सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ५

जवळ-जवळ ८ महिन्यांनी हा भाग टाकत आहे.  कृपया क्षमा असावी.

भाग एक

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख करताना आणखी एक नाव समोर येते ते म्हणजे रामगढची राणी अवंतीबाई लोधी. रामगढ हे मध्यप्रदेश मधील मांडला जिल्ह्यातील छोटे संस्थान होते. राजा विक्रमादित्य सिंहच्या मृत्युनंतर राणी अवंतीबाई लोधी ह्या राज्य कारभार चालवत होत्या. याचाच फायदा घेत Governor General Lord Dalhousie याने रामगढ संस्थान हड्प केले. यामुळे राणी अवंतीबाई पेटुन उठली. तिने १८५७ च्या लढ्यात उडी घेतली सुरवातीला आमनेसामने आणि नंतर गनिमी काव्याने लढलेली ही रणरागीणी आपल्यातच पडलेल्या फुटीमुळे जिंकु शकली नाही. त्या मुळे शत्रुच्या हातात पडण्यापेक्षा मरण चांगले म्हणुन स्वतःस तीने संपवले असले तरी तिची विरता कमी होत नाही. अशा या राणीच्या शौर्याची कहाणी.
राणी अवंतीबाई लोधीचा पूर्ववृत्तांत
रामगढ हे मध्यप्रदेश मधील मांडला जिल्ह्यातील छोटे संस्थान होते. तेथील राजे लक्ष्मण सिंह यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र राजकुमार विक्रमादित्य सिंह गादीवर बसले. ते अल्पायुषी ठरले व त्यांच्या पश्चात वारस नसल्याने त्यांची पत्नी राणी अवंतीबाई लोधी ह्या राज्य कारभार चालवत होत्या. याचाच फायदा घेत Governor General Lord Dalhousie याने रामगढ संस्थान १८५१ साली हड्प केले. व राणी अवंतीबाई लोधी ह्यांच्या परवानगीशिवाय एक कारभारी नेमुन राजपरिवाराला पेन्शन चालु केले.हा अपमान सहन न झाल्याने ती पेटुन उठली, परंतु इंग्रज सत्तेपुढे आपले काही चालणार नाही हे जाणुन तीने घाईघाईने युद्ध न पुकारता शांतपणे लढण्याचे ठरवले.
लढ्याची पुर्वतयारी
इंग्रजांकडुन मिळणार्‍या पेन्शनचा वापर राणीने इंग्रजांविरुद्धच चालु केला ती हळुहळु स्वातंत्र्य युद्धासाठी योजना आखु लागली; यासाठी प्रथम तिने स्थानिक जमिनदार नंतर तेथील जनता अशा सगळ्यांची मते लढाईसाठी अनकुल करुन घेतली. एकीकडे अनकुल असलेल्या जनतेला योग्य ते युद्धाचे प्रशिक्षण देऊ लागली तर दुसरीकडे ती रिवा व अजुबाजुच्या राज्यांशी संधान साधण्याचा प्रयत्न करीत होती जेणे करुन तिची फळी मजबुत होईल. सैन्य जमवणे, त्यांना प्रशिक्षीत करणे, युद्ध सामग्रींची सिद्धता ठेवणे, अशी बरीच कामे करुन घेतली होती. १८५२ नंतर राणी युद्ध कसे पुकारावे ह्या विचारात अडकली होती कारण तीने पेन्शन कबुल करुन आपला विरोध आहे असे दर्शवले नव्हते. त्या मुळे योग्य संधीची वाट पाहत होती. जवळ - जवळ ५ वर्षाने तीला ती संधी मिळाली व तीने त्या संधीचे सोने करायचे ठरवले.
रणसंग्राम
जुलै १८५७ ला राणीने बंड पुकारले! त्यांच्या ह्या बंडाची बातमी जबलपुरच्या कमिशनरच्या कानी गेली परंतु आतापर्यंतचा राणीचा व्यवहार बघता कमिशनरने थोडे सबुरीने घेउन राणीला एक पत्र लिहिले कि मांडला जिल्ह्याच्या कलेक्टरला जाऊन भेटणे व तेथे शरणागती पत्करणे, तसेच तिने शरणागती पत्करली तर तीचे स्थान व पेन्शन कायम ठेवण्यात येईल. अन्यथा तिच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. स्वातंत्र्याच्या जिद्दीने पेटलेल्या राणीने ते पत्र धुडकावुन लावले व ती स्वत: युद्धाला उतरली त्यामुळे सरदारांचे व सैनिकांचे मनोबळ दुपटीने वाढले. अनेक महिने चाललेल्या या संघर्षात राणीने ब्रिटिशसैन्याचा पाडाव करीत रामगढ वर आपला ध्वज फडकवला. व अजुबाजुच्या परिसरातुन ही ब्रिटिश सैन्यची हकालपट्टी चालु ठेवली. त्यामूळे बराचसा प्रदेश ब्रिटिश अंमलापसुन मु़क्त झाला. ब्रिटिश सरकार ही शांत बसणारे नव्हते. २५ ऑक्टोबर १८५७ साली पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारने रामगढ वर हल्ल चढविला इथेही ब्रिटिश सैन्यालापराभव पत्करावा लागला. हजारभर सैन्याने ब्रिटिश सैन्याला सळो की पळो करुन सोडले. शेवटी वॉशिंग्टन ब्रिटिश सैन्याचा Chief Commander नवी ताज्या दमाची फौज घेउन रामगढ वर चालुन आला. राणीचे सैन्य अधीच लढुन थकले असले तरी त्यांनी हिम्मत हारली नव्हती. त्यांनी Chief Commander वॉशिंग्टनला पण सळो की पळो करुन सोडले. Chief Commander वॉशिंग्टन आपल्या सैन्यासह पळुन गेला. राणीच्या थकलेल्या सैन्याची हिम्मत अजुनही थकली नव्हती कारण राणी स्वत: त्यांच्या बरोबर मैदानात तलवार घेउन उतरत होती.
अशातच राणीच्या रामगढला ब्रिटिश सैन्याने वेढा देउन सर्व प्रथम तिची रसद तोडली .राणीचे सैन्य कमी असल्याने ब्रिटिशांप्रमाणे तिला दर वेळी ताज्या दमाची फौज उभी करता येत नव्हती. त्यातच आतापर्यंतच्या लढाया लढुन तिचे सैन्य थकले होते. कुठुनही कुमक मिळत नव्हती याचाच फायदा उठवत ब्रिटिशांनी तिसर्‍यांदा रामगढ वर हल्ला चढविला. ह्यावेळी पण घमासान लढाई झाली पण सैन्य बळ कमी पडु लागल्याने राणी अवंतीबाईंची पिछेहाट होउ लागली. आता आपण सामोरासमोर युद्ध केले तर आपला पराभव निश्चित हे जाणुन राणीने तेथून पळ काढला. आणि शेजारील जंगलांचा आश्रय घेतला. जंगलामुळे ब्रिटिशांना राणीचा शोध घेणे कठीण जाऊ लागले. याचाच फायदा घेउन राणीने गनिमी काव्याने लढाई देण्याचे ठरवले. तिचा हा डाव यशस्वी हि झाला. ब्रिटिशांना तिने पुन्हा एकदा हैराण केले परंतू तिला हे जास्त काळ टिकवीता आले नाही. रिवा संस्थानचे राजे तिला मदत करतील अशी तिला अशा होती परंतु ते ब्रिटिशांना मदत करत असल्याची बातमी तिच्या कानी आली. त्याच बरोबर तिला कळुन चुकल की आता आपला शेवट जवळ येऊन ठेपला आहे.
ज्योत मालवली
ब्रिटिशांनी तोडलेली रसद, आजुबाजुच्या राज्यांनी ब्रिटिशांना केलेली मदत, थकलेले आणि जखमी सैन्य अशा सगळ्या विपरीत परिस्थितीतही रणांगणावर तलवार घेउन उभी राहीलेली आणि नंतर गनिमी काव्याने ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडणारी ही रणरागीणी किमान वर्षभर हजारभर सैन्यासह ब्रिटिशांबरोबर लढा देत होती. ब्रिटिशंचा रीवा तसेच इतर संस्थानांनी ब्रिटिशांऐवजी राणीला मदत केली असते तर चित्र वेगळे असते. परंतु ह्या फुटीमुळे ब्रिटिशांचे फावले. राणी एक विरांगना होती. ब्रिटिशांच्या हातात सापडुन स्वतःची विटंबना करुन घेण्यपेक्षा मरण बरे म्हणुन तिने २० मार्च १८५८ रोजी स्वत:च्या तलवारीने स्वतःस संपविले. आणि १८५७ च्या समरातील आणखीन एक ज्योत मालवली. झाशीची राणी, बेगम हजरत महल यांच्या प्रमाणे राणी अवंतीबाई सुद्धा ब्रिटिशांच्या हातास लागली नाही.
क्रमशः

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन...................

वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे

२६/११ च्या निमित्ताने....................................