वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे
Friends "HAPPY FATHER'S DAY ". "वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे" हे title बघून थोडं आश्चर्य वाटले ना कि वडील आणि गोड गऱ्या सारखे? वडील तर किती खडूस असतात. ओरडतात , अभ्यास नाही केलं म्हणून मारतात पण अजिबात काळजी करत नाही. आई काशी चांगल - चांगलं खाऊ देते. प्रेमाने समजावते. आई म्हणजे ज्योत जी घराला प्रकाश देते; पण त्या ज्योतीला आधार देणाऱ्या समईला आपण सोयीस्कररित्या विसरतो. पण प्रत्यक्षात समईवरच जास्त ताण पडतो. हे आपण कधी लक्षातच घेत नाही. आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ आहे. पहिलटकरणीचे कौतुक होते; पण त्याच वेळी हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे फेऱ्या घालणारे वडील कोण बघतच नाही. आजारी पडल्यावर दिवसभर जवळ बसणारी आई दिसते पण ऑफिस मधून ४ वेळा phone करून तब्येत विचारणारे, 'जास्त बर नसेल तर डॉक्टर कडे घेऊन जा.' ' झोपला / झोपली का नीट त्रास होत नाही आहे ना ' म्हणून विचारणारे बाबा कधी आठवतच नाहीत. रात्री झोपेत आपल्याला थोडा जरी त्रास झाला तर पटकन उठून बघणारे आणि आईला सांगणारे कि