Posts

Showing posts from July, 2011

माझा गुरु

             आयुष्यातला प्रत्येक क्षण काही ना काही शिकवत असतोच जीवनात अनेक गुरु येतात, प्रत्येकाची शिकविण्याची पध्दत वेगळी असते पण आयुष्यभर संस्कारांवर मोहोर उमटवते ती पहिल्या गुरुची शिकवणी!!! हि पोस्ट माझ्या पहिल्या गुरूसाठी आज ज्यांच्यामुळे मी आज लिहायाला शिकली (म्हणजे मी काही मोठी लेखिका नाही पण जे काही लिहिते ते.... असो ) लोक म्हणतात कि पहिली गुरु म्हणजे आई असते पण मी गर्वाने सांगते माझे पहिले गुरु म्हणजे माझे दादा (वडील). ( माझी आई हि पण माझी उत्तम मार्गदर्शक आहे पण... पहिल्या गुरूचा मन दादानांच)                   माझं वक्तृत्व आणि माझं लेखन ज्यांनी घडवले ते दादा घडवलेच म्हणावे लागेल (मी घरात शेंडेफळ त्यामुळे फार आळशी आणि झोपेचा छंद तेव्हापासून जडलेला आजही कायम आहे.... असो.) आमच्या गुरूंना म्हणजेच दादांना वक्तृत्वाची देणगी आजोबामुळे लाभलेली पण त्यामुळे त्यांचे वाचन खूप आणि अभ्यासही, लहानपणी खूप बक्षिसे मिळविली होती त्यांनी. आमचे थोरले बंधू आजी – आजोबांकडे मुंबईला शिकण्यास होते, आणि मी आई – दादांसोबत गावाकडे त्यामुळे वक्तृत्वाचे प्रयोग आमच्यावर झाले.                    पण त्या प्

मोरपीस

                 नातं म्हणजे मनाच्या पुस्तकात जपलेलं मोरपीसच असतं ना! आपलं मन किती हळवं असत?? काही वेळा आपलंच मन आपलं राहत नाही आणि त्याची समजूत घालणे फार कठीण होऊन बसता.... तेव्हा त्याला समजून घेणाऱ्या.. त्याचा आधार बनणाऱ्या..त्याला प्रेरणा आणि बळ देणाऱ्या विश्वात ते रमत तिथे असतं एक नातं... भावनिक बंधांची गुंफण असणारं.. आपल्या भावनांना जपणारं.. मायेची उब देणार, जाणीवांना समजून आधार देणार अशा नात्याची जवळीक फार थोड्या लोकांना लाभते. मनातल्या भावना अन् नात्याचे नवीन अंकुर त्यांचा गुंता कसाही असला तरी हवाहवासा वाटतोच ना!! एका मित्राने चॅट स्टेटस लावून ठेवलं होतं “एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली – जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे.” किती खर आहे हे वाक्य!!               कारण कधी कधी एखादी व्यक्ती खूप जवळची, आपलीच वाटू लागते. तिचे विचार म्हणजे आपल्याच हृदयातील भावनांचे प्रतिबिंब वाटू लागते. ती व्यक्ती म्हणजे सर्वस्व. अशा वेळी तिथे जन्म घेतं ते एक नाजूक नातं. या नात्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त महत्व अस