२६/११ च्या निमित्ताने....................................

तिरंगा ज्याना स्वार्थाहुनहि
सदैव उंच वाटला 
त्या तिथेच नेमका आज 
हिरवा-भगवा पेटला
जेथे जन्मून गांधिजीनी  
जगतास शिकवीली आहिंसा 
त्या तिथेच नेमकी आज 
ढळढळीत जळते हिंसा
सीमेवरती जवान होते 
परतविण्यास हल्ला 
त्या तिथेच नेमका आज 
आतिरेक्यांचा डल्ला

दहशतवाद म्हणजे हिंसेच्या किंवा दहशतीच्या मार्गाने आपले इप्सित साध्य करुन घेणे.तस बघितल तर गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचे वारे सर्वच क्षेत्रात वाहू लागले आहेत, त्याचा कमी- अधिक प्रभाव राजकीय व सामाजिक परिस्थितीवर पडलेला दिसून येत आहे.मात्र त्याचा परिणाम दहशतवादी करवायांवर होइल असे वाटले नव्हते. दोन दशका पूर्वी काही विशिष्ठ कारणामुळे निर्माण झालेला दहशतवाद आता सर्वच क्षेत्रात पसरू लागला आहे.आणि भारतासारख्या देशात तर तो एक गंभीर प्रश्न बनला आहे.२६ - ११ -  २००८ ला मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्षे पूर्ण झाली. तरीही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. 

इतिहास बघितला तर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करुन हा दहशतवाद जगासमोर आला पण इंदिरा गांधीनि शीख मत बँकेचा विचार न करता सुवर्ण मंदिरावर करवाई करुन अतिरेक्याना चोख प्रतिउत्तर दिले त्या करवाईसाठी त्याना आपल्या प्राणाची आहुति द्यावी लागली त्यानंतर १९९९ साली दहशतवाद भारतव्याप्त कश्मीर मधील कारगिल भागावर हल्ला करुन पुन्हा एकदा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला ह्या वेळी ही भारताने त्यांचे डोके ठेचून काढले,ह्या नंतर मात्र ११ September  २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला आणि १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करुन आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या नंतर जुलै २००५ च्या महिन्यात जगभर पुन्हा एकदा दहशतवादाने मुसुंडी मारली. जुलै महिन्याच्या सुरुवातीस लंडन, कराची, इंडोनेशिया मधील बाली येथे bomb स्पोट झाले.आणि ५ जुलै २००५ रोजी आयोधेच्या वादग्रस्त परिसरात  घुसनारया लष्कर-ऐ- तोयबाच्या आतिरेक्यना भारतीय सुरक्षा दलाच्या जवानानी चोख प्रतिउत्तर देऊन ६ आतिरेकी ठार केले. परंतू या बाबत जवानाचे कौतुक करण्या ऐवजी  भारतीय जनता पक्षाने ह्याचे राजकीय भांडवल केले.व तत्कालीन केन्द्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल आणि उत्तर प्रदेश चे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या राजिनाम्याची मागणी केली. आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई वर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा राजीनामा मगन्याचे नाट्य रंगले. पण राजीनामे घेउन किंवा देऊन हे प्रश्न सुट्नारे नाहित. त्या बाबतीत कटू निर्णय घ्यावे लागतात आज २ वर्षे पूर्ण होऊनही कसाब जिवंत आहे. त्याच्याकडून काही माहिती मिळेल ह्या उद्देशाने त्याला जिवंत पकडण्यात आले होते. माहिती मिळणे  तर दूरच पण आत्ता त्याला पोसायची जबाबदारी आली. प्रत्यक्षात त्याचा तिथेच encounter करायला हवा होता. 

आज भारतात सर्वात शांत राज्य कोणतं असेल तर ते म्हणजे पंजाब. परंतु हेच पंजाब ८० च्या दशकात दहशतवादाच्या आगीत होरपळून निघाले होते. त्यावेळी इंदिरा गांधीनी आपल्या सत्तेचा, vote bank चा, आपल्या प्राणाचा विचार न करता हा दहशतवाद मोडून काढला; परिणामी आज पंजाब मध्ये शांतता नांदत आहे. त्यानंतर BJP व इतर पक्ष यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या करकिर्दीकडे पाहिल्यास १९९९ ते २००४ या काळात दहशतवाद शिगेला पोहोचला. १९९९ ला कारगिल, त्यानंतर मुफ्ती मोहम्मद सैद यांची कन्या रुबिया सैदच्या सुटकेसाठी अतिरेक्यांना सोडले गेले. २००० साली काश्मीर मधून अजहर मसूद सह काही दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण करण्यात आले व त्यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी भाराताने आपली मान झुकवली; तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग अतिरेक्यांना घेऊन थेट कंदाहारला गेले. पण ह्या ऐवजी जर विना विलंब कारवाई केली असती तर त्या व त्या नंतर झालेल्या अनेक घटनांची भारताला किमत मोजावी लागली नसती. अनेक कर दात्यांचा पैसा कसाब ला पोसण्याऐवजी भारतीय प्रगतीसाठी, सीमेवर लढणार्यांसाठी वापरता आला असता. पण राजकारण्यांना दिसत होती फक्त vote बँक. 



"नवी विटी नवे राज 
राजकारण्यांचा आहे जुनाच बाज 
अजूनही एकमेकांना संपविण्याची भाषा 
निवडणुकांचा खेळ खेळण्याची आशा 
याद केली कुर्बानी संसदेच्या हल्ल्याची फक्त १५ खासदारांनी
अफजल गुरुचिया फाशी मात्र लाबविली सगळ्यांनी 
हवशे - नवशे- गवशे करतात श्रद्धांजलीचे समारंभ
दहशतवाद विरोधी लढाईला अजूनही होत नाही आरंभ"



दहशतवाद आज सर्वच क्षेत्रात वादाह्त असलं तरी त्याचा उगम कसं होतो किंवा झाला हे शोधणे गरजेचे आहे. त्याशिवाय तो समूळ नसता करणे शक्य नाही. हाय दहशतवादाच्या उगमाची प्रामुख्याने ४ करणे आहेत. 
  1. ऐतिहासिक करणे - जी काश्मीर किंवा palestine सारख्या भागात इतिहासातून निर्माण होतात. 
  2. आर्थिक कारणे -   ब्रिटीशांच्या राजवटीपासून जमीनदारी हा प्रकार जोरात फोफावला, त्यातून स्थानिक जनतेच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढले त्यामुळे स्थानिक जनतेतून नक्षलवादासारखे दहशतवादी प्रकार वाढले उदा. महराष्ट्रातील गडचिरोली
  3. सामाजिक कारणे   - बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सवर्ण विरुद्ध दलित अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पण दहशतवाद वाढीस लागतो.
  4. धार्मिक कारणे - जगात विविध धर्म असले तरी एखादा धर्म स्वताला उच्च समजतो किंवा तसे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो या प्रचारासाठी हिंसेचा वापर केला जातो किंवा एखाद्या धर्मावर अन्याय केल्यास त्यातून हा दहशतवाद जन्माला येतो. उदा. जिहाद. 

जिहाद च्या नावाखाली आज संपूर्ण जग दहशतवादाच्या काळ्या छायेखाली आहे. पण जिहाद म्हणजे नक्की काय ? " जिहाद" हा एका अरेबिक शब्द "जाहादा" वरुन घेण्यात आला आहे. जॉन एस्पोसितो ह्यांनी जिहाद वर बोलताना म्हटले आहे कि "Jihad requires Muslims to "struggle in the way of God" or "to struggle to improve one's self and/or society." Jihad is directed against Satan's inducements, aspects of one's own self, or against a visible enemy.The four major categories of jihad that are recognized are Jihad against one's own self (Jihad al-Nafs), Jihad of the tongue (Jihad al-lisan), Jihad of the hand (Jihad al-yad), and Jihad of the sword (Jihad as-sayf).Islamic jurisprudence focuses on regulating the conditions and practice of Jihad as-sayf, the only form of warfare permissible under Islamic law, and thus the term Jihad is usually used in fiqh manuals in reference to military combat."   हझरत मिर्झा  ताहीर  अहमद ह्यांनी आपले पुस्तक " Murder in the Name of Allah" मध्ये लिह्हून ठेवले आहे कि "As far as Islam is concerned, it categorically rejects and condemns every form of terrorism. It does not provide any cover or justification for any act of violence, be it committed by an individual, a group or a government..... I most strongly condemn all acts and forms of terrorism because it is my deeply rooted belief that not only Islam but also no true religion, whatever its name, can sanction violence and bloodshed of innocent men, women and children in the name of God."  पण प्रत्यक्षात जिहाद च्या नावाखाली विकृतपणा चालवला  जातोय.



आत्ता पर्यंतच्या हल्ल्याची यादी बघितली तर 

१२ मार्च १९९३ - मुंबई बॉम्ब ब्लास्ट 
१४ फेब १९९८ - Coimbatore
१९९९  - कारगिल हल्ला
१३ डिसेंबर २००१ -  भारतीय संसद
१० oct २००१ - J & K  
२५ sept २००२ - अक्षरधाम मंदिरावरील हल्ला
६ डिसेंबर २००२ -  मुंबई 
२७ jan २००३ - मुंबई 
१४ मार्च २००३ - मुंबई 
२८ जुलै २००३ - मुंबई 
२५ ऑगस्ट २००३ - मुंबई 
१४ मे २००३ - J & K 
१५ ऑगस्ट २००४ - आसाम 
२९ ऑक्टोबर २००५ - दिल्ली 
१८ september २००५ - आसाम & मणिपूर 
२० september २००५ - मणिपूर 
२८  डिसेंबर २००५ - कर्नाटक 
११ जुलै २००६ - मुंबई 
७ मार्च २००६ - वाराणसी 
८ september २००६ - मालेगाव 
२५ ऑगस्ट २००७ - आंध्र प्रदेश 
१८ मे २००७ - आंध्र प्रदेश 
२६ नोव्हेंबर २००८ - मुंबई 
२५ जुलै २००८ कर्नाटक
१३ feb २०१० - पुणे 




आज जगात सर्वच देशावर अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत वरील सर्व घटनांचा जर गांभीर्याने विचार केला तर त्यांची काही ठराविक तंत्रे दिसून येतील. 
  1. अपहरण - एखाद्या किंवा अनेक व्यक्तींचे अपहरण , जहाजाचे किंवा विमानाचे अपहरण करून शासन किंवा संबधित गटाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या जातात. ९० च्या दशकात तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सैद यांच्या कन्येला ओलीस ठेवून ५ अतिरेक्यांची सुटका करून घेतली होती.
  2. बॉम्ब ब्लास्ट - दूरवर थांबून नियंत्रणाद्वारे अथवा वेळेनुसार फुटणारे बॉम्ब यांची योजना करून दहशत पसरवली जाते. ११ जुलै २००६ अंधेरी rly स्टेशन 
  3. स्वैर गोळीबार - बाजारपेठ , मंदिरे, हॉटेल्स ई. ठिकाणी स्वैर गोळीबार करून दहशत पसरवणे. 
  4. जातीय व धार्मिक दंगल - धर्माच्या नावावर लोकांना चिथावून दंगल घडवणे.
आज २६/११ ला २ वर्षे पूर्ण होतात. तो अजमल कसाब अजूनही जिवंत आहे. आमचे मंत्री जाऊन त्याची चौकशी करतात "कोई तकलीफ तो नाही है |" कवी इक्बाल यांनी म्हटले आहे कि " सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा" त्यावर मला बोलावसं वाटत कि; 


"सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा
इथे प्रत्येकजण भांडतोय 
ये हमारा, वो तुम्हारा
पाण्यात  बुडून स्फोटात उडून 
माणूस भयाने खंगतो
T .V . च्या channels वर "सबसे तेज" TRP चा खेळ रंगतो."


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐




Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!