Posts

Showing posts from July, 2014

"मेरे बारेमें इतना मत सोचो, दिल मे आता हुं, समज मे नही| "

"मेरे बारेमें इतना मत सोचो, दिल मे आता हुं, समज मे नही| " आज सलमान खान चा 'किक' हा नवीन चित्रपट बघितला कथानक ठीकठाक असले तरी उत्तम सादरीकरण आणि सिनेमॅटोग्राफी असल्याने चित्रपट बघण्यालायक झालेला आहे.  कोणत्याही गोष्टीत "किक" असल्याशिवाय काम करायचे नाही अशा Devi Lal Singh (सलमान खान) ला शेवटी "किक" लहान मुलांच्या उपचारांसाठी Devil बनून चोरी करत असतो आणि रणदीप( इन्स्पेक्टर ) शेवट पर्यंत त्याच्या माग ावर असतो सलमान खान चोर आहे हे कळूनही काही करता येत नाही ........... शेवट तर अनएक्स्पेक्टेड आहे......... रणदीप आणि Jacqueline यांचे काम उत्तम, सलमान @ his best मला तरी चित्रपट अतिशय उत्तम वाटला आहे. त्यात राजे नी चित्रपट बघायला येण्यासाठी नकार दिल्याने  Vinita  aani  Amey  यांच्या सोबत चित्रपट बघितला ( Raj  न आल्याबद्दल धन्यवाद!) आम्हा तिघांना चित्रपट enjoy करता आला . आज विनिता सोबत गेल्याने मित्र मैत्रिणीसोबत बघितलेले चित्रपट आठवले सलमान च्या प्रत्येक entry ला शिट्या action सीन ला आवाज, टाळ्या बिनधास्त करत होतो. एकूण चित्रपट आणि आजचा दिवस एकदम ग्रेट ~

पिनकोड ..............

मी: Hello, नमस्कार मी पुस्तकजत्रा मधून बोलते. आपण... पलीकडून ग्राहक : हा बोला (माझे वाक्य अर्ध्यात तोडत) मी: आपण पुस्तकजत्रावर फलाना पुस्तकाची ऑर्डर दिली होती, तर तुमचा पत्ता कन्फर्म करायचा होता  ग्राहक: पत्ता तिकडे दिलेला आहे.... मी: आहो तोच कन्फर्म करायचा आहे. (मी पत्ता वाचून दाखवला) ग्राहक : बरोबर आहे!  मी: तुमचा पिनकोड सांगता का ? ग्राहक: पिनकोड? मी: हो कारण पिनकोड च्या जागी तुम्ही "१२३४५" असे लिहिले आहे. ग्राहक: तुम्ही तिथे "पिनकोड" लिहायच्या ऐवजी "पोस्टकोड" लिहिले होते मला कसे कळणार, तेथे "पिनकोड" लिहायचा आहे मी: Sorry, पिनकोड देताय न? ग्राहक: घ्या लिहून ४१ (बाजुच्याला आवाज देत) अरे आपला पिनकोड काय आहे. मी: इट्स ओके, मी नेट वरून घेते. Thank u ग्राहक : आधीच नेट वरून घायचा ना! ( फोन कट करताना पलीकडून कानी पडलेला आवाज) तेव्हा Mr.  Raj  Jain आता तरी तो "पोस्टकोड" शब्द बदलून "पिनकोड" करा हो कृपया!! ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐  ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ९

  बऱ्याच महिन्याने पुन्हा एकदा भारतच्या इतिहासातील एक हिरा समोर आणत आहे. त्या म्हणजे जैतपूरची राणी, आपल्या इतिहासात त्यांचे नाव पण नोंदवलेले नाही. त्या म्हणजे   बुंदेलखंड प्रांतातील जैतपूरचे राजा परीक्षित यांच्या पत्नी म्हणजेच जैतपूरची महाराणी जिला “जैतपूरची राणी” म्हणूनच ओळखल जातं. १८४९ सालापासून चालू असलेल्या शीत युद्धाला राणीने मूर्त स्वरूप देऊन ब्रिटीशांची पळता भुई थोडी केली. पुर्वतिहास बुंदेलखंड प्रांतातील जैतपूर हे छोटेसे संस्थान राजा परीक्षित यांच्या नेतृत्वाखाली राज्य करत होते. जैतपूर संस्थान म्हणजे बुंदेलखंड राज्याचे राजे छत्रसाल यांच्या मृत्युनंतर बुंदेलखंड राज्यातून फुटून निर्माण झालेल्या ५ छोट्या राज्यांपैकी एक होते. आणि लॉर्ड डलहौजी च्या हडपनिती अंतर्गत  ब्रिटीशांनी आपली मैत्रीची भूमिका मांडली पण राजा परीक्षित हे स्वतंत्रता प्रेमी होते व त्यांना हि मैत्रीपूर्ण नजरकैद मंजूर नव्हती पण ते कंपनीच्या तुलनेत राजेसाहेबाकडे कमी सैन्य होते याचाच फायदा लॉर्ड एलनबरो   यांनी घेतला आणि २७ नोव्हेंबर १८४९ मध्ये संस्थानावर ताबा मिळविला व राजा परीक्षित यांना पळवून लावले आणि आपल्या