Friday, December 31, 2010

पर्यावरण संवर्धन.................. 1


This is what I never expect from myself. The Worst performance ever i gave in my life till date.






Below link is for original speech which i prepare for the competition.


पर्यावरण संवर्धन...................




~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Wednesday, December 29, 2010

हुरहूर

"हुरहूर"  ह्या  माझ्या  नवीन  कथे  विषयी  थोडस !!

वाचून  प्रश्न  पडला  असेल  ना  २  भाग  publish केल्यावर  हि  प्रस्तावना  का  टाकतेय ? पण  बरायचं  लोकांकडून  personal remark आल्यामुळे  तसेच  विचारणा  झाल्यामुळे  हे  मला  लिहावासा  वाटतंय. मुळात  म्हणजे  ह्या  कथेचा  जन्म  हा  माझ्या  व  माझ्या  मित्राच्या  discussion मधून  झाला. 

 “ओल्या  मातीचा  सुगंध ” ह्या  नंतर  मी  एकही  कथा  लिहिली  नाही  आहे . पहिल्या  story   च्या  वेळी  situation real होती; पण  त्यावर त्याचा  म्हणन  असं  होतं  कि  मी  खूप  छान  लिहिते  so माझ्या  लिखाण  करण्याला  real situation पाहिजे  असं  नाही , मी  fictional   पण  उत्तम  प्रकारे  लिहू  शकते   so मी  हा  प्रयत्न  करीत  आहे  परंतु  ह्या  story मध्ये  वापरण्यात  आलेले  details जसा  dates, place etc. ह्या  मुळे  काही  लोकांनी  मला   विचारणा  केली  तू  इतक्या  particularly कसं  काय  लिहू  शकतेस ? हि  तुझी  story आहे  का ? इतक्या  details   देऊ  नको  fictional असेल  तर ! तू   तुझाच  nick name वापरला  आहेस  असं  का ?
 प्रत्यक्षात   story लिहिताना  मी  इकडे  माझं  nick name वापरला  आहे . मी  ज्यांचं  blog ची  follower आहे  त्यांनी  आपल्या  blog   वर  जाऊन  check केलं  तर  खरच  माझं  नाव  “SONA” दिसत. तसा   पण  ह्या  story मध्ये  पुढे  अश्या  बऱ्याच  twist आणि  घटना  add होणार  आहेत . हि  कथा  पूर्णपणे  काल्पनिक  आहे . ह्यात  mention   केलेल्या  गोष्टी  अश्या  आहेत  ज्यांच्या  सानिध्यात  मी  वावरते  like our buzz. Blogs, place त्यावरून  कदाचित  हि  सत्यकथा  किंवा  माझी  story वाटण्याची   शक्यता  आहे  पण  ते  माझ्या  आजुबाजूच   वातावरण  असल्याने  मी  ते   ह्या  कथेत  गुंफले  आहे.

हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!

हुरहूर..............................१


हुरहूर...............................२




धन्यवाद  
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Tuesday, December 28, 2010

हुरहूर...............................२


Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!

धन्यवाद मित्रानो आणि मैत्रिनिनो तुम्ही जो part १ ला प्रतिसाद दिलात.  

हुरहूर..............................१

ती  ह्या  कुशीवरून  त्या  कुशीवर  वळली  तसं  तिला  त्याच्या  आठवणी  आणखीनच  घेरू  लागल्या . त्याच्या  सोबत  चा  buzz  वरील  पहिला  भांडण  आणि  नंतर  अचानक  1 month   ने  तिच्या  blog   वरील guest chat apps वापरून  तिला  केलेलं   ping  आणि  मग   त्याच्या  बरोबर  वाढत  गेलेल्या  गप्पा  सगळंच  तिला  टप्प्याटप्प्याने  आठवू  लागले.  

आता पुढे 
***********************************************************************************************************

त्याचं  ते  रोज  ping करण  आणि  GM केल्याशिवाय  कामाला  सुरवात  ना  करणं, तिचं  सकाळी  लवकर  online  येऊन  त्याच्या  येण्याची  वाट  बघणं, त्याला wish केल्यावरच  दिवसाची  सुरवात  करणं. तिच्या  ओठी  अलगद  हसू  फुलवून  गेलं; असाच  त्याने  ping केलं.   
तो: hi सोना
ती: hey तुला  माझा  nick name कसं  कळलं?
तो: कळलं  मला.  आपल्या  आवडत्या  माणसाची  बातमी  ठेवावी  लागते.
ती: जा  बाबा  तू  सांगत  नाही  ना  मला  मी  नाही  बोलणार  तुझ्याशी.
तो: बरं  तू   चिडू  नको  मी  सांगतो  अगं  तू  माझ्या  blog   ला  follow करते   आहेस ना  तिकडे  तुझा  सोना  display होतंय  म्हणून  मला  कळलं

ती:
तो: बरं  ते  जाऊ  दे  मी  एक  कविता  post केली  आहे  buzz वर  ती  check कर  आणि comment दे
ती: बरं 
काय  सुंदर  लिहिली  आहे  कविता  ह्या  वेड्याने  पण माझी commet का  जात  नाही.    
त्याला  विचारले  पाहिजे. इतक्यात  त्यानेच  ping केले.
तो: सोना   comment नाही  दिली  
ती: वेड्या  मी  comment नाही  देऊ  शकत  रे
तो : की  झाले
ती: अरे  i dont have permission to post comment
तो: wait मी  check करतो  काय  झाले  ते.
ती: k 

तो:  sorry तू  block झाली  होतीस  ग  रागावू  नको  मला  नाही  माहित  कशी  काय . i m sorry plz
ती: ok रे  sorry नको  म्हणू  मला  माहित  आहे  मी  block  का  होती.
तो: i m sorry मी  नाही  केलं  ते  मला  खरच  माहित  नाही  गं.
ती: अरे  वेड्या  माझं  ऐकून  घे  आधी  मला  माहित  आहे  मी  block का  होती  . अरे  1month पूर्वी  आपला  buzz वर  भांडण  झालं  होतं  म्हणून  तू  रागाने  मला  block   केलं  होतास  कळलं का?
तो : ok म्हणजे  ती  तू  होतीस  तर
ती  आता  परत  मला  block करणार  का ?
तो : नाही  ग  sona नाही  block करत  

ह्या  आठवणी  सरशी  तिचं  तिलाच  हसू  आला  आणि  ती  bed वर  उठून  बसली  जवळच  असलेया  बाटलीतून  पाण्याचा  घोट  घेतला  व  घड्याला  कडे  बघितलं  तर  रात्रीचे  १० :४५  वाजले  होते. आणि  तिला  परत  आठवले  कि  आपण  सकाळी  १०:४५  चा  show बघितला होता   पहिल्या  भेटीत.  ती  पुन्हा  bed वर  आडवी  झाली  आणि  ती  अंगावरची  चादर  सरळ  करता - करता त्याच्या आठवणीत  परत  गुरुफटली.  एक  - मेकांशी  बोलता  बोलता  cell no. Exchange झाले.  
मग  कधी  तरी  call वर पण  बोलण  होऊ लागल. मग  असाच  एकमेकांशी  बोलताना  त्याने  तिला  विचारलं  आपण  भेटूया  का ? ती  पण  लगेच  हो  म्हणाली.
तो: कुठे  भेटूया  तू  सांग ?
ती: वाशी  चालेल.  
तो: हो  चालेल  movie बघायला  जाऊया  पण  भेटायचा  कधी ? 
ती: तुला  ह्या  येणाऱ्या  saturday  means   6 th ला  सुट्टी  आहे  का  आपण  भेटलो  असतो.
तो: चालेल  कोणता  movie release होतोय.  
ती: action reply आणि  गोलमाल  ३ release होत आहेत 
तो: गोलमाल ३  बघायला  जाऊ  या. एक  प्रश्न   विचारू  का  तुला?एका  unknown मुलाला  भेटायची  भीती  नाही  का  वाटत  तुला?
ती: नाही  वाटत  भीती,  dont worry! आणि  तसं  पण  तू  माझ्या  area मध्ये  येत  आहेस. 
तो: madam , वाघाला  area नसतो  
ती: ohhhhh really?बरं  ठीक  आहे  सकाळी  १०:३०  ला  भेटू ६ तारखेला  मी  १० :४५  च्या show चे  tickets book करून  ठेवते  
तो : ठीक आहे ok chal bye मी ठेवतो phone
ती : chal bye tc
तो: tc
त्याने call cut केलं  असला  तरी  तिच्या  मनात  त्याच्या   भेटीची  हुरहूर  लागली  होती . काय  होईल ? कसा  असेल  ? असे  सगळे  प्रश्न  तिला  पडले  होते? त्या सर्व  प्रश्नांची  उत्तरे  तिला  फक्त  ६  November ला  मिळणार  होती.

क्रमश: 
  
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Sunday, December 26, 2010

हुरहूर..............................१

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!


रात्रीचे १०:०० वाजत आले होते तो रूम मध्ये आली आणि पहिला त्याला call लावला.तो जेवत 
होता पण तिचा call आणि तोही रात्री म्हणून त्याने headphone लाऊन तिचाcall pick केला.
ती: hello !
तो: hi बोल !  
तीजेवलास का?
तोजेवतोय बोल ना !!
तीतू जेवून घेमग आपण बोलू !
तोबोल मी headphone लावलाय , तू बोल
तीअरे actually एक  bad news आहे!
तोकाकाय झालेआपण........ (त्याचे बोलणे अर्ध्यावर तोडत ती म्हणाली)
ती: (उदासपणेआपण उद्या नाही भेटू शकत!!
तोवाटलाच होता मलाइतक्या रात्री तुझा call आला म्हणजे ....... काय झालं?
ती: sorry रेमी तुला म्हटलं होतं ना किमी sunday ला family बरोबर जाणार
होते ना त्या ऐवजी उद्या चाललोय रे
तोउद्या अचानक! sunday ला जाणार होतात ना.
तीहो रे पण दादा आला ना माझा फोफळी वरुन आणि त्याला तिकडे परत पण जायचे आहे.job ला  असतो तो  तिकडे.(तिला मनातून वाटत होतं त्याने तिला सांगावं जाऊ नको नाकाहीतरी कारण काढून मला भेट ना)
तोठीक आहे जा तूपण नंतर भेटू ..(त्याला मनातून वाटत होते कि ती बोलावे family  चालली आहे ना जाऊ दे मी नाही जात तुला भेटायला येते.)
call वर - सेकंद शांतता होती कोणीच काही बोलले नाहीतिच्या नी त्याच्या ओठी शब्द अडले होतेबोलणार कसंआपला हक्क आहे का बोलण्याचा हाच प्रश्न दोघांना पण पडला होतं शेवटी ह्या शांततेचा भंग करीत तीच बोलली.
तीतू जेवून घे आपण नंतर बोलू.
तो: bye GN SD TC
ती: bye GN SD TC

call cut करून mobile तिने charging ला लावला. व laptop चालू  करून  ती  gtalk वर  online आली.  तिला  एक - दोन  मित्रांनी  पिंग  केला  पण  तिचं  कशातच  लक्ष  लागत  नव्हत  शेवटी  signout केला  आणि  laptop बंद  करून  झोपायला  आली  पण  त्याच्या  आठवणी  तिला  झोपू  देत  नव्हत्या . तिला  सारखा  वाटायला  लागला  कि  तो  नाही  बोलला  म्हणून  काय   झाले  आपण  बोलायला  हवे  होते  कि  मी  येते  भेटायला  जात  नाही  family   बरोबर , लगेच  मनात  विचार  डोकावला  मीच  का  बोलू  तो  का  नाही  बोलला;  तो  बोलला  असता  तर  काही  फरक  नसता  पडला  पण   नाही  बोलला;  जाऊ  दे!  असं  म्हणून   ती  ह्या  कुशीवरून  त्या  कुशीवर  वळली  तसं  तिला  त्याच्या  आठवणी  आणखीनच  घेरू  लागल्या . त्याच्या  सोबतच  buzz  वरील  पहिला  भांडण  आणि  नंतर  अचानक  1 month   ने  तिच्या  blog   वरील guest chat apps वापरून  तिला  केलेलं   ping  आणि  मग   त्याच्या  बरोबर  वाढत  गेलेल्या  गप्पा  सगळंच  तिला  टप्प्याटप्प्याने  आठवू  लागले.


क्रमश:
  

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Thursday, December 23, 2010

पर्यावरण संवर्धन...................

माझ्या भाषणाची original script जशी च्या तशी देत आहे.

आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपिठा समोरील आदरणीय ज्ञाते श्रोते आणि वक्ते मी आपण समोर विषय मांडत आहे पर्यावरण संवर्धन. द्रोणागिरी स्पोर्ट्स ची स्पर्धा जाहीर झाली. त्यात दिलेली तीनही विषय वाचल्यावर मला प्रश्न पडला कि मी कोणत्या विषयावर बोलू. मलाच कळत नव्हते विषय काही निश्चित होईना आणि अचानक मी दूरदर्शन वर लागलेला हुप्पा हुया हा चित्रपट पहिला त्यामधला धरणी माय हा एक पात्री संवाद ऐकला आणि वाटलं पर्यावरण संवर्धन ह्याच  विषयावर आपण बोलायचं विषयाला सुरवात करण्यापूर्वी धरणी माय चा एक पात्री संवाद म्हणावसं वाटतोय करणं त्याशिवाय हे भाषण  पूर्णच होऊ शकत नाही 

"अरे धरणी मातेचं रडणं आणि दुखणं समजून घे मेरे भाय
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
दिसलं ती जमीन कसून घेतो, रस समदा शोषून घेतो 
माय मारू दे,
फायद्याची इकडे साम्द्यानच झाली घाय
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
कारखान्याच्या चिमणीतून धूर भसाभसा 
वरती समद पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा 
वर्षातले १२ महिने कडक उन्हात जय 
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
Global Warming वाले म्हणत्यात 
Global वार्मिंग म्हणजे पृथ्वीच वाढत चाललेला तापमान 
Global Warming वाले म्हणत्यात 
हळू जरा धरा धीर
आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर 
तापत चाललंय धरणीचा डोकं, छाती, पोट अन पाय,
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?
असाच चालू राहिला तर आपली काही खैर नाय 
उद्या जाऊन आपलंच पोरगं आपल्याला इचारलं 
बाबा - बाबा हिरवळ म्हणजे काय ?
अरे उठ , वाचव आपल्या आईला झटकून हात अन पाय 
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय?

खरं आहे ना मित्रानो काय करतो आपण आपल्या धरणी मातेसाठी सगळीकडे प्रदूषण वाढवून ठेवलय त्यामुळे पर्यावरण हानी होत आहे. तसे बघितले तर   पृथ्वीवरील सार्‍या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्यावरण आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर व विश्वात इतरत्र असे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे मानव जातीस नव्हे तर सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यावधी वर्षांच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे असे पोषक वातावरण झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगांमुळे त्यात बरेच हानीकारक बदल होऊ लागले आहेत.
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे आणि जंगलाचा नाश करुन वाढलेली शेती यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत घट होत आहे. तसेच हवा, पाणी व जमीन यांच्या प्रदूषणाचा प्रश्न वाढत चालला आहे. या जगाची वाटणी श्रीमंत देश आणि अविकसित गरीब देश अशा दोन गटात करण्यात येते. विकसित देश नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर दरडोई खूपच जास्त करतात परंतु तेथील लोकसंख्या मर्यादित आहे. याउलट अविकसित देशात गरिबी व मोठी लोकसंख्या यामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती कमी वापरूनही पर्‍यावरणाचा र्‍हास जास्त होत आहे. पर्यावरण रक्षण की गरिबी ऊन्मूलन या दुहेरी पेचात हे देश सापडले आहेत. संपन्न राष्ट्रांकडून या राष्ट्रांवर पर्यावरणासाठी कडक निर्बंध पाळण्याचे दडपण येत आहे. परंतु बेरोजगारीवर मात करण्यासाठी औद्योगिकीकरण, वाढ्त्या लोकसंख्येसाठी जंगलतोड व शेती आणि निसर्गसंपदाच पैसे मिळविण्याचे साधन झाल्याने या देशात पर्यावरण रक्षणाचे काम बिकट बनले आहे.
कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व स्वयंचलित वाहनातून पेट्रोल जाळण्याने निर्माण होणारा दूषित वायू, शिसे व काजळी यामुळे हवा प्रदूषित होत आहे. उद्योगधंदे व शहराच्या सांडपाण्यामुळे जमिनीवरील नदी, तलाव यांचे पाणी दूषित होत आहेच. शिवाय जमिनीखाली असणार्‍या पाण्याचेही प्रदूषण होत आहे. शेतीसाठी पाण्याबरोबर वापरली जाणारी रासायनिक खते पाणीप्रदूषणास कारणीभूत तर आहेतच. शिवाय शेतीसाठी अतिरिक्त पाणी वापरल्याने जमिनीत क्षार वाढून मीठ फुटण्याचे व सारी जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. पायाभूत विकासासाठी होणारे प्रकल्पही पर्यावरणाच्या नव्या समस्या निर्माण करीत आहेत. मोठ्या धरणांमुळे शेकडो एकर जंगले पाण्याखाली जाणे, धरणग्रस्तांच्या जमिनी व घरे पाण्याखाली जाण्याने त्यांचे विस्थापन करण्याची समस्या त्या प्रकल्पाच्या उभारणीत महत्वाचा अडथळा ठरली आहे. जंगलातून जाणारे मोठे महामार्ग जंगलातील प्राण्यांच्या सुरक्षिततेला आव्हान ठरत आहे.
माणसांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांच्या विकासाचा वेगही त्यानुसार वाढविण्याची धडपड सर्वत्र चालली आहे. मात्र हा विकास करताना आपण पुढील विकासाच्या सर्वच संधी नाहिशा करून टाकीत नाही ना याविषयी माणूस फारसा विचार करताना दिसत नाही. आजची गरज भागली म्हणजे झाले. उद्याचे कोणी बघितले ? अशी वृत्ती झाली आहे व ती पर्यावरणास घातक आहे. शेतकर्‍यास जमीन चांगली ठेवण्यासाठी पिकांची फेरपालटी घ्यावी, पाण्याचा व रासायनिक खतांचा कमी वापर, ऊसासारख्या नगदी परंतु जास्त पाणी लागणार्‍या पिकांऎवजी दुसरी पिके घ्यावी असे कितीही सांगितले तरी ते सहसा पाळले जात नाही. जमीन नापीक होत चालली आहे हे पाहूनही त्यात बदल होत नाही. त्वरित लाभ मिळविण्याच्या हव्यासापोटी दूरदर्शी योजनेकडे दुर्लक्ष होते. जे शेतकर्‍यांचे तेच उद्योगधंद्यांचे. उत्पादनखर्चात बचत करण्यासाठी सांड्पाण्यावर प्रक्रिया करण्याकडे चालढकल केली जाते. नगरपालिका / महानगरपालिका यांना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणेचा खर्च व ती चालविण्यासाठी लागणार्‍या विजेचा खर्च झेपत नाही. साहजिकच प्रदूषण वाढतच जाते. जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण होते. त्यामुळे त्यांच्या वापरास बंदी, किंवा पेट्रोल, डिझेलऎवजी प्रदूषणरहित इंधनाचा वापर याची कायद्याने सक्ती केली तरी त्याची अंमलबजावणी मुष्किल होते.
एकंदरीत काय ? नैसर्गिक साधनसंपत्तीचे भांडार असणारे पर्यावरण आपल्या साहाय्यास सज्ज असताना सोन्याची अंडी देणारी कोंबडीच कापणार्‍या लोभी माणसाप्रमाणे आपण पर्यावरणाचे अतोनात व भरून न येण्यासारखे नुकसान करीत आहोत.यावर काही उपाय आहे का ? पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विकास थांबवावा म्हटले तर वाढत्या गरजा भागविणे अवघड होणार व विकास केला तर पर्यावरण दूषित होणार. तसाही  पर्यावरण संवर्धन म्हणजे जैसे थे परिस्थितीच कायम ठेवणं, असं नव्हे. तसा आग्रह धरला जातो कारण पर्यावरणात होणारा बदल आणि पर्यावरणाची हानी यात नेहमीच गल्लत केली जाते. कोणताही विकास प्रकल्प उभा करायचा तर पर्यावरणात बदल होणं क्रमप्राप्त आहे. साधा रस्ता बांधायचा तर जैसे थे परिस्थिती ठेवून तो बांधला जाऊ शकत नाही. वाटेत येणाऱ्या प्रत्येक वृक्षाला वळसा घालूनच पुढं जाणंही व्यवहार्य ठरत नाही. पण त्यापायी घटलेल्या वृक्षराजीच्या जागी नवीन वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाची हानी होत नाही. यासंबंधीचे नियमही आहेत. त्यांची कडक अमलबजावणी करण्याचा आग्रह धरता येतो. पण चुकीच्या गृहीतापायी रस्ताच नको असा पवित्रा घेणं कितपत समंजसपणाचं होईल? 
ह्या  सर्व समस्यांवर नियोजनबद्ध चिरंतन विकास हे यावर उत्तर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे, अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे, प्रदूषण नियंत्रणासह विकासयोजना आखणे व टाळता न येण्याजोग्या पर्यावरण हानीबद्दल भरपाई म्हणून पर्यावरण संवर्धनाची योजना प्रकल्प आराखड्यात समाविष्ट करणे या गोष्टी केल्या तर पर्यावरणाचा दर्जा आपण टिकवू शकू.
गाव, जिल्हा, नदीचे खोरे वा कोणताही विधिष्ट भूभाग यातील विकासाचे नियोजन करताना त्या भूभागावरील पर्यावरणाचे व नैसर्गिक साधनसंपत्तीची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच हवा, पाणी, जमीन या घटकांची प्रदूषके सामावून घेण्याची श्क्ती ही मर्यादा धरली तर त्या धोकादायक मर्यादेपेक्षा खाली आपल्या आजच्या व भविष्याच्या विकासामुळे होणार्‍या प्रदूषणाचे प्रमाण राहील अशी आपण काळजी घेतली पाहिजे. आपले जीवनदायी पर्यावरण हा पूर्वजांकडून मिळालेला मालकीहक्काचा वारसा नसून आपल्या पुढील पिढ्यांकडून उसना घेतलेला ठेवा आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कर्ज जसे व्याजासह परत फेडावे लागते तसे हे पर्यावरण अधिक सुखदायी व सुरक्षित कसे करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या विकासाच्या आशाआकांक्षा उमलतील असे पर्यावरण निराम्न कारणे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण जास्त काही नाही थोडं दक्ष राहिला पाहिजे. 
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• 

▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐