" Birth Control" ची "aai" - Margaret Sanger

कुटुंबनियोजन, Birth Control हि आज आम बात झाली आहे. सुखी संसारासाठी लहान कुटुंब म्हणजेच एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं नको असणं, हे सगळ्यांना पटलं आहे; पण थोड्या दशकापूर्वी केवळ आपल्याकडेच नाही तर सुधारलेल्या देशात देखील ' मुल नको' असा म्हणत नसत. परदेशातही वारंवार होणाऱ्या बाळतपणामुळे शेकडो माता आणि बालके मृत्युमुखी पडत. याविरुद्ध जगात सर्वप्रथम आवाज कोणी उठविला माहित आहे? जगात सर्वप्रथम कुटुंबनियोजन आणले कोणी माहित आहे? मैत्रिणीसाठी " Birth Control " बद्दल माहिती शोधताना हि interesting माहिती मिळाली. Birth Control चा जन्म " Margaret Sanger" मुळे झाला

१९१३ मध्ये एका truck Driver ची २८ वर्षाची बायको " Sandie " मृत्युपंथाला लागली होती. तिला ३ लहान मुळे होती व चौथं पोटात होतं. तिने गर्भपात केला होता आणि त्यामुळे ती मृत्यूच्या दाराशी होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे ती वाचली होती; पण ती ओरडली कि "पाचव्या मुलाच्या वेळी माझा मृत्यू अटळ आहे." डॉक्टरांना हा रोजचा अनुभव होता. पण ह्या प्रकाराने हेलावून गेली ती एक नर्स. तिचं नाव होतं Margaret Sanger . गर्भपात व त्यामुळे महिलांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी तिने निर्धार केला. १९१४ मध्ये तिने " The Women Rebel" नावाचं नियतकालिक सुरु केलं त्यातून " Birth Control " हा शब्द अस्तित्वात आला. या नियात्कालीकामुळे अमेरिकन महिला खडबडून जाग्या झाल्या. सरकारने त्यावर बंदी घातली. मार्गारेटने " Family Limitations" म्हणजेच "परिवार नियोजन" नावाचं पुस्तक लिहिलं रातोरात एक लाख प्रती गुपचूप छापण्यात आल्या आणि वाटण्यात आल्या. या कळत Margaret ने England,France आणि Holland च्या विशेषज्ञांशी संपर्क ठेवला. England चे प्रसिद्ध Gynecologist Dr. Heavlock Ealis यांच्याकडून तिने या संदर्भातील ज्ञान मिळविले. त्यासाठी ती १९१५ ला Hollond ला असलेल्या १८७८ साली उघडलेल्या जगातील पहिल्या 'Birth Control Clinic" ला भेट देवून आली. Nieuw Malthusian schen Bond (the Dutch Malthusian League) ने जगातील पहिले क्लिनिक उघडले असले तरी त्याचा फारसा प्रसार केला नव्हता. Dr. de Rooy (१८८१ ) आणि Dr. Aletta Jacobs (१८८२ ) हि संस्था जॉईन केली. Dr. Aletta Jacobs १८८३ साली आठवड्यातून दोनदा हे clinic भरवत आणि कामकाजी महिलांना "Birth Control" चा सल्ला देत. पण त्यांचे कार्य हे Holland व कामकाजी महिलांपुर्ता मर्यादित होतं. म्हणूनच १६ ऑक्टोबर १९१६ रोजी Margaret Sanger ने Brooklyn येथे उघडले "Birth Control Clinic" हे जगातील पहिले क्लिनिक मानले जाते व Margaret Sanger तळागाळापर्यंत पोहोचली व जगभर तिने हे ज्ञान फोचावण्याचा प्रयत्न केला म्हणून ती " Birth Control" ची "aai" मानली जाते. तिल्च्या क्लिनिक मध्ये पहिल्याच दिवशी १५० महिला आल्या पण १० व्या दिवशी पोलिसांनी ते क्लिनिक बंड पाडलं. मार्गारेटला हडळ, भ्रष्ट , जातीद्रोही, अजन्म अर्भकांची हत्यारी म्हटले गेले. तिला आणि तिच्या बहिणीला पकडण्यात आले.

८ जानेवारी १९१७ रोजी त्यांना ३० दिवसाच्या कारावासाची शिक्षा झाली;पण सर्व महिलांनी व सुज्ञ व्यक्तींनी ह्याचा निषेध केला. फेब्रुवारी १९१७ ला तिने "Birth Control Review" नामक नवी पत्रिका सुरु केली. त्यःचा सर्व जगात प्रभाव पडला. १९२१ मध्ये " American Public Health Association" ने New York मध्ये रात्रीया जन्म नियंत्रण संमेलन आयोजित केले. त्यात मार्गारेट ला " जन्म नियंत्रण नैतिक आहे का ? " हा विषय देण्यात आला होता. पण Roman Catholic Church च्या Arch Bishop च्या आदेशानुसार त्यावर बंदी घालण्यात आली.यामुळे उलट मार्गारेटचे महत्व वाढले.१९२२ मध्ये जपानच्या क्युबो नामक संघटनेने तिला व्याख्यानासाठी आमंत्रित केला;परंतु तिला आता वारंवार अटक करण्यात येऊ लागली. पुढे सरकारचे कायदे ढिले पडू लागले. लोकांचा आणि महिलांचा उठाव जोरात वाढू लागला. तिला सर्वत्र सन्मान मिळू लाल्ग्ला.वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य लक्षात घेऊन ती १९२३ मध्ये ती भारतात येणार होती. परंतु ब्रिटीश सरकारने तिच्या कार्यात अडथळे आणले.

पण  त्यापूर्वीच  भारतात  १९२१  साली "Birth Control Clinic" रघुनाथ  धोंडो  कर्वे  यांनी  उघडले होते.त्याचवेळी London मध्ये हि Marie Carmichael Stopes हिने हि "Birth Control Clinic" उघडले होते. रघुनाथ (जानेवारी १४, १८८२ - ऑक्टोबर १४, १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वेयांचे पुत्र होय. त्यांच्या जन्माच्याच वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहांत झाल्यामुळे गरोदरपणा संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून जवळपास पंचाहत्तर वर्षापूर्वी लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी धरला होता.लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता.पण संतती नियमनाची पुरेशी साधन/शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत.त्यामुळे स्त्री-आरोग्यावरगंभीर परिणाम व्हायचे.कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची.खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची,अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बर्‍याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला.एक सोपा उपाय त्यांना सापडला. संततिनियमन.संततीनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों.कर्वे यांनी १५ जुलै १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. १९५३ प्रथमच Margaret Sanger भारतात आली; परंतु दुर्दैवाने तिची आणि रघुनाथ धोंडो कर्वे यांची दुर्दैवाने भेट होऊ शकली नाही. कारण रघुनाथ धोंडो कर्वे यांचा मृत्यू १९५३ ला झाला. या नंतर १९५९ साली पण Margaret Sanger भारतामध्ये आली. १९ फेब्रुवारी १९५९ रोजी तिने अंतरराष्ट्रीय परिवार नियोजन संमेलनाच्या सहाव्या अधिवेशनात कुटुंब नियोजनाचे महत्व प्रतिपादित केले. तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी तिच्या अनमोल कार्याचा गौरव केला. जवळ-जवळ ५० वर्षे माता, बालके, परिवार नियोजन, समजा कल्याणाचे कार्य करणारी " Birth Control" ची "aai" Margaret Sanger ने वयाच्या ८३ व्या वर्षी ६ सप्टेंबर १९६६ मध्ये या जगाचा निरोप घेतला.

●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!