EVERYTHING IS NORMAL !!!


सन 1985

सर जे जे हॉस्पिटल मध्ये child specialist कडे एक 8 ते 10 दिवसाची मुलगी आणली जाते, सोबत तिची चिंताक्रांत आई आणि त्या बाईची सासू.

डॉक्टर: काय झाले आहे बाळाला?

आई: आहो आमची बेबी रडत नाही किंवा हालचाल पण करत नाही फक्त झोपून राहते शु किंवा शी केली तर किंवा भूक लागली तर थोडा वेळ हुं हूं करत राहते ते पण झोपेतच! ( त्या बाईंनी एका दमात सगळे सांगितले )
-----------/----/-----/------/-----/------/------/-----/----/
सन 2016

उरण च्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात child specialist कडे एक 8 ते 10 दिवसाची मुलगी आणली जाते, सोबत तिची  आई आणि त्या बाईची आई

डॉक्टर: काय झाले आहे बाळाला?

आई: आहो आमची बेबी रडत नाही किंवा हालचाल पण करत नाही फक्त झोपून राहते शु किंवा शी केली तर तर थोडा वेळ हुं हूं करत राहते किंवा  भूक लागली तर रडते अन्यथा झोपूनच असते ( त्या बाईंनी एका दमात सगळे सांगितले )

ह्या दोन्ही सीन मध्ये एक गोष्ट कॉमन होती ते म्हणजे डॉक्टरांचे उत्तर

डॉक्टर : बर आणा इकडे बेबीला तुमच्या मला चेक करू दे तिला ( बाळाला चेक करून ) अहो कशाला काळजी करताय Everything is normal तुमची बेबी अगदी नॉर्मल आहे काही काळजी करण्याचं कारण नाही . उलट तुम्हाला बरे वाटले पाहिजे की इतर बाळांसारखा तुमची बेबी त्रास देत नाही. जास्त न रडणार बाळ हेल्दी होत. 

सन 1985 साली माझी आई मला घेऊन गेली होती आणि सन 2016 साली मी माझ्या मुलीला घेऊन गेली होती . History repeats after 31 years CAUSE MY DAUGHTER IS MY CARBON COPY .

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................