Tuesday, April 26, 2011

वर्षपूर्ती


"क्षितिजा पलीकडे............" ह्या माझ्या ब्लॉग ला आज एक वर्ष  पूर्ण होतंय. सुरुवातीला मी आणि माझा क्षितिजा पलीकडचा जग एव्हढीच मर्यादा असणारा ब्लॉग आपल्या कक्षा रुंदावातोय. गेल्या वर्षाबाराच्या प्रवासावर नजर टाकली कि हसू येत. करणा ब्लॉग तयार केला तेव्हा कोणी फोल्लोव करत नाही म्हणून मी खूप उदास झाली होती मला हसवायचा म्हणून माझा मित्र मनीष हा माझा पहिला फोल्लोवेर झाला मला त्यावेळी झालेला आनंद आज हि मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण आज फोल्लोवेर च्या संख्येवर नजर टाकली कि कळत ३३ फोल्लोवेर्स पैकी १५ माझे फ्रेंड्स आहे बाकीच्या लोकांना मी ओळखत नाही पण मी त्यांची आभारी आहे त्यांनी ह्या ब्लॉग मध्ये इंटरेस्ट दाखवला.

ब्लॉग मुळेच buzz  ची ओळख झाली.  बरेच मित्र - मैत्रिणी भेटले. मोठ्या लेखकांचे लेखन वाचायला मिळाले  त्यामुळे लिखाणाचं कक्षा रुंदावल्या, कवितेशी वाकडं असलेली मी चक्क कविता करू लागली. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या ज्या मला ह्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करता येत नव्हत्या मग दृष्टीआडच्या सृष्टी वर नजर मारण्यासाठी "SpotlighT " नावाचा नवीन ब्लॉग तयार केला. अजूनही बराच काही करायचं आहे. हि वर्षपूर्ती म्हणजे celebration नाही तर "क्षितिजा पलीकडे............" च्या कक्षा रुंदावण्याचे आव्हान आहे. 

सर्व फोल्लोवेर्स, वाचक, मित्र - परिवार ह्यांचे मनपूर्वक आभार! तुमचं मुळे इथपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे, पुढे हि साथ द्याल हि अपेक्षा !!!

धन्यवाद !!
~निवेदिता पाटील  


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

8 comments:

 1. अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी !!

  ReplyDelete
 2. अभिनंदन निवी... क्षितिजाच्या कक्षा अशाच रुंदावत राहोत ही सदिच्छा..... :)

  ReplyDelete
 3. धन्यवाद सुहास आणि प्राची

  ReplyDelete
 4. अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा...! :)

  ReplyDelete
 5. तुमच्या ब्लॉग मध्ये कविता चांगल्या आहेतच त्याचप्रमाणे तुम्ही क्षितिजा पलीकडे....... मांडणी अतिशय सुरेख केली आहे
  तुमचे क्षितिजा पलीकडचे जग भविष्यात पूर्ण क्षितीज व्यापेल अशी आहे ........ अभिनंदन

  ReplyDelete
 6. छान सुरुवात आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेछा !

  ReplyDelete
 7. निवेदिता...हार्दिक अभिनंदन...पुढील लिखाणासाठी खुप शुभेच्छा :)

  ReplyDelete

क्षितिजा पलीकडे.... आता facebook वर