Posts

Showing posts from April, 2011

वर्षपूर्ती

"क्षितिजा पलीकडे............" ह्या माझ्या ब्लॉग ला आज एक वर्ष  पूर्ण होतंय. सुरुवातीला मी आणि माझा क्षितिजा पलीकडचा जग एव्हढीच मर्यादा असणारा ब्लॉग आपल्या कक्षा रुंदावातोय.  गेल्या वर्षाबाराच्या प्रवासावर नजर टाकली कि हसू येत. करणा ब्लॉग तयार केला तेव्हा कोणी फोल्लोव करत नाही म्हणून मी खूप उदास झाली होती मला हसवायचा म्हणून माझा मित्र मनीष हा माझा पहिला फोल्लोवेर झाला मला त्यावेळी झालेला आनंद आज हि मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण आज फोल्लोवेर च्या संख्येवर नजर टाकली कि कळत ३३ फोल्लोवेर्स पैकी १५ माझे फ्रेंड्स आहे बाकीच्या लोकांना मी ओळखत नाही पण मी त्यांची आभारी आहे त्यांनी ह्या ब्लॉग मध्ये इंटरेस्ट दाखवला. ब्लॉग मुळेच buzz  ची ओळख झाली.  बरेच मित्र - मैत्रिणी भेटले. मोठ्या लेखकांचे लेखन वाचायला मिळाले  त्यामुळे लिखाणाचं कक्षा रुंदावल्या, कवितेशी वाकडं असलेली मी चक्क कविता करू लागली. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या ज्या मला ह्या ब्लॉग मध्ये समाविष्ट करता येत नव्हत्या मग दृष्टीआडच्या सृष्टी वर नजर मारण्यासाठी "SpotlighT " नावाचा नवीन ब्लॉग तयार केला. अजूनही बराच काही

रॅगिंग.....................एक विकृती

रॅगिंग एक विकृती हा चित्रपट १८ मार्च २०११ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. कॉलेज मध्ये असताना कॉलेज मॅग्झीन मध्ये रॅगिंग वर लेख लिहिला होता. त्यासाठी रॅगिंग वर जवळून केलेला अभ्यास आणि त्याचे भीषण अनुभव, हे सगळे एका क्षणात डोळ्यासमोर तरळून गेले. म्हणूनच हा चित्रपट पाहण्याची फार उत्सुकता होती परंतु ह्या मार्च एंडिंग ने सगळ्या उत्साहावर पाणी ओतले. परंतु ह्या चित्रपटाचा रिव्यू वाचण्याचा योग आला, म्हणूनच कॉलेज मध्ये असताना लिहिलेला लेख येथे देत आहे, काळानुरूप बदल झालेत पण भीषणता अजूनही कायम आहे. गेल्या अनेक वर्षापासून विशेषतः गेल्या दशकात " रॅगिंग " हा शब्द आपल्या अनेकांच्या वाचनात आला असेल. प्रत्येक गोष्टीत प्रगत असणाऱ्या या महाराष्ट्रातसुद्धा विविध ठिकाणी कॉलेज मधून रॅगिंगचे अमानुष प्रकार आपण सर्वानीच वाचले आहे. तरीही त्यांच्या होणा-या मानसिक व शारीरिक छळाविरुद्ध काहीच करू शकत नाही; कारण "परदुख:तील" या नात्याने पेपर मधल्या बातम्या वाचून सारेचजण विसरून जातात. क्षणभर तीव्र दुख: व संताप काही व्यक्ती त्यांच्या जिवंतपणाचे द्योतक म्हणून करत असतीलही, परंतु ते सारे क