Posts

Showing posts from 2013

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

Image
पुस्तक:  चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद लेखक:  मारुती चित्तमपल्ली प्रकाशक:  मौज प्रकाशन गृह  परवाच अमेयदाना काही पुस्तके पाठवली त्यात मारुती चित्तमपल्ली चकवाचांदण हि होते, पुस्तके मिळताच त्यांनी चकवाचांदण बरेच दिवस शोधात होतो आता मिळाले अशा आशयाची पोस्ट फेसबुक वर टाकली त्यावेळी सर्वांचे लाडके मामाश्री व अमेयदा यांच्याशी झालेल्या बोलण्यामुळे वाटून गेले कि आपण चकवाचांदण वर लिहावे खरे तर मी खूप आधी हे पुस्तक वाचले होते, त्यावर लिहूनही ठेवले होते पण ते प्रकाशित केले नव्हते J आज अमेयदामुळे ती जुनी वही काढून लिहिते आहे...... पुस्तक वाचन म्हणजे एक व्यसनच असत.   त्याच व्यसनामुळे आजपर्यंत बरीच पुस्तके वाचनात आली, त्यातली काही मनाला भावली, काहींनी तर मनात घरच करून ठेवले, अशाच काही पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणजे “चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद”. हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा वाटले होते कि त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे वन्यजीवनावर आधारित असेल पण वाचताना हळू हळू लक्षात येऊ लागले कि   हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली याचं आत्मकथन आहे. ह्या पुस्तकात पहिल्या १२३ पानापर्

गोविंदा

Image
आज घराची फार आठवण झाली, घराशेजारी गणपतीचे मंदिर आहे माझ्या बेडरूम ची खिडकी उघडली कि देवळाचा कळस दिसायचा.  गणेश जन्मापासून ते एकादशी पर्यंत सगळे उत्सव साजरे होतात, जन्माष्टमी म्हटली कि रात्री १० नंतर देवळात कीर्तनाला सुरुवात व्हायची ( जन्म रात्री १२चा असल्याने सगळे आवरून कीर्तनाला सुरुवात करायचे) नेहमीची श्रीकृष्ण जन्मकथा अगदी रंगवून सांगितली जायची दरवर्षी नवीन कीर्तनकार असायचे प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत वेगळी असायची, रात्री कीर्तन म्हटल्यावर वैताग यायचा कारण हे १ वाजेपर्यंत कीर्तन करणार मग झोपेचे खोबरे दुसर्या दिवशी श्रीकृष्णाची पालखी आणि संध्याकाळी band च्या गजरात दही हंडी फोडली जायची. त्यावेळी त्या कीर्तनाचा त्रास व्हायचा, काय हे रात्री कीर्तन करत बसतात शांतपणे साजरा नाही का करू शकत ;पण आज हे जाणवते आहे कि देवळातले कीर्तन किती शांत आणि संस्कार घडवणारे होते,  कीर्तनातून सांगितली जाणारी श्रीकृष्ण जन्मकथा प्रत्येकवेळी काहीतरी नवीन विचार शिकवणारी होती. आणि आज शिकणे सोडून द्या; ह्या दणदणाटा पुढे साधा विचार हि करता येत नाही, कसलीतरी फालतू गाणी आणि गोंगाट हेच स्वरूप झाले आहे... त

PMPL - एक अनुभव

आज मुंबईला जायचे म्हणून सकाळी नऱ्हेगाव ते स्वारगेट एसटी पकडली जाता जाता सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेऊ म्हणून उतरले तर लक्षात आले कि बस मध्ये पर्स पडली   ( जन्माने वेंधळी असल्यामुळे असे छोटे - छोटे पराक्रम मी करत असते ) आता ती बस गाठणे आले, बस स्वारगेट बस stop पाशी वळसा घालून येणार तो पर्यंत पर्स हरवली तर म्हणून मी धाव ठोकली आणि सरळ रस्त्याने बस च्या आधीच तिकडे जाऊन पोहो चली ( असे मला वाटले ) पण वळसा घालून पण बस आधी पोहोचली होती. मी आपली तिथे उपस्थित असलेल्या कंडक्टर काकांना माझी व्यथा सांगितली त्यांनी ती बस मला दाखवली " आताच बस आली आहे" इति कंडक्टर काका. मी पळत ती बस गाठली तर माझी पर्स सिट खाली आरामात विसावली होती मी ती उचलली व समस्त कंडक्टर/ driver काकांचे आभार मानले (इथे माझ्यापेक्षा माझी पर्स मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होता.) पर्स मधील काही हरवले नव्हते.  मी पर्स मिळाली त्या आनंदात सारस बाग गणपतीचे दर्शन घेतले व प्रसाद मात्र समस्त कंडक्टर/ driver काकांना वाटून टाकला तेव्हा त्यातले एक काका म्हणाले " आपल्या बसेस लय भारी आहेत, कुठे काय पडलेले असेल ते दिस

सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ 8

मागील भाग २०१० जुलै मध्ये " सन १८५७ च्या वीर महिला" हि मालिका लिहायला सुरुवात केली आजही ती अपूर्ण आहे. आज त्यात एका नावाची भर पडली आहे ते नाव म्हणजे "राणी द्रोपदी बाई"!! राणी द्रौपदी म्हटले कि आपल्याला महाभारत आठवते पण हा लेख वाचाल्यावर तुम्हा महाभारता बरोबर १८५७ चे स्वातंत्र्यसमर हि आठवेल. २२ मे १८५७ ते ३० ऑक्टोबर १८५७ ह्या ५ ते ६ महिन्याच्या काळात ह्या राणीने ब्रिटिशानां घाम फोडला होता!!! धारच पुर्वैतिहास धार हे १८५७ च्या युद्धातले एक महत्वपूर्ण ठाणे होतं. २२ जुलै १७३२ रोजी थोरल्या बाजीराव पेशव्याने आनंदराव पवाराला धार आणि आसपासच्या परगण्यांचा हक्क दिला. त्यातून संस्थानाचा उगम झाला. मराठ्यात महत्वाच्या ठरलेल्या शिंदे- होळकर- पवार ह्या त्रयी पैकी हे पवारांच घराणे. स. १८१७ त इंग्रज जेव्हां पेंढाऱ्याच्या उच्छेदाकरितां माळव्यांत शिरले तेव्हां पवारांच्या ताब्यांत केवळ धार शहरच होतें पुढें इंग्रजांचा व धारकर यांचा तह होऊन इंग्रजांनीं राज्याचें रक्षण करण्याचें काम पत्करून ३५ हजार वसुलाचा मुलुखहि मिळवून दिला. त्यानंतर १८१९ मध्ये भिल्ल पलटणी ठेवायची इच्छ