Posts

Showing posts from June, 2011

नमन नटवरा!!!!!!!!!!!

Image
                ‘बालगंधर्व’ ही पाचच अक्षरे आहेत पण महाराष्ट्राचे अवघे पंचप्राण या पाच अक्षरांत सामावलेले आहेत, असे आचार्य अत्रे म्हणायचे. शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कलेची जाण असणा-या मातीमध्ये बालगंधर्व नावाचे रोपटे तरारले आणि नंतरची ५०-६० वर्षे हा गायनाचा, अभिनयाचा कल्पवृक्ष सतत बहरत राहिला. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण बालगंधर्व या नावाची जादू काही ओसरली नाही. संगीत नाटकाचा सुनहरा जमाना संपला तरीही महाराष्ट्राने बालगंधर्वांना दूर लोटले नाही. पल्लेदार नाट्यगीते गाणारा हा आवाज पुढे भक्तिगीते आणि अभंग गाऊ लागला. वृद्धत्व आले, अपंगत्व आले तरीही महाराष्ट्र्राचे या व्यक्तिमत्त्वावरचे प्रेम काही कमी झाले नाही. बालगंधर्वांनीहि महाराष्ट्राला भरभरून दिले.                 लोकमान्य टिळकांचा तो सुवर्णकाळ होता. त्यांनीच नारायण राजहंस या सुरिल्या गळ्याच्या मुलाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली. लोकमान्य टिळक यांनी गायकवाड वाड्यातील गणेशोत्सवामध्ये छोट्या नारायण राजहंसाचे गाणे ऐकले. खरे तर हे गायन चालू असताना लोकमान्य ‘केसरी’ च्या अग्रलेखाचे लेखन करीत होते. पण नारायणाच्या आवाजाची, आलापाची जादू अशी

कहानी चंद्रकांता कि !!!!

Image
आज सकाळी TV वर चॅनेल सर्फ करत असताना अचानक सहारा वन वर कार्यक्रम बघितला  कहानी चंद्रकांता कि !!!! आणि मनात विचार आला आयला चंद्रकांता परत चालू झाली?? १९९४ ते १९९६ च्या दरम्यात दूरदर्शन वर चालणारी दर रविवारी लागणारी सिरीयल मी आणि माझा भाऊ न चुकता बघणारे. कालांतराने हि सिरीयल दूरदर्शन वरून बंद होऊन सोनी तव वर आली . आपण हि सहारा वन वर चालू झालेली हि नवीन चंद्रकांता डेली सोप सारखी कहानी पुढे नेलेली निघाली. आता मात्र हद्द झाली म्हणत मी आपला  चॅनेल बदलला. शेवटी काहीच नाही म्हणून गाणी ऐकत बसली. पण मन मात्र मागच्या आठवणींमध्ये अडकून बसला ह्या चंद्रकांता मधला सर्वात लक्षात राहिलेलं पात्र  म्हणजे अखिलेंद्र मिश्र यांनी साकारलेला  "क्रूर सिंग" आणि त्याची ती "याक्कू" म्हणण्याची पद्दत. ते आठवण आली आणि अचानक कंटाळेल्या चेहऱ्यावर हसू फुटलं. त्यानंतर लगेच आठवला तो भाऊ आणि त्याच्या उद्योगामुळे त्याला आम्ही क्रूर सिंग नाव ठेवला होता.  क्रूर सिंग त्याच्या दोन चेल्यांसह  झालं असा होता हि भावाच्या केसात झाला होता कोंडा आणि ह्या पट्ठ्याला वाचनाची फार आवड. त्याचमुळे  त्याच्या  वाचनात आल

चिकन बिर्याणी आणि उपोषण

माझ्या जन्माच्या आधी घडलेली घटना आहे. माझ्या दादांनी सांगितलेली हि उपोषण कथा आहे. खरे तर रामदेव बाबांचे उपोषण चिरडले त्यावेळी हा किस्सा त्यांनी सांगितला होता. पण कामाच्या व्यस्ततेमुळे लिहावयास जमले नाही. म्हणून आज पोस्ट टाकते आहे.  १९७० च्या आसपास उरणमधील एक पुढारी उपोषणास बसले, १,२,३, असे करत ४ था दिवस उजाडला नेहमी प्रमाणे डॉक्टर येऊन आले उपोषणकर्त्याचे ब्लडप्रेशर तसेच इतर चेकअप करण्यात आले सगळे नॉर्मल, एखाद्याला असते सवय म्हणून डॉक्टरांनी जास्त चर्चा न करता आपला रिपोर्ट वर पाठवला. ५ व्या दिवशी जिल्हाधिकारी पहाणी करण्यास आले असता त्यांनी कोणतीही चर्चा न करता, आश्वासन न देता सरळ त्यांच्या सगळ्या मागण्या तत्काळ मान्य केल्या. कारण जिल्हाधिकारी आले तेव्हा उपोषणकर्त्याची चौकशी करतानाच अचानक व्यासपीठाच्या खाली प्रचंड मोठे असे कुत्र्यांचे खेखाट झाले. ते बघण्यासाठी खाली वाकले असता चिकन च्या हाडांसाठी कुत्र्यांचे भांडण चालू होते त्यामुळे सगळे भांडे फुटले.  प्रत्यक्षात उपोषणकर्त्यावर नजर ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस शिपायाला पैसे देऊन पटवण्यात आले होते. दिवसभर पाणी हि न पिणारे हे रात्री मस्त

गच्च भरला पाऊस

Image
धूसर प्रकाश,  वाटा अंधारल्या  गच्च भरला पाऊस,  दिशा मोहरल्या  माझ्या बेडरूम च्या खिडकीतून ढगांनी गच्च भरलेल आकाश  घरच्या बाल्कनी मधून टिपलेले आभाळ  बेडरूम च्या खिडकीतून टिपलेला देवळाचा कळस  पावसात खेळायला आलेली अध्यांतरी  ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋• ▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐