गुरुफटली.  एक  - मेकांशी  बोलता  बोलता  cell no. Exchange झाले.  
मग  कधी  तरी  call वर पण  बोलण  होऊ लागल. मग  असाच  एकमेकांशी  बोलताना  त्याने  तिला  विचारलं  आपण  भेटूया  का ? ती  पण  लगेच  हो  म्हणाली.
तो: कुठे  भेटूया  तू  सांग ?
ती: वाशी  चालेल.  
तो: हो  चालेल  movie बघायला  जाऊया  पण  भेटायचा  कधी ? 
ती: तुला  ह्या  येणाऱ्या  saturday  means   6 th ला  सुट्टी  आहे  का  आपण  भेटलो  असतो.
तो: चालेल  कोणता  movie release होतोय.  
ती: action reply आणि  गोलमाल  ३ release होत आहेत 
तो: गोलमाल ३  बघायला  जाऊ  या. एक  प्रश्न   विचारू  का  तुला?एका  unknown मुलाला  भेटायची  भीती  नाही  का  वाटत  तुला?
ती: नाही  वाटत  भीती,  dont worry! आणि  तसं  पण  तू  माझ्या  area मध्ये  येत  आहेस. 
तो: madam , वाघाला  area नसतो  
ती: ohhhhh really?बरं  ठीक  आहे  सकाळी  १०:३०  ला  भेटू ६ तारखेला  मी  १० :४५  च्या show चे  tickets book करून  ठेवते  
तो : ठीक आहे ok chal bye मी ठेवतो phone
ती : chal bye tc
तो: tc
त्याने call cut केलं  असला  तरी  तिच्या  मनात  त्याच्या   भेटीची  हुरहूर  लागली  होती . काय  होईल ? कसा  असेल  ? असे  सगळे  प्रश्न  तिला  पडले  होते? त्या सर्व  प्रश्नांची  उत्तरे  तिला  फक्त  ६  November ला  मिळणार  होती.

क्रमश: 
  
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, December 26, 2010

हुरहूर..............................१

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!


रात्रीचे १०:०० वाजत आले होते तो रूम मध्ये आली आणि पहिला त्याला call लावला.तो जेवत 
होता पण तिचा call आणि तोही रात्री म्हणून त्याने headphone लाऊन तिचाcall pick केला.
ती: hello !
तो: hi बोल !  
तीजेवलास का?
तोजेवतोय बोल ना !!
तीतू जेवून घेमग आपण बोलू !
तोबोल मी headphone लावलाय , तू बोल
तीअरे actually एक  bad news आहे!
तोकाकाय झालेआपण........ (त्याचे बोलणे अर्ध्यावर तोडत ती म्हणाली)
ती: (उदासपणेआपण उद्या नाही भेटू शकत!!
तोवाटलाच होता मलाइतक्या रात्री तुझा call आला म्हणजे ....... काय झालं?
ती: sorry रेमी तुला म्हटलं होतं ना किमी sunday ला family बरोबर जाणार
होते ना त्या ऐवजी उद्या चाललोय रे
तोउद्या अचानक! sunday ला जाणार होतात ना.
तीहो रे पण दादा आला ना माझा फोफळी वरुन आणि त्याला तिकडे परत पण जायचे आहे.job ला  असतो तो  तिकडे.(तिला मनातून वाटत होतं त्याने तिला सांगावं जाऊ नको नाकाहीतरी कारण काढून मला भेट ना)
तोठीक आहे जा तूपण नंतर भेटू ..(त्याला मनातून वाटत होते कि ती बोलावे family  चालली आहे ना जाऊ दे मी नाही जात तुला भेटायला येते.)
call वर - सेकंद शांतता होती कोणीच काही बोलले नाहीतिच्या नी त्याच्या ओठी शब्द अडले होतेबोलणार कसंआपला हक्क आहे का बोलण्याचा हाच प्रश्न दोघांना पण पडला होतं शेवटी ह्या शांततेचा भंग करीत तीच बोलली.
तीतू जेवून घे आपण नंतर बोलू.
तो: bye GN SD TC
ती: bye GN SD TC

call cut करून mobile तिने charging ला लावला. व laptop चालू  करून  ती  gtalk वर  online आली.  तिला  एक - दोन  मित्रांनी  पिंग  केला  पण  तिचं  कशातच  लक्ष  लागत  नव्हत  शेवटी  signout केला  आणि  laptop बंद  करून  झोपायला  आली  पण  त्याच्या  आठवणी  तिला  झोपू  देत  नव्हत्या . तिला  सारखा  वाटायला  लागला  कि  तो  नाही  बोलला  म्हणून  काय   झाले  आपण  बोलायला  हवे  होते  कि  मी  येते  भेटायला  जात  नाही  family   बरोबर , लगेच  मनात  विचार  डोकावला  मीच  का  बोलू  तो  का  नाही  बोलला;  तो  बोलला  असता  तर  काही  फरक  नसता  पडला  पण   नाही  बोलला;  जाऊ  दे!  असं  म्हणून   ती  ह्या  कुशीवरून  त्या  कुशीवर  वळली  तसं  तिला  त्याच्या  आठवणी  आणखीनच  घेरू  लागल्या . त्याच्या  सोबतच  buzz  वरील  पहिला  भांडण  आणि  नंतर  अचानक  1 month   ने  तिच्या  blog   वरील guest chat apps वापरून  तिला  केलेलं   ping  आणि  मग   त्याच्या  बरोबर  वाढत  गेलेल्या  गप्पा  सगळंच  तिला  टप्प्याटप्प्याने  आठवू  लागले.


क्रमश:
  

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, December 23, 2010

पर्यावरण संवर्धन...................

माझ्या भाषणाची original script जशी च्या तशी देत आहे.

आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपिठा समोरील आदरणीय ज्ञाते श्रोते आणि वक्ते मी आपण समोर विषय मांडत आहे पर्यावरण संवर्धन. द्रोणागिरी स्पोर्ट्स ची स्पर्धा जाहीर झाली. त्यात दिलेली तीनही विषय वाचल्यावर मला प्रश्न पडला कि मी कोणत्या विषयावर बोलू. मलाच कळत नव्हते विषय काही निश्चित होईना आणि अचानक मी दूरदर्शन वर लागलेला हुप्पा हुया हा चित्रपट पहिला त्यामधला धरणी माय हा एक पात्री संवाद ऐकला आणि वाटलं पर्यावरण संवर्धन ह्याच  विषयावर आपण बोलायचं विषयाला सुरवात करण्यापूर्वी धरणी माय चा एक पात्री संवाद म्हणावसं वाटतोय करणं त्याशिवाय हे भाषण  पूर्णच होऊ शकत नाही 

"अरे धरणी मातेचं रडणं आणि दुखणं समजून घे मेरे भाय
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
दिसलं ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो 
माय मारू दे,
फायद्याची इकडे साम्द्यानच झाली घाय
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
कारखान्याच्या चिमणीतून धूर भसाभसा 
वरती समद पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा 
वर्षातले १२ महिने कडक उन्हात जय 
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
Global Warming वाले म्हणत्यात 
Global वार्मिंग म्हणजे पृथ्वीच वाढत चाललेला तापमान 
Global Warming वाले म्हणत्यात 
हळू जरा धरा धीर
आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर 
तापत चाललंय धरणीचा डोकं, छाती, पोट अन पाय,
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
असाच चालू राहिला तर आपली काही खैर नाय 
उद्या जाऊन आपलंच पोरगं आपल्याला इचारलं 
बाबा - बाबा हिरवळ म्हणजे काय ?
अरे उठ , वाचव आपल्या आईला झटकून हात अन पाय 
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?

खरं आहे ना मित्रानो काय करतो आपण आपल्या धरणी मातेसाठी सगळीकडे प्रदूषण वाढवून ठेवलय त्यामुळे पर्यावरण हानी होत आहे. तसे बघितले तर   पृथ्वीवरील सार्‍या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्यावरण आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर व विश्वात इतरत्र असे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे मानव जातीस नव्हे तर सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यावधी वर्षांच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे असे पोषक वातावरण झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगांमुळे त्यात बरेच हानीकारक बदल होऊ लागले आहेत.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे आणि जंगलाचा नाश करुन वाढलेली शेती यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत घट होत आहे. तसेच हवा, पाणी व जमीन यांच्या प्रदूषणाचा प्रश्न वाढत चालला आहे. या जगाची वाटणी श्रीमंत देश आणि अविकसित गरीब देश अशा दोन गटात करण्यात येते. विकसित देश नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर दरडोई खूपच जास्त करतात परंतु तेथील लोकसंख्या मर्यादित आहे. याउलट अविकसित देशात गरिबी व मोठी लोकसंख्या यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती कमी वापरूनही पर्‍यावरणाचा र्‍हास जास्त होत आहे. पर्यावरण रक्षण की गरिबी ऊन्मूलन या दुहेरी पेचात हे देश सापडले आहेत. संपन्न राष्ट्रांकडून या राष्ट्रांवर पर्यावरणासाठी कडक निर्बंध पाळण्याचे दडपण येत आहे. परंतु बेरोजगारीवर मात करण्यासाठी औद्योगिकीकरण, वाढ्त्या लोकसंख्येसाठी जंगलतोड व शेती आणि निसर्गसंपदाच पैसे मिळविण्याचे साधन झाल्याने या देशात पर्यावरण रक्षणाचे काम बिकट बनले आहे.
कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व स्वयंचलित वाहनातून पेट्रोल जाळण्याने निर्माण होणारा दूषित वायू, शिसे व काजळी यामुळे हवा प्रदूषित होत आहे. उद्योगधंदे व शहराच्या सांडपाण्यामुळे जमिनीवरील नदी, तलाव यांचे पाणी दूषित होत आहेच. शिवाय जमिनीखाली असणार्‍या पाण्याचेही प्रदूषण होत आहे. शेतीसाठी पाण्याबरोबर वापरली जाणारी रासायनिक खते पाणीप्रदूषणास कारणीभूत तर आहेतच. शिवाय शेतीसाठी अतिरिक्त पाणी वापरल्याने जमिनीत क्षार वाढून मीठ फुटण्याचे व सारी जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. पायाभूत विकासासाठी होणारे प्रकल्पही पर्यावरणाच्या नव्या समस्या निर्माण करीत आहेत. मोठ्या धरणांमुळे शेकडो एकर जंगले पाण्याखाली जाणे, धरणग्रस्तांच्या जमिनी व घरे पाण्याखाली जाण्याने त्यांचे विस्थापन करण्याची समस्या त्या प्रकल्पाच्या उभारणीत महत्वाचा अडथळा ठरली आहे. जंगलातून जाणारे मोठे महामार्ग जंगलातील प्राण्यांच्या सुरक्षिततेला आव्हान ठरत आहे.
माणसांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांच्या विकासाचा वेगही त्यानुसार वाढविण्याची धडपड सर्वत्र चालली आहे. मात्र हा विकास करताना आपण पुढील विकासाच्या सर्वच संधी नाहिशा करून टाकीत नाही ना याविषयी माणूस फारसा विचार करताना दिसत नाही. आजची गरज भागली म्हणजे झाले. उद्याचे कोणी बघितले ? अशी वृत्ती झाली आहे व ती पर्यावरणास घातक आहे. शेतकर्‍यास जमीन चांगली ठेवण्यासाठी पिकांची फेरपालटी घ्यावी, पाण्याचा व रासायनिक खतांचा कमी वापर, ऊसासारख्या नगदी परंतु जास्त पाणी लागणार्‍या पिकांऎवजी दुसरी पिके घ्यावी असे कितीही सांगितले तरी ते सहसा पाळले जात नाही. जमीन नापीक होत चालली आहे हे पाहूनही त्यात बदल होत नाही. त्वरित लाभ मिळविण्याच्या हव्यासापोटी दूरदर्शी योजनेकडे दुर्लक्ष होते. जे शेतकर्‍यांचे तेच उद्योगधंद्यांचे. उत्पादनखर्चात बचत करण्यासाठी सांड्पाण्यावर प्रक्रिया करण्याकडे चालढकल केली जाते. नगरपालिका / महानगरपालिका यांना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणेचा खर्च व ती चालविण्यासाठी लागणार्‍या विजेचा खर्च झेपत नाही. साहजिकच प्रदूषण वाढतच जाते. जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण होते. त्यामुळे त्यांच्या वापरास बंदी, किंवा पेट्रोल, डिझेलऎवजी प्रदूषणरहित इंधनाचा वापर याची कायद्याने सक्ती केली तरी त्याची अंमलबजावणी मुष्किल होते.
एकंदरीत काय ? नैसर्गिक साधनसंपत्तीचे भांडार असणारे पर्यावरण आपल्या साहाय्यास सज्ज असताना सोन्याची अंडी देणारी कोंबडीच कापणार्‍या लोभी माणसाप्रमाणे आपण पर्यावरणाचे अतोनात व भरून न येण्यासारखे नुकसान करीत आहोत.यावर काही उपाय आहे का ? पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विकास थांबवावा म्हटले तर वाढत्या गरजा भागविणे अवघड होणार व विकास केला तर पर्यावरण दूषित होणार. तसाही  पर्यावरण संवर्धन म्हणजे जैसे थे परिस्थितीच कायम ठेवणं, असं नव्हे. तसा आग्रह धरला जातो कारण पर्यावरणात होणारा बदल आणि पर्यावरणाची हानी यात नेहमीच गल्लत केली जाते. कोणताही विकास प्रकल्प उभा करायचा तर पर्यावरणात बदल होणं क्रमप्राप्त आहे. साधा रस्ता बांधायचा तर जैसे थे परिस्थिती ठेवून तो बांधला जाऊ शकत नाही. वाटेत येणाऱ्या प्रत्येक वृक्षाला वळसा घालूनच पुढं जाणंही व्यवहार्य ठरत नाही. पण त्यापायी घटलेल्या वृक्षराजीच्या जागी नवीन वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाची हानी होत नाही. यासंबंधीचे नियमही आहेत. त्यांची कडक अमलबजावणी करण्याचा आग्रह धरता येतो. पण चुकीच्या गृहीतापायी रस्ताच नको असा पवित्रा घेणं कितपत समंजसपणाचं होईल? 
ह्या  सर्व समस्यांवर नियोजनबद्ध चिरंतन विकास हे यावर उत्तर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे, अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे, प्रदूषण नियंत्रणासह विकासयोजना आखणे व टाळता न येण्याजोग्या पर्यावरण हानीबद्दल भरपाई म्हणून पर्यावरण संवर्धनाची योजना प्रकल्प आराखड्यात समाविष्ट करणे या गोष्टी केल्या तर पर्यावरणाचा दर्जा आपण टिकवू शकू.
गाव, जिल्हा, नदीचे खोरे वा कोणताही विधिष्ट भूभाग यातील विकासाचे नियोजन करताना त्या भूभागावरील पर्यावरणाचे व नैसर्गिक साधनसंपत्तीची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच हवा, पाणी, जमीन या घटकांची प्रदूषके सामावून घेण्याची श्क्ती ही मर्यादा धरली तर त्या धोकादायक मर्यादेपेक्षा खाली आपल्या आजच्या व भविष्याच्या विकासामुळे होणार्‍या प्रदूषणाचे प्रमाण राहील अशी आपण काळजी घेतली पाहिजे. आपले जीवनदायी पर्यावरण हा पूर्वजांकडून मिळालेला मालकीहक्काचा वारसा नसून आपल्या पुढील पिढ्यांकडून उसना घेतलेला ठेवा आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कर्ज जसे व्याजासह परत फेडावे लागते तसे हे पर्यावरण अधिक सुखदायी व सुरक्षित कसे करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या विकासाच्या आशाआकांक्षा उमलतील असे पर्यावरण निराम्न कारणे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण जास्त काही नाही थोडं दक्ष राहिला पाहिजे. 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Friday, November 26, 2010

२६/११ च्या निमित्ताने....................................

तिरंगा ज्याना स्वार्थाहुनहि
सदैव उंच वाटला 
त्या तिथेच नेमका आज 
हिरवा-भगवा पेटला
जेथे जन्मून गांधिजीनी  
जगतास शिकवीली आहिंसा 
त्या तिथेच नेमकी आज 
ढळढळीत जळते हिंसा
सीमेवरती जवान होते 
परतविण्यास हल्ला 
त्या तिथेच नेमका आज 
आतिरेक्यांचा डल्ला

दहशतवाद म्हणजे हिंसेच्या किंवा दहशतीच्या मार्गाने आपले इप्सित साध्य करुन घेणे.तस बघितल तर गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचे वारे सर्वच क्षेत्रात वाहू लागले आहेत, त्याचा कमी- अधिक प्रभाव राजकीय व सामाजिक परिस्थितीवर पडलेला दिसून येत आहे.मात्र त्याचा परिणाम दहशतवादी करवायांवर होइल असे वाटले नव्हते. दोन दशका पूर्वी काही विशिष्ठ कारणामुळे निर्माण झालेला दहशतवाद आता सर्वच क्षेत्रात पसरू लागला आहे.आणि भारतासारख्या देशात तर तो एक गंभीर प्रश्न बनला आहे.२६ - ११ -  २००८ ला मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्षे पूर्ण झाली. तरीही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. 

इतिहास बघितला तर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करुन हा दहशतवाद जगासमोर आला पण इंदिरा गांधीनि शीख मत बँकेचा विचार न करता सुवर्ण मंदिरावर करवाई करुन अतिरेक्याना चोख प्रतिउत्तर दिले त्या करवाईसाठी त्याना आपल्या प्राणाची आहुति द्यावी लागली त्यानंतर १९९९ साली दहशतवाद भारतव्याप्त कश्मीर मधील कारगिल भागावर हल्ला करुन पुन्हा एकदा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला ह्या वेळी ही भारताने त्यांचे डोके ठेचून काढले,ह्या नंतर मात्र ११ September  २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला आणि १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करुन आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या नंतर जुलै २००५ च्या महिन्यात जगभर पुन्हा एकदा दहशतवादाने मुसुंडी मारली. जुलै महिन्याच्या सुरुवातीस लंडन, कराची, इंडोनेशिया मधील बाली येथे bomb स्पोट झाले.आणि ५ जुलै २००५ रोजी आयोधेच्या वादग्रस्त परिसरात  घुसनारया लष्कर-ऐ- तोयबाच्या आतिरेक्यना भारतीय सुरक्षा दलाच्या जवानानी चोख प्रतिउत्तर देऊन ६ आतिरेकी ठार केले. परंतू या बाबत जवानाचे कौतुक करण्या ऐवजी  भारतीय जनता पक्षाने ह्याचे राजकीय भांडवल केले.व तत्कालीन केन्द्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल आणि उत्तर प्रदेश चे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या राजिनाम्याची मागणी केली. आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई वर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा राजीनामा मगन्याचे नाट्य रंगले. पण राजीनामे घेउन किंवा देऊन हे प्रश्न सुट्नारे नाहित. त्या बाबतीत कटू निर्णय घ्यावे लागतात आज २ वर्षे पूर्ण होऊनही कसाब जिवंत आहे. त्याच्याकडून काही माहिती मिळेल ह्या उद्देशाने त्याला जिवंत पकडण्यात आले होते. माहिती मिळणे  तर दूरच पण आत्ता त्याला पोसायची जबाबदारी आली. प्रत्यक्षात त्याचा तिथेच encounter करायला हवा होता. 

आज भारतात सर्वात शांत राज्य कोणतं असेल तर ते म्हणजे पंजाब. परंतु हेच पंजाब ८० च्या दशकात दहशतवादाच्या आगीत होरपळून निघाले होते. त्यावेळी इंदिरा गांधीनी आपल्या सत्तेचा, vote bank चा, आपल्या प्राणाचा विचार न करता हा दहशतवाद मोडून काढला; परिणामी आज पंजाब मध्ये शांतता नांदत आहे. त्यानंतर BJP व इतर पक्ष यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या करकिर्दीकडे पाहिल्यास १९९९ ते २००४ या काळात दहशतवाद शिगेला पोहोचला. १९९९ ला कारगिल, त्यानंतर मुफ्ती मोहम्मद सैद यांची कन्या रुबिया सैदच्या सुटकेसाठी अतिरेक्यांना सोडले गेले. २००० साली काश्मीर मधून अजहर मसूद सह काही दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण करण्यात आले व त्यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी भाराताने आपली मान झुकवली; तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग अतिरेक्यांना घेऊन थेट कंदाहारला गेले. पण ह्या ऐवजी जर विना विलंब कारवाई केली असती तर त्या व त्या नंतर झालेल्या अनेक घटनांची भारताला किमत मोजावी लागली नसती. अनेक कर दात्यांचा पैसा कसाब ला पोसण्याऐवजी भारतीय प्रगतीसाठी, सीमेवर लढणार्यांसाठी वापरता आला असता. पण राजकारण्यांना दिसत होती फक्त vote बँक. 



"नवी विटी नवे राज 
राजकारण्यांचा आहे जुनाच बाज 
अजूनही एकमेकांना संपविण्याची भाषा 
निवडणुकांचा खेळ खेळण्याची आशा 
याद केली कुर्बानी संसदेच्या हल्ल्याची फक्त १५ खासदारांनी
अफजल गुरुचिया फाशी मात्र लाबविली सगळ्यांनी 
हवशे - नवशे- गवशे करतात श्रद्धांजलीचे समारंभ
दहशतवाद विरोधी लढाईला अजूनही होत नाही आरंभ"



दहशतवाद आज सर्वच क्षेत्रात वादाह्त असलं तरी त्याचा उगम कसं होतो किंवा झाला हे शोधणे गरजेचे आहे. त्याशिवाय तो समूळ नसता करणे शक्य नाही. हाय दहशतवादाच्या उगमाची प्रामुख्याने ४ करणे आहेत. 
  1. ऐतिहासिक करणे - जी काश्मीर किंवा palestine सारख्या भागात इतिहासातून निर्माण होतात. 
  2. आर्थिक कारणे -   ब्रिटीशांच्या राजवटीपासून जमीनदारी हा प्रकार जोरात फोफावला, त्यातून स्थानिक जनतेच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढले त्यामुळे स्थानिक जनतेतून नक्षलवादासारखे दहशतवादी प्रकार वाढले उदा. महराष्ट्रातील गडचिरोली
  3. सामाजिक कारणे   - बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सवर्ण विरुद्ध दलित अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पण दहशतवाद वाढीस लागतो.
  4. धार्मिक कारणे - जगात विविध धर्म असले तरी एखादा धर्म स्वताला उच्च समजतो किंवा तसे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो या प्रचारासाठी हिंसेचा वापर केला जातो किंवा एखाद्या धर्मावर अन्याय केल्यास त्यातून हा दहशतवाद जन्माला येतो. उदा. जिहाद. 

जिहाद च्या नावाखाली आज संपूर्ण जग दहशतवादाच्या काळ्या छायेखाली आहे. पण जिहाद म्हणजे नक्की काय ? " जिहाद" हा एका अरेबिक शब्द "जाहादा" वरुन घेण्यात आला आहे. जॉन एस्पोसितो ह्यांनी जिहाद वर बोलताना म्हटले आहे कि "Jihad requires Muslims to "struggle in the way of God" or "to struggle to improve one's self and/or society." Jihad is directed against Satan's inducements, aspects of one's own self, or against a visible enemy.The four major categories of jihad that are recognized are Jihad against one's own self (Jihad al-Nafs), Jihad of the tongue (Jihad al-lisan), Jihad of the hand (Jihad al-yad), and Jihad of the sword (Jihad as-sayf).Islamic jurisprudence focuses on regulating the conditions and practice of Jihad as-sayf, the only form of warfare permissible under Islamic law, and thus the term Jihad is usually used in fiqh manuals in reference to military combat."   हझरत मिर्झा  ताहीर  अहमद ह्यांनी आपले पुस्तक " Murder in the Name of Allah" मध्ये लिह्हून ठेवले आहे कि "As far as Islam is concerned, it categorically rejects and condemns every form of terrorism. It does not provide any cover or justification for any act of violence, be it committed by an individual, a group or a government..... I most strongly condemn all acts and forms of terrorism because it is my deeply rooted belief that not only Islam but also no true religion, whatever its name, can sanction violence and bloodshed of innocent men, women and children in the name of God."  पण प्रत्यक्षात जिहाद च्या नावाखाली विकृतपणा चालवला  जातोय.



आत्ता पर्यंतच्या हल्ल्याची यादी बघितली तर 

१२ मार्च १९९३ - मुंबई बॉम्ब ब्लास्ट 
१४ फेब १९९८ - Coimbatore
१९९९  - कारगिल हल्ला
१३ डिसेंबर २००१ -  भारतीय संसद
१० oct २००१ - J & K  
२५ sept २००२ - अक्षरधाम मंदिरावरील हल्ला
६ डिसेंबर २००२ -  मुंबई 
२७ jan २००३ - मुंबई 
१४ मार्च २००३ - मुंबई 
२८ जुलै २००३ - मुंबई 
२५ ऑगस्ट २००३ - मुंबई 
१४ मे २००३ - J & K 
१५ ऑगस्ट २००४ - आसाम 
२९ ऑक्टोबर २००५ - दिल्ली 
१८ september २००५ - आसाम & मणिपूर 
२० september २००५ - मणिपूर 
२८  डिसेंबर २००५ - कर्नाटक 
११ जुलै २००६ - मुंबई 
७ मार्च २००६ - वाराणसी 
८ september २००६ - मालेगाव 
२५ ऑगस्ट २००७ - आंध्र प्रदेश 
१८ मे २००७ - आंध्र प्रदेश 
२६ नोव्हेंबर २००८ - मुंबई 
२५ जुलै २००८ कर्नाटक
१३ feb २०१० - पुणे 




आज जगात सर्वच देशावर अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत वरील सर्व घटनांचा जर गांभीर्याने विचार केला तर त्यांची काही ठराविक तंत्रे दिसून येतील. 
  1. अपहरण - एखाद्या किंवा अनेक व्यक्तींचे अपहरण , जहाजाचे किंवा विमानाचे अपहरण करून शासन किंवा संबधित गटाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या जातात. ९० च्या दशकात तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सैद यांच्या कन्येला ओलीस ठेवून ५ अतिरेक्यांची सुटका करून घेतली होती.
  2. बॉम्ब ब्लास्ट - दूरवर थांबून नियंत्रणाद्वारे अथवा वेळेनुसार फुटणारे बॉम्ब यांची योजना करून दहशत पसरवली जाते. ११ जुलै २००६ अंधेरी rly स्टेशन 
  3. स्वैर गोळीबार - बाजारपेठ , मंदिरे, हॉटेल्स ई. ठिकाणी स्वैर गोळीबार करून दहशत पसरवणे. 
  4. जातीय व धार्मिक दंगल - धर्माच्या नावावर लोकांना चिथावून दंगल घडवणे.
आज २६/११ ला २ वर्षे पूर्ण होतात. तो अजमल कसाब अजूनही जिवंत आहे. आमचे मंत्री जाऊन त्याची चौकशी करतात "कोई तकलीफ तो नाही है |" कवी इक्बाल यांनी म्हटले आहे कि " सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा" त्यावर मला बोलावसं वाटत कि; 


"सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा
इथे प्रत्येकजण भांडतोय 
ये हमारा, वो तुम्हारा
पाण्यात  बुडून स्फोटात उडून 
माणूस भयाने खंगतो
T .V . च्या channels वर "सबसे तेज" TRP चा खेळ रंगतो."


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐




Friday, November 19, 2010

Child Laborship - Major Problem

                                   "Every child brings with it the hope that God is not yet disappointed with man," said by Rabindranath Tagore, but when I saw the celebration and SMS of "happy children's day" it is not possible to utter this noble words without shame on our face looking at the world's bonded children, millions of whom are in India, robbed of their childhood before it even to bloom? I was totally confused what was going on? The answer, unfortunately, is in negative. What should we do on children's day? And what we are doing? We cannot celebrate as make few famous children RJ and tell them to play the songs on radio or take our child to mall and shop for him. This day should celebrate for them who don’t know what is Radio or Mall. 

                              The issue of exploitative child -labor seems yet to draw serious attention. Child- labor is a global problem. In India to child- labor remains a persistent and ubiquitous problem. Still we have almost 4 million children in India employed in firework industries, brick-making industries, the carpet manufacturing industries etc. 

                        The significant causes of child-labor are poverty, large family, absence of provision for compulsory education and ignorance of parents, etc. Such children rarely ever get an education, thus adding the list of illiterate in the nation. It is the harsh reality. The psychological damage to children from another unfortunate story. They have no proper childhood, nor can they hope for meaningful adulthood. Denied love, physical care, nutrition, social stimulus, moral inputs or opportunity for education and advancement in life, they are more or less condemned in prison like environments.

                 It has been observed that child-labors are exposed to serious and continuous health hazards. The glass factories of Firozabaad near Agra are best example. Here nearly 50,000 children below the age of 14 years are working in front of furnaces; their helpless faces only a few inches away from the inferno which roars at the temperature of about 1,600° C. as a result they sustain eye injuries and burns while working at the furnaces. Bhiwandi is another area of exploitation of child - labor. The 15,000 children employed in the power-loom s work in 12 hours shift and some even 24 hrs. Stretch and inhale cotton dust which affects the linings of their lungs leading to the symptoms of T.B. bronchitis, etc. Also working in chemical industries often face the respiratory problem due to extensive use of chemicals they also suffer from severe-physical ailments, medical facilities and civic amenities are distance dreams to them.

                   Along with physical exploitation, economic exploitation of child-labor in India is also appears to have increased over the years child- labors are paid very low wages that range from 1/3 to a half of that of adults, even though their output is greater as they work for longer hours. Often, under the guise of apprenticeship, children are not paid for their work. The most shocking example can be found in Shivkashi Fireworks industry in which some 50,000 children, comprising half the number employed, literally play with every minute of their lives. Their ages range from 3 ½ to 15 years a they works for as long as 17 to 18 hours continuously at wages as low as Rs. 2/- to Rs. 5/- per day. In many instances children are kept under close watch not allowed to go to outside or have contact or talk to person when in the street. The children work long hours, some when failing to work or making mistake are kept in closed rooms, sometimes tortured and children, who try to escape, are beaten up. They are victim down the line because they have no voice.

                             In India there are stringent laws against child – labor, but for most part they are broken. Our constitution specially protect child –labor from any exploitation of any kind.

  1. According to the article 24 of the constitution warns that children below the age of 14 years should not be employed in a factory, mines or any hazardous occupation.
  2. Article 39 (e) urges that the tender age of children compel not to be abused and argues against being given such work that it not suited their age, strength or sex for sheer economic need.
  3. Article 39(f) states that children should be given opportunities and facilities to develop in a healthy manner and in condition of freedom and dignity.
  4. Article 45 makes it mandatory for the states to try to provide free and compulsory education to all children below the age of 14 years.

Apart from these Constitutional provisions, various acts and legislation have been enacted from time to time not only to prohibit but also to protect child-labor. At present there exist nearly 14 legislative enactments to provide legal protection to the children in various occupations. But what is harsh reality?

               Despite constitutional safe-guards, child – labor continues to be in its most dehumanizing form. The problem of child – labour and adult labor is full of ironic. Labour laws are comprehensive for adults and cover social security, basic health services and security of employment, contractual benefits and machinery for arbitration in industrial disputes. Adult workers often have the union power behind them. Adults thus have protection; children do not. What human being can bear to see such tragedy and refrain from doing something about it?


               The only way to combat this social evil is to create social awareness. But not like this k “Arey yar! What is going on? Small children are working instead of studying? People should aware about child labour!! We should protest against child labour aur baccho ko kam pe rakhanewale ko saja bhi milani chahiye!! Chalo! chai pike ate hai.”  And we shout “Hey chhotu do chai lana!!!!” here we easily forget that just before second we are talking about child – labour & whom we ask 2 cup tea that “chhoto” is also small child!!!!!!!!!!! What a reality??? We should refuse to buy products made by children whom we suspect to be below the age of 14 years. If anybody exploits the child – labour, we should be reported about such people, to the appropriate authorities. One reason why parents agree to send their children to work is that the children the augment the merge family income. If school includes vocational courses that pay for the products made, then children earn while they learn. 

                  At the same time Government resources, along with those companies willing to contribute should be channeled to finance schemes for basic facilities at the site, health coverage, nutrition programs and compulsory primary education & vocational, non-formal education. There is need to build a strong public opinion against The Child – Labourship. 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Monday, October 18, 2010

" Birth Control" ची "aai" - Margaret Sanger

कुटुंबनियोजन, Birth Control हि आज आम बात झाली आहे. सुखी संसारासाठी लहान कुटुंब म्हणजेच एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं नको असणं, हे सगळ्यांना पटलं आहे; पण थोड्या दशकापूर्वी केवळ आपल्याकडेच नाही तर सुधारलेल्या देशात देखील ' मुल नको' असा म्हणत नसत. परदेशातही वारंवार होणाऱ्या बाळतपणामुळे शेकडो माता आणि बालके मृत्युमुखी पडत. याविरुद्ध जगात सर्वप्रथम आवाज कोणी उठविला माहित आहे? जगात सर्वप्रथम कुटुंबनियोजन आणले कोणी माहित आहे? मैत्रिणीसाठी " Birth Control " बद्दल माहिती शोधताना हि interesting माहिती मिळाली. Birth Control चा जन्म " Margaret Sanger" मुळे झाला

१९१३ मध्ये एका truck Driver ची २८ वर्षाची बायको " Sandie " मृत्युपंथाला लागली होती. तिला ३ लहान मुळे होती व चौथं पोटात होतं. तिने गर्भपात केला होता आणि त्यामुळे ती मृत्यूच्या दाराशी होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे ती वाचली होती; पण ती ओरडली कि "पाचव्या मुलाच्या वेळी माझा मृत्यू अटळ आहे." डॉक्टरांना हा रोजचा अनुभव होता. पण ह्या प्रकाराने हेलावून गेली ती एक नर्स. तिचं नाव होतं Margaret Sanger . गर्भपात व त्यामुळे महिलांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी तिने निर्धार केला. १९१४ मध्ये तिने " The Women Rebel" नावाचं नियतकालिक सुरु केलं त्यातून " Birth Control " हा शब्द अस्तित्वात आला. या नियात्कालीकामुळे अमेरिकन महिला खडबडून जाग्या झाल्या. सरकारने त्यावर बंदी घातली. मार्गारेटने " Family Limitations" म्हणजेच "परिवार नियोजन" नावाचं पुस्तक लिहिलं रातोरात एक लाख प्रती गुपचूप छापण्यात आल्या आणि वाटण्यात आल्या. या कळत Margaret ने England,France आणि Holland च्या विशेषज्ञांशी संपर्क ठेवला. England चे प्रसिद्ध Gynecologist Dr. Heavlock Ealis यांच्याकडून तिने या संदर्भातील ज्ञान मिळविले. त्यासाठी ती १९१५ ला Hollond ला असलेल्या १८७८ साली उघडलेल्या जगातील पहिल्या 'Birth Control Clinic" ला भेट देवून आली. Nieuw Malthusian schen Bond (the Dutch Malthusian League) ने जगातील पहिले क्लिनिक उघडले असले तरी त्याचा फारसा प्रसार केला नव्हता. Dr. de Rooy (१८८१ ) आणि Dr. Aletta Jacobs (१८८२ ) हि संस्था जॉईन केली. Dr. Aletta Jacobs १८८३ साली आठवड्यातून दोनदा हे clinic भरवत आणि कामकाजी महिलांना "Birth Control" चा सल्ला देत. पण त्यांचे कार्य हे Holland व कामकाजी महिलांपुर्ता मर्यादित होतं. म्हणूनच १६ ऑक्टोबर १९१६ रोजी Margaret Sanger ने Brooklyn येथे उघडले "Birth Control Clinic" हे जगातील पहिले क्लिनिक मानले जाते व Margaret Sanger तळागाळापर्यंत पोहोचली व जगभर तिने हे ज्ञान फोचावण्याचा प्रयत्न केला म्हणून ती " Birth Control" ची "aai" मानली जाते. तिल्च्या क्लिनिक मध्ये पहिल्याच दिवशी १५० महिला आल्या पण १० व्या दिवशी पोलिसांनी ते क्लिनिक बंड पाडलं. मार्गारेटला हडळ, भ्रष्ट , जातीद्रोही, अजन्म अर्भकांची हत्यारी म्हटले गेले. तिला आणि तिच्या बहिणीला पकडण्यात आले.

८ जानेवारी १९१७ रोजी त्यांना ३० दिवसाच्या कारावासाची शिक्षा झाली;पण सर्व महिलांनी व सुज्ञ व्यक्तींनी ह्याचा निषेध केला. फेब्रुवारी १९१७ ला तिने "Birth Control Review" नामक नवी पत्रिका सुरु केली. त्यःचा सर्व जगात प्रभाव पडला. १९२१ मध्ये " American Public Health Association" ने New York मध्ये रात्रीया जन्म नियंत्रण संमेलन आयोजित केले. त्यात मार्गारेट ला " जन्म नियंत्रण नैतिक आहे का ? " हा विषय देण्यात आला होता. पण Roman Catholic Church च्या Arch Bishop च्या आदेशानुसार त्यावर बंदी घालण्यात आली.यामुळे उलट मार्गारेटचे महत्व वाढले.१९२२ मध्ये जपानच्या क्युबो नामक संघटनेने तिला व्याख्यानासाठी आमंत्रित केला;परंतु तिला आता वारंवार अटक करण्यात येऊ लागली. पुढे सरकारचे कायदे ढिले पडू लागले. लोकांचा आणि महिलांचा उठाव जोरात वाढू लागला. तिला सर्वत्र सन्मान मिळू लाल्ग्ला.वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य लक्षात घेऊन ती १९२३ मध्ये ती भारतात येणार होती. परंतु ब्रिटीश सरकारने तिच्या कार्यात अडथळे आणले.

पण  त्यापूर्वीच  भारतात  १९२१  साली "Birth Control Clinic" रघुनाथ  धोंडो  कर्वे  यांनी  उघडले होते.त्याचवेळी London मध्ये हि Marie Carmichael Stopes हिने हि "Birth Control Clinic" उघडले होते. रघुनाथ (जानेवारी १४, १८८२ - ऑक्टोबर १४, १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वेयांचे पुत्र होय. त्यांच्या जन्माच्याच वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहांत झाल्यामुळे गरोदरपणा संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून जवळपास पंचाहत्तर वर्षापूर्वी लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी धरला होता.लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता.पण संतती नियमनाची पुरेशी साधन/शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत.त्यामुळे स्त्री-आरोग्यावरगंभीर परिणाम व्हायचे.कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची.खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची,अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बर्‍याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला.एक सोपा उपाय त्यांना सापडला. संततिनियमन.संततीनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों.कर्वे यांनी १५ जुलै १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. १९५३ प्रथमच Margaret Sanger भारतात आली; परंतु दुर्दैवाने तिची आणि रघुनाथ धोंडो कर्वे यांची दुर्दैवाने भेट होऊ शकली नाही. कारण रघुनाथ धोंडो कर्वे यांचा मृत्यू १९५३ ला झाला. या नंतर १९५९ साली पण Margaret Sanger भारतामध्ये आली. १९ फेब्रुवारी १९५९ रोजी तिने अंतरराष्ट्रीय परिवार नियोजन संमेलनाच्या सहाव्या अधिवेशनात कुटुंब नियोजनाचे महत्व प्रतिपादित केले. तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी तिच्या अनमोल कार्याचा गौरव केला. जवळ-जवळ ५० वर्षे माता, बालके, परिवार नियोजन, समजा कल्याणाचे कार्य करणारी " Birth Control" ची "aai" Margaret Sanger ने वयाच्या ८३ व्या वर्षी ६ सप्टेंबर १९६६ मध्ये या जगाचा निरोप घेतला.

●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Sunday, September 26, 2010

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - 3


झाशीची शूर राणी लक्ष्मीबाई हिचे नाव प्रत्येक भारतीयांच्या जिव्हाग्रावर नाचत आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य- संग्रामातील तिच्या धडाडीने, पराक्रमाने प्रतिस्पर्धी इंग्रजी सेनापतीनाही  मुग्ध करून टाकले होते. झाशीच्या राणीच्या योग्यतेचे पाच -दहा सेनापती जर क्रांतीकारकांच्या पक्षात असते तर या युद्धात इंग्रजी सत्तेचा कायमचा विनाश झालेला दिसला असता.

 झाशीच्या राणीचा पूर्ववृत्तांत 
मराठेशाहीत झाशीचे शासक हे पुण्याच्या पेशव्यांच्या अंकित राहणारे जहागीरदार होते. त्यांना राजा हा किताब मिळाला होता. सन १८१७ साली झाशीचे राजे रामचंद्रराव यांच्या बरोबर इंग्रजांनी मित्रत्वाचा तहनामा केला. त्यात झाशीचे राज्य वंशपरंपरेने रामचंद्ररावांच्या  कुळातच ठेवले जाईल असे आश्वासन इंग्रज सरकार तर्फे देण्यात आले होते. रामचंद्रराव यांच्या पाश्च्यात त्याचे पुत्र गंगाधरराव हे गादीवर बसले. त्यांच्याशीच लक्ष्मीबाईचा विवाह झाला होता. शेवटच्या बाजीराव पेशव्याच्या बरोबरच लक्ष्मीबाईचे वडील   मोरोपंत तांबे हे हि ब्राम्हवार्तास येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांच्या या कन्येला, धोंडोपंत, रावसाहेब, तात्या टोपे आदी तिच्या समकालीन मंडळींबरोबर घोड्यावर बसणे, शस्त्र संचालन करणे आदी युद्धोपयोगी विद्या व कलांचे शिक्षण मिळालेले होते  व अल्पवयातच ती निपुण बनली होती. लक्ष्मीबाईचे पती गंगाधरराव लवकरच दिवंगत झाले. त्यावेळी तिचे वय फक्त १८ वर्षाचे होते. गंगाधररावांनी आपल्या कुळातील दामोदर नावाच्या एका बालकाला दत्तक घेतले होते.  " एम्पायर इन इंडिया" नामक पुस्तकात लेखक मेजर इव्हान्स वेल यांनी हे नमूद केले आहे. कि - " दत्तक घेण्याचा संस्कार हिंदू धर्माश्स्त्रास अनुसरून यथोचित रीतीने करण्यात आला होता. त्यावेळी इंग्रज अधिकारीही तेथे उपस्थित होते. आपण दत्तक मुलगा घेतला आहे याची सूचना गंगाधरराव यांनी मरणापूर्वी इंग्रज सरकारला दिली होती. " 
          पण इतके सर्व असूनही १८५४ साली आपणास दत्तक नामंजूर असल्याचे Governor General Lord Dalhousie याने कळवले.  ईतकेच करून तो थांबला नाही तर त्याने झाशीचे राज्य खालसा करून टाकले व झाशीचे जडजवाहर  व सर्व संपत्ती जप्त करून खजिन्यात जमा केली. त्याच वेळी राणी लक्ष्मीबाईच्या मनात इंग्रजी शासनाबद्दल द्वेशाग्नी भडकून उठला. इंग्रजांचा नीचपणा आणखीही पुढे गेला होता. तिचे राज्य खालसा करूनच तो थांबला नव्हता तर प्रजेच्या मनावर तिच्या संबंधीचा विलक्षण प्रभाव त्यांना नष्ट करायचा होता. त्यासाठी राणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास त्यांनी प्रारंभ केला. पण राणीच्या चारित्र्याचा पूर्ण परिचय असलेल्या Major Malkam नामक एका विद्वान इंग्रजानेच परस्पर या आरोपाचे जोरदार खंडन केले. १६ मार्च १८५५ Governor General ला लिहिलेल्या सरकारी पत्रात त्याने नि: संदिग्ध भाषेत कळविले कि - " राणीचे चारित्र्य" अत्यंत उच्च प्रतीचे आहे आणि झाशीतील प्रत्येक मनुष्य तिच्याविषयीच्या आदराने भारावून गेलेला आहे." 
                     केवळ १८ वर्षाच्या कोवळ्या वयात विधवा झालेल्या या वीर महिलेने तिच्या हक्कावर, राज्यावर, संपत्तीवर व चारीत्र्यावरही इंग्रजांनी जो घोर अन्याय चालवला होता त्याखाली मान न वाकवता, त्याचा प्रतिकार करण्याचा अलौकिक धैर्य अंगी बाणवले. तिचं कर्तृत्वाचा काळ १८५४ ते १८५८ हा होता. तिच्या दिव्या गुणांच्या आविष्काराने दिपलेल्या इंग्रजानाही लाजेने मान खाली घालावी लागली.
                     दत्तक नामंजूर करून झाशीचे राज्य व संपत्ती खालसा केल्यावर इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईला दरमहा रुपये  ५००० /- पेन्शन देऊ केली, पण इंग्रजांनी फेकलेला हा भिकेचा तुकडा राणीने ठोकरीने उडवून लावला. " मै अपनी झाँसी नही दूंगी" असे तिने इंग्रज अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. राणीने झाशीला स्वत:ची संघटना उभारली. झाशीतील स्त्रियांना तिने स्वत: युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. भावी स्वातंत्र्य युद्धासाठी प्रजेची माने तिने अनुकूल करून घेतली. 
                  ४ जून  १८५७ रोजी कानपूरला  नानासाहेबांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्याच दिवशी राणीनेही झाशीचे स्वातंत्र्य घोषित केले. १२ नंबरची इंग्रजांची फलटण तिला येऊन मिळाली. कानपूर प्रमाणे झाशिनेही इंग्रजांच्या खजिन्यावर, दारूखान्यावर,  प्रथम ताबा मिळवला. दि. ७ जूनला राणीने झाशीच्या किल्ल्यावर हल्ला चढवून तो जिंकून घेतला. स्वातंत्र्याचा   ध्वज उभारून त्याची सर्वत्र द्वाही फिरविण्यात आली कि, ' खल्क खुदा का, मुल्क बादशहा का और हुकम राणी लक्ष्मीबाई का'  ८ जून १८५७ पासून २४ मार्च १८५८ पर्यंत झाशीवर राणी लक्ष्मीबाईचाच  अधिकार नांदत होता. ती झाशिलाच पक्के ठाण मांडून बसली होती. झाशी हे मध्य बर्तातल्या सर्व क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले. 
                 १८५८ च्या जानेवारीपासून इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईवर आक्रमण सुरु केले. झाशीच्या आजूबाजूचा प्रदेश काबीज करीत हि सेना झाशीच गळा आवळीत पुढे सरकत होती. राणीने त्यावर उपाय म्हणून 'दग्धभू रणनीती' अवलंबिली. दि. २४ मार्च १८५८ ला तो झाशीला पोहोचला व झाशीला वेढा दिला. 

 झाशीच्या लढवय्या महिलांची फौज 
राणी हे जाणून होती. तिनेही वेध लढवण्याची पूर्वतयारी केली होती. दिवस राणीची फौज लढत होती. तिच्या सैन्यात स्त्रियांचा भरणा होता. प्रसंगी तोफा चालविण्याचेहि काम त्यांनी केले. किल्ल्याला इंग्रज फौजांनी पडलेली भगदाडे त्या महिला फौजेने रात्रीत बुजवून टाकली. 
१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात शेकडो वीर महिला आघाडीवर पुरुष योद्धयांच्याहि अग्रभागी तळपल्या. मोतीबाई नावाची एक स्त्री राणीच्या हेर खात्याची प्रमुख होती. ती धर्माने मुसलमान असून नाटकात स्त्री भूमिका करायची. एव्हढेच  नव्हे तर सर्व प्रकारच्या बेमालूम भूमिका वठवायची. तो तिचं व्यवसाय होता. ती मुसलमान फकिराचा वेष बेमालूम वठवून शत्रूच्या गोटात प्रवेश करी व सर्वत्र संचार करून शत्रूकडील बातम्या काढून आणत असे. या कमी राणीला तिची मोलाची मदत मिळत होती. 
आपल्या गोटात स्वैर संचार करणारा व गोड गळ्याने सुस्वर गाणी म्हणणारा भिक्षेकरी फकीर म्हणजे एक स्त्री आहे आणि राणीच्या हेर खात्याची प्रमुख आहे हे इंग्रजांना कळलेच नाही. मोतीबाई फक्त नातीच नव्हती तर युद्धकलेतही निपुण होती. झाशीच्या वेढ्यातही वेळी महिलांच्या नगर रक्षक पाल्तानीची तीच सेनानी होती. 
मोतीबाई प्रमाणे राणीची दुसरी महत्वाची सरदार ललिताबाई बक्षी हि होती घोड्यावर स्वारी करण्यात ती निपुण होती झाशीच्या लढ्याच्या वेळी मोठ्या धाडसाने तटावरून किल्ल्यात चढून येणाचा प्रयत्न करणाऱ्या २ इंग्रज अधिकाऱ्यांना ललिता बक्षीने अश्वसंचालनात ती जितकी निपुण होती तितकीच तोफांची बिनचूक गोलंदाजी करण्यात हि तिचं हातखंडा होता. ललिता प्रमाणेच झलकारी हि एक राणीच्या विस्वसातली सेविका होती. "Lieutenant Bone" जेव्हा किल्ल्याच्या तटावर चढू लागला. तेव्हा मोठा धोंडा त्याच्यावर घालून झालकारीनेच त्याचा कपाळमोक्ष केला होता. लालीताप्रमाणेच तोफांची गोलंदाजी  करण्यात निष्णात असलेली सुंदर नावाची एक दासी राणीजवळ होती. झाशीच्या वेढ्याच्या वेळी पुरुष गोलंदाज मारले गेल्यावर ललिता व सुंदर यांनीच तोफा चालवल्या. त्यांचे कर्तृत्व पाहून इंग्रज गोलंदाजांनी लज्जित होऊन आपले मोर्चे बदलले. 

           राणी लक्ष्मीबाई प्रमाणे दिसणारी तिची काशी नावाची एक दासी होती. तीही शूर व धाडशी होती महिला होती. झाशीच वेढा लढविणे अशक्य झाल्याने वेढा फोडून काल्पीस निघून जाण्याचा राणीने निश्चय केला. प्रसंग आणीबाणीचा होता. इंग्रज शहरात घुसले होते . अशा प्रसंगी लढत - लढत जाण्याखेरीज मार्ग नव्हता. पण त्यामुळे राणी इंग्रजांच्या हाती लागण्याची शक्यता होती अशा प्रसंगी राणीसारख्याच दिसणाऱ्या काशीने राणीचा पोशाख केला व काही स्वार बरोबर  घेऊन घोडा दौडवीत ती तटाच्या बाहेर पडली. ' अरे, हि पहा राणी चालली' असे म्हणून इंग्रज फौज तिच्यावर तुटून पडली. या संधीचा फायदा घेऊन खरी राणी सध्या पोशाखात आपल्या निवडक आणि विश्वासू स्वारांसह किल्ल्याबाहेर निघून गेली. राणी दूर निघून गेल्यावर इंग्रजांना आपली चूक कळली. तितक्यात काशिनेही त्यांना झुकांडी दिली व ती अगदी वेगाने घोडा दौडवीत लवकरच काल्पीच्या रस्त्यावर आपल्या परमप्रिय स्वमिनीच्या तुकडीत येवून मिळाली. अशा प्रकारे तेलही गेले तूपही गेले आणि भग्न व दग्ध झाशीचे धुपाटणे इंग्रजांच्या हाती लागले. 
           काशिप्रमाणेच मुंदर हि एक पराक्रमी व धाडशी युवती राणीच्या पदरी होती. झाशीहून निघाल्यापासून ती अखेर पर्यंत सावलीप्रमाणे राणीच्या बरोबर काशी व मुंदर यांनी राणीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला व त्यात स्वताचे बलिदान केले. 

 झाशीच्या राणीची अखेरची लढाई 
            झाशी सोडून राणी एका दिवसात १०८ मैलाची मजल मारून काल्पीला पोहोचली झाशीच हा १२ दिवसांचा संग्राम युद्ध इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला आहे. राणी झाशीहून निघून गेलेली पाहून सर ह्यु रोज काल्पीवर चालून गेला व ती स्वताच आपली फौज घेवून रोज वर चालून गेली काल्पी पासून ४२ मैलावर कांचागावत तिने इंग्रजी फौजेला गाठले. घनघोर लढाई झाली. पण तिला हवी तशी मदत ना मिळाल्यामुळे शेवटी पराभव पत्करावा लागला. पण पुन्हा फौज सुसंघटीत करून ती काल्पीला परतली आता तर सर ह्यु ने काल्पिवरच आक्रमण केले. तेव्हाही लक्ष्मीबाईच पुन्हा त्याच्याशी लढली. इंग्रजांची उजवी बाजू पार मोडून पडली त्यामुळे इंग्रज गोलंदाज तोफा सोडून पळाले. क्रांतीवाद्यांच्या फौजेत सुव्यवस्था, स्वामीनिष्ठा, नसल्याने शेवटी काल्पी इंग्रजांच्या हाती गेले. 
           काल्पीचा पराभव झाल्यावर क्रांतीवादी फौजा पुन्हा गोलापूरला एकत्र आल्या. राणी लक्ष्मीबाई, रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, बांद्याचा नबाब आदी पुन्हा एकत्र आता फारशी फौज त्यांच्यापाशी उरली नव्हती. एकट्या राणीचेच पथक संघटीत होते. राणीने सर्वाना ग्वाल्हेरला जाण्याचा आणि तो सर्वांनी ऐकला. दि. २८ मे १८५८ ला हि सर्व मंडळी ग्वाल्हेरला पोहोचली. तेथे शिंद्यांची सुसज्ज फौज त्यांना मिळाली. दारुगोळा युद्धसामुग्रीहि त्यांना मिळाली. आता ग्वाल्हेर  क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले १५ जून १८५८ रोजी सर ह्यु रोज ग्वाल्हेरवर चालून आला यावेळ राणीनेच रोजला प्रतिकार केला. त्यावेळी General स्मिथ रोज च्या सहाय्याला आला १५-१७ जून  हे तीनही दिवस राणी इंग्रज फौजेवर तुटून पडली. 
            राणी आता संपूर्ण घेरली गेली तिच्याजवळ १५-१६ च घोडेस्वार उरले होते. पण ती रणरागिणी इंग्रज सेनेला कापीत पुढे निघाली. फळी फोडून ती भरधाव    निघाली तिच्या मागावर इंग्रज तुकडी निघाली त्याच्याशी राणीच्या चकमकी चालू झाल्या त्यात मुंदर कामी आली दोन्ही कडील मनुष्यबळ कमी होऊ लागले. राणी नाल्याच्या काठावर आली. तिचं घोडा यावेळी कच्छ होता तो उडी मरेना, तर अडलाच व जागीच रिंगण करू लागला तेव्हढ्यात  इंग्रजांनी राणीला घेरले तर तिने त्यांना जमीनदोस्त केले. पण एक घाव तीच्या मस्तकावर बसला एक डोळा लोंबकळू लागला. रामचंद्रराव नावाच्या एका विश्वासू सेवकाने तिला उचलून  जवळ असलेल्या एका साधूच्या झोपडीत नेले. आणि तेथेच १७ जून १८५८ रोजी हि धगधगती ज्यात मालवली गवताच्या गंजीत तिच्या शवाला अग्नी देण्यात आला तिच्या निर्जीव देहालाहि शत्रूचा स्पर्श होऊ शकला नाही. " सर्व क्रांतीवादी नेत्यात राणी लक्ष्मीबाईची योग्यता अत्युच्च  प्रकारची होती" अशे General व्हिसेंट स्मिथ ने तिचे वर्णन केले आहे. 
                                      
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•