जुगलबंदी

स्पर्शाच्या ह्या खेळात
शब्द ओठी आले
कुकरची शिट्टी झाली
मला कूकरने बोलावले 😜


ओल्या डोळ्यांची काय
मी कथा सांगू, काय झाले
कांदा कापता-कापता
नाकी नऊ आले 😭

लसणाच्या कूटनिती ला
आल्याची जोड दिली
उकळत्या तेलात जिऱ्या मिरची समवेत 
बटाटे टोमॅटो ची जोडी जुळवता
आयुष्याची गोडी कळली 🙂


नजरेच्या लपंडावात प्रीत अपुली बाहरली
हात हाती येता स्पर्शाने शब्दांची जागा घेतली

कितीही जाणलं तुला
तरी तुझ्यासाठी शब्द अपुरे पडतात
तुझ्याविषयी भावना व्यक्त करायला
कदाचित ते घाबरतात ❤️





~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!