सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ७


मागील भाग
 
सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी ------ ७

१८५७ चा स्वातंत्र्यसंग्रामाला प्रकाशित करणारी आणखी एक ज्योत म्हणजे तुलासीपूरची राणी ईश्वरी कुमारी देवी. तुलसीपूरहे अवध या प्रांताच्या शेजारी व नेपाळ च्या सीमेवरील एक राज्य होते. आज तुलसीपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील एक तालुका असून या तुलसीपूर तालुक्याची उत्तर सीमा नेपाळ शासित प्रदेश आहे व दक्षिण बाजू भारत शासित प्रदेश आहे. नेपाळ शासना अंतर्गत येणार्या या प्रदेशाला “तुलासीपूर/ डांग” म्हणून ओळखले जाते व भारत शासित प्रदेशाला “तुलसीपूर परगणा” म्हणून ओळखले जाते. १८५७ च्या काळात हे हिंदुस्थानात समाविष्ठ होते
राणी ईश्वरी कुमारी देवी यांचा पूर्ववृत्तांत
तुलसीपूरराज्याचा ४४ वा राजा दृग नारायण सिंह ह्याना ही इतर राजांप्रमाणे ब्रिटिशांच्या कडून खलिता गेला की त्यांच्या राज्यात सामील व्हा. त्यावेळी राजा दृग नारायण सिंग यांनी विरोध दर्शविला. इस्ट इंडिया कंपनीचे मांडलिकत्व स्वीकारायला दिलेला नकार व वेळोवेळी क्रांतीकार्याना केलीली मदत याच्या विरोधात ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर कारवाही करून त्यांना व त्यांचे वडील लखनऊ येथे नजर कैदेत टाकले. त्याच काळात त्याची पत्नी राणी ईश्वरी कुमारी देवी ही ह्या अत्याचाराविरुद्ध पेटून उठली. लगेचच तिने बहराइच येथील क्रांतिकारकांशी संपर्क साधून महाराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू केले प्रथम आपल्या पतीला व सासर्यांना नजरकैदेतून बाहेर काढू व मग आपण महाराजांच्या साथीने क्रांती घडवून ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलून लावावे हा उद्देश होता.
संग्रामाच्या अग्निकुंडात उडी
राणी ईश्वरी कुमारी देवी या राजा दृग नारायण सिंह व त्यांचे वडील महाराजा दृग राज सिंह यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असतानाच त्या नजरकैदेत महाराजा दृग राज सिंह यांचा १८५५ साली मृत्यू झाला. राजा राजा दृग नारायण सिंह हे ही नजर कैदेत असल्याने प्रथेप्रमाणे तुलासिपुरच्या गादीवर त्यांचे अल्पवयीन सुपुत्र तीर्थराम सिंह आले. तीर्थराम सिंह अल्पवयीन असल्याने राणी ईश्वरी कुमारी देवी यांनी तुलसीपुराचा कारभार बघण्यास सुरवात केली. तुलसीपूर राज्याला वारस होता महाराजा दृग नारायण सिंह यांनी कोणतेही दत्तक विधान केले नव्हते तरीही फक्त क्रांतीकारकांना दिलेली साथ व ईस्ट इंडिया कंपनीला केलेला विरोध ह्या कारणास्तव राणी ईश्वरी कुमारी देवी यांना एक खलिता गेले की आमचे मंडलिक बना, मांडलिक झाल्यास पेन्शन देण्यात येईल अन्यथा राज्य खालसा केले जाईल.
राणी ईश्वरी कुमारी देवी ने हा खलिता धुडकावून लावला व ती ब्रिटिशांच्या विरोधात सज्ज झाली. तिने बेगम हजरत महलशी संपर्क साधून लढ्याची सुरवात केली. राणी कंपनी सरकारचे ऐकत नाही पाहून तुलसीपूर वर हल्ला करून ते खालसा करण्याचे प्रयत्न सुरु केले. बेगम हजरत महलप्रमाणे राणी ईश्वरी कुमारी देवी यांनी ही जवळच्या स्त्रियांना युद्धाचे प्रशिक्षण दिले. तसेच आपल्या राज्यातील लोकांची मते युद्धाला अनुकूल करून घेतली.
राणी ईश्वरी कुमारी देवी आपल्या अस्तित्वासाठी लढत राहिल्या. आपले सुपुत्र तीर्थराम सिंह यांना सुरक्षिततेकरीता बनारसला पाठवले. व स्वत: हाती तलवार घेऊन आपल्या सैन्यसह मैदानात उतरली. परंतु १५ वर्षिय तिर्थराम सिंह बनारसहून परत आले व आपल्या एकाकी झुंज देणार्या आई बरोबर तलवार घेऊन मैदानात उतरले. एकीकडे बेगम हझरत महल बरोबर संपर्क ठेवून योजना बनवणे व ब्रिटिशांना जेरीस आणणे असे उद्योग चालू होते. परतू दर वेळी ताजा दमाची फौज आणणे राणीला शक्य नव्हते. पण ती हिम्मत हरली नाही. ती एकाकी लढत राहिली. ब्रिटीशांची प्रत्येक वेळी येणारी ताज्या दमाची फौज, होणारी फितुरी ह्या पुढे राणीला आपला विजय अशक्य वाटू लागला होता अशा परिस्थितही तिने केवळ आत्मविश्वासाच्या बळावर २ वर्षे तुलसीपूर झुंझत ठेवले होते. ज्या बेगम हजरत महलला आपला आदर्श मानून राणी लढत होती तिचा पाडाव झाला तरी राणी लढत होती. पण बेगमची मिळणारी मदत बंद झाली. डिसेंबर १८५८ च्या काळात नेमका मेजर बैरव तुलसीपूरवर ५०००ची फौज घेऊन चालून आला होता. ह्या ताज्या दमाच्या फौजेपुढे आपले काही चालणार नाही. हे जाणून राणी ने रात्रीत तुलसीपूरचा किल्ला सोडला. इकडे ब्रिटिशांनी किल्ल्यावर ताबा मिळविला, परंतु राणी हातातून निसटली होती.
आणखी एक वादळ शमले
आपल्या जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर ब्रिटिशांना टक्कर देणारी राणी अखेर नेपाळ हद्दीत निर्वासित झाली जाताना मात्र तिने तीर्थराम सिंह याला बनारस येथेच ठेवले. नेपाळ मधून ती क्रांतीकारकांना जमेल तशी मदत ब्रिटीशांच्या विरोधात करू लागली. नेपाळ सरकाने ब्रिटिशांना आपल्या हद्दीत शिरलेल्या भारतीय क्रांतिकारकांचा पाठलाग करण्याची परवानगी दिली असल्याने राणी ईश्वरी कुमारी देवी ब्रिटिशांना चकवण्यासाठी नेपाळच्या जंगलात फिरत होती अखेर १८६५ साली तिचा मृत्यू झाला.नेही ब्रिटीशांच्या ताब्यात जाण्यापेक्षा निर्वासित होऊन मरण पत्करले. राणी नेपाळच्या जंगलात फिरत असतानाच राजा दृग नारायण सिंह १८५९ ला नजरकैदेत मृत्यु झाला.तित्या नंतर दोन वर्षाने १८६७ तिर्थराम सिंह यांचा ब्रिटिशांना टक्कर देताना मृत्यु झाला.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

Comments

Popular posts from this blog

चकवा-चांदणं..... एक वनोपनिषद

पर्यावरण संवर्धन...................

नमन नटवरा!!!!!!!!!!!