Posts

Showing posts from August, 2014

मोदक

“अग प्रतिभा, इकडे बघ अशा पाकळ्या आल्या पाहिजेत मोदकाला.” सासूने आपल्या नवीन लग्न होऊन आलेल्या आणि मोदक न येणाऱ्या सुनेला फार पेशन्सली सांगितले “एक काम कर तू हा पिठाचा गोळा घे आणि माझ्यासारखा मोदक तयार करायचा प्रयत्न करत रहा.”  “हो आई!” सुनेने खालमानेने उत्तर दिले.  सुनेला त्या मोदकाच्या पाकळ्या जमेपर्यंत सासूचे २१ मोदक झालेले असतात. “आई, तुमचे मोदक झाले आणि मला एक पण बनवता आला नाही.” हिरमु सल्या आवाजात सुनेने वाक्य म्हटले  “अग असुदे, पुढच्या संकष्टीला प्रयत्न कर, काय फरक पडतो.” सासूने तितक्याच स्पोर्टिंग स्पिरीट मध्ये कोणताही टोमणा न देता तिला समजावले. अशाच तीन चार संकष्ट्या गेल्यावर “आई बघा जमला मोदक” सुनेने असेच म्हणताच, “आरे वाह! जमला ग, आता दुसरा कर” सासूने आनंदाने सांगितले.  “प्रतिभा, मोड तो मोदक, एक जमला पण...” सासूचे वाक्य अर्धवट तोडतच सुनेने विचारले “पण काय आई?” सासूने हसतच उत्तर दिले “अग, हा मोदक बघ आणि आत्ता तू बनवलेला मोदक बघ, एक लहान एक मोठा कसे चालेल, सगळे मोदक एक सारखे दिसले पाहिजे. आणि तो मोदक फोड आणि सारण कढाईत टाक आणि ते पीठ मात्र बाजूला ठेव ते मिक्स करू नकोस.” सासू