Posts

Showing posts from August, 2012

अमू...........

Image
चित्रपटाचे नाव : अमू वर्ष : 7 January 2005 संगीतकार : नंदलाल नायक  दिग्दर्शक: शोनाली बोस कथाकार / लेखक: शोनाली बोस कलाकार: कोंकणा सेनशर्मा, वृंदा करट , अंकुर खन्ना   रक्षाबंधनाच्या वेळी घरी असताना डिश टीव्ही बंद असल्याने असल्याने सीडीज किंवा डीव्हीडीज लावून चित्रपट पाहणे हा उद्योग चालू असे. अशातच अमू हा चित्रपट पाहिला आणि सुन्न झाले. अवघ्या १ तास ४२ मिनिटात हा चित्रपट संपतो पण आपला ठसा मागे ठेवूनच, आणि याचे श्रेय जाते ते चित्रपटाची दिग्दर्शिका शोनाली बोस हिला. राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी जातीवरून, धर्मावरून लोकांना चिथवतात, आपल्या हातातील माणसाकडून हत्या घडवून आणतात आणि माथी भडकावली जातात. मग माणूस बेभान होऊन आपल्याच माणसाचि कत्तल करत फिरतो; आपल्या देशावर तर हे संकट अनेकदा कोसळले आहे. “अमू” चे कथानक यावरच आहे, पण “अमू” ह्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतो. जाती व धर्माच्या नावाखाली जेव्हा दंगली तेव्हा हजारो निरपराध लोक ठार होतात, लाखोंचे संसार उद्ध्वस्त होतात आपण ह्या घटना बातम्या म्हणून पहातो, ऐकतो, वाचतो आपल्या जिवंतपणाचे द्योतक म्हणून क्षणभर तीव्र दुख: व संताप व्यक्त करत तावात