Posts

Showing posts from September, 2010

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - 3

Image
झाशीची शूर राणी लक्ष्मीबाई हिचे नाव प्रत्येक भारतीयांच्या जिव्हाग्रावर नाचत आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य- संग्रामातील तिच्या धडाडीने, पराक्रमाने प्रतिस्पर्धी इंग्रजी सेनापतीनाही  मुग्ध करून टाकले होते. झाशीच्या राणीच्या योग्यतेचे पाच -दहा सेनापती जर क्रांतीकारकांच्या पक्षात असते तर या युद्धात इंग्रजी सत्तेचा कायमचा विनाश झालेला दिसला असता.  झाशीच्या राणीचा पूर्ववृत्तांत  मराठेशाहीत झाशीचे शासक हे पुण्याच्या पेशव्यांच्या अंकित राहणारे जहागीरदार होते. त्यांना राजा हा किताब मिळाला होता. सन १८१७ साली झाशीचे राजे रामचंद्रराव यांच्या बरोबर इंग्रजांनी मित्रत्वाचा तहनामा केला. त्यात झाशीचे राज्य वंशपरंपरेने रामचंद्ररावांच्या  कुळातच ठेवले जाईल असे आश्वासन इंग्रज सरकार तर्फे देण्यात आले होते. रामचंद्रराव यांच्या पाश्च्यात त्याचे पुत्र गंगाधरराव हे गादीवर बसले. त्यांच्याशीच लक्ष्मीबाईचा विवाह झाला होता. शेवटच्या बाजीराव पेशव्याच्या बरोबरच लक्ष्मीबाईचे वडील   मोरोपंत तांबे हे हि ब्राम्हवार्तास येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांच्या या कन्येला, धोंडोपंत, रावसाहेब, तात्या टोपे आदी तिच्या समकालीन मंडळ

Rainbow

Image
Yesterday i saw rainbow from my office balcony after so many years so i click it........... ~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•