Tuesday, July 20, 2010

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - २

१८५७ चा भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा पहिला ब्रिटीश विरोधी संग्राम होता. आता त्या संग्रामाला १५३ वर्षे लोटली. १५ ऑगस्ट २०१० ला भारतीय स्वातंत्र्याला ६३ वर्षे पूर्ण होतील. 

या भारतीय स्वातंत्र्याला स्त्रियांनीच चेतना दिली होती. हा इतिहास सर्वश्रुत नाही. या युद्धात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रिया म्हणून झाशीची रणी लक्ष्मीबाई, अवधाची  बेगम हसरतमहल व दिल्लीच्या  सम्राट बहादूरशहाची बेगम झीनतमहल यांचीच नवे सामन्यात: ज्ञात आहेत. त्यांचे कर्तुत्व थोर आहेच, पण अशा आणखीही कितीतरी महिला भारताच्या सर्वच विभागात त्याकाळी चमकून गेल्या.

कानपूरची कलावंतीण अझीजन, तुळसापूर  व रामगड येथील राण्या, अहिरीची जमीनदारीण लक्ष्मीबाई, ग्वाल्हेरची बायजाबाई शिंदे, कोल्हापूरची ताईबाई, नागपूरची बाकाबाई भोसले, नरगुंद येथील राजमाता यमुनाबाई  आणि राजपत्नी सावित्रीबाई, मोतीबाई, मुंदर, सुंदर, झलकारी, काशी, ललिता बक्षी हि झाशीच्या वीरांगना खाणीतील नारीरात्ने आदी महिलांची नामावली लहान नाही. या सर्व महिलांनी स्वातंत्र्य संग्रामाचे मांगल्य पूर्णपणे ओळखले होते व म्हणूनच त्यात आपणहून उडी घेण्यात त्यांना कोणत्याही प्रकारची दिक्कत वाटली नाही. 

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील आणखी एक विशेष म्हणजे, गुजरात माळवा, मध्यप्रदेश, दक्षिणेतील अहमदनगर, नाशिक हे जिल्हे व हैद्राबाद राज्यातील काही प्रदेश आदी ठिकाणच्या भिल्ल, गोंड, कोळी, मारिया, माकानी, इत्यादी आदिवासी समाजाची इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेली उठावणी. परंतु त्याहीपेक्षा विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या कामात तथाकथित मागासलेल्या या समाजातील स्त्रियांनीही फार मोठा भाग घेतला. 

स्वत:च्या सैनिकांसाठी भोजन तयार करणे, शत्रू पक्षाकडील बातम्या काढणे, शत्रू पक्षाकडे खोट्या व भ्रामक बातम्या पसरविणे; तसेच कित्येक प्रसंगी हातात शस्त्र घेऊन इंग्रज फौजेशी मुकबला सुद्धा करणे आदी सर्व कामात या महिला प्रचंड संख्येने आणि शत्रूला दहशत बसावी इतक्या निकराने सामील झाल्या  होत्या. असीम स्वातंत्र्या निष्ठा आणि असीम राष्ट्रप्रेम यांचा संयुक्त अंत: प्रवाह समस्त भारतीय महिलांच्याहि मनोभूमीतून त्या काळी असा खळखळून वहात होता. 

१८५७ च्या संग्रमातला भारतीय महिलांचा इतिहास मोठा उज्ज्वल, उदात्त व स्फूर्तीदायक  आहे. तो उपलब्ध माहितीच्या आधारे माननीय हरिहर वामन देशपांडे यांनी " सन १८५७ च्या  वीर महिला" ह्या पुस्तकात १९५८ साली लिहून ठेवला आहे. हिंदू - मुसलमान - आदिवासी आदींनी या स्वातंत्र्य युद्धात एकत्रितपणे भाग घेऊन  भारताला पारतंत्र्यातून मुक्त केले. हा इतिहास आजच्या पिढीला माहित व्हावा हे उद्दीष्ट आहे. 


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Sunday, July 18, 2010

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागीणीं - १

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात राणी लक्ष्मीबाईसह अनेक रणरागीणींनी आपल्या प्राणाची बाजी लावली. अशा या  रणरागीणींचा इतिहास सांगणारी हि लेखमालिका मी ब्लोग वर प्रसिद्ध  करत आहे. 

१८५७ चे समर हे भारतीय स्वातंत्र्याचे युद्ध नव्हते तर ते केवळ शिपायांचे बंड होते असे मतलबी व स्वार्थी इंग्रज लेखकांनी लिहून ठेवले आणि भारत जोवर गुलाम होतं तोपर्यंत अनेक हिंदी लेखकांनीही त्यांचीच री ओढली हे सर्वाना ठावूक आहे. पण १९५७ साली या स्वातंत्र्य समराची शताब्दी साजरी करण्यात आली आणि पारतंत्र्याची शृंखला तोडणारा; आपले हिरावले गेलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी भारतीयांनी केलेला तो एक महान  स्वातंत्र्य- संग्राम होता यावर आपल्या शासनानेही शिक्कामोर्तब केले. 

या स्वातंत्र्य युद्धात स्त्रियांनी जे कर्तुत्व गाजविले त्याची खूप माहिती उपलब्ध झाली असली तरी त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, अवधची बेगम हसरतमहल आणि दिल्लीच्या समर्थ बहादूरशहाची बेगम झीनतमहल यांची नवे तर अग्रणी आहेत. पण ज्यांची नामावली इतिहासात प्रसिद्ध नाही अश्या कितीतरी स्त्रिया १८५७ च्या रणांगणावर प्रत्यक्ष उतरल्या होत्या. 

१८५७ चा संग्राम हा १० मे १८५७ रोजी मेरठ येथे सुरु झाला हे सर्वाना ज्ञात आहे, पण ह्या उठवमागाची प्रेरणा स्त्रियांची होती हे कितीजणांना माहित आहे ? दिनांक ६ मे रोजी नवीन चरबीची काडतुसे मेरठच्या ९० हिंदुस्थानी शिपायांना आली व ती त्वरित वापरण्याचा हुकुम झाला. त्यापैकी ८५ सैनिकांनी हा हुकुम मान्य करण्याचे नाकारले. तेव्हा त्यांचे "Court Marshal" (लष्करी खटला) होऊन त्यांना आठ - आठ, दहा - दहा वर्षाच्या कैदेची शिक्षा थोतावण्यात आल्या दि. ९ मे रोजी कवायतीच्या मैदानावर इतर सर्व शिपायांबरोबर या ८५ शिपायानाही हजार करण्यात आले. त्यांचा गणवेश काढून घेण्यात आलं आणि त्यांच्या हात - पायात बेड्या ठोकण्यात आल्या आणि मोठ्या बंदोबस्ताने त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या प्रकाराने इतर  हिंदी शिपायांचे रक्त उसळून आले. पण प्रत्यक्षात ते काहीच करू शकले नाही. आपलं संताप त्यांनी मनातल्या मनात गिळला. 

मे च्या ९ तारखेला हि घटना वस्तुत: लष्करात घडली. हि कादेकोतातील वार्ता बाहेर काशी फुटली कोण जाणे? पण फुटली हे खरे! हां हां म्हणतं सर्व मेरठ शहरात पसरली. शहरातील बाजारात, घरांघरात, दुकानात, कट्ट्याकट्ट्यावर आणि प्रत्येक अड्ड्यावर एक चर्चेचा विषय बनली. हीच चर्चा स्वयंपाक घरातील स्त्रियांच्या चर्चेचा विषय बनली. आणि तीच चर्चा महिला वर्गात अधिक तीव्र झाली. या वरून हेच सिद्ध होते कि, महिला वर्गाचे किती लक्ष किती सावाधाणपणे लष्करातील घटनांवर होते! त्या किती जागरूक होत्या! भारतीय स्वत्वाचा उपमर्द त्यांना सहन झाला नाही. आणि ज्या दिवशी म्हणजेच ९ मे ला ८५ हिंदी सैनिकांना तोफांच्या दबावाखाली हातापायात लोखंडी बेड्या ठोकून तुरुंगात पाठविण्यात आले त्याच दिवशी ९ मे लाच संध्याकाळी जेव्हा लष्करातील शिपाई शहरात फेरफटका मारायला आले तेव्हा शहरातील वातावरण प्रक्षुब्ध असल्याचे दिसून आले. विशेषता: नगरवाशी महिला ते जेथे जातील तेथे त्यांचा धिक्कारच करू लागल्या. १८५७ च्या घटनांचा जो अधिकृत वृत्तांत J. C. Wilson याने लिहिला आहे त्यात मेरठच्या महिलांनी हिंदी शिपायांचा जो धिक्कार केला त्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. ' शहरात जेथे - जेथे  हे शिपाई गेले तेथे - तेथे नागरिक स्त्रियांनी त्यांचा धिक्कारच  केला आणि असे बोलून दाखविले कि, " तुमचे बंधू तिकडे तुरुंगात खितपत पडले असताना तुम्ही येथे बाजारात माशा मारीत आहात! धिक्कार असो तुमच्या जिण्याला! शिपायांच्या मनात आधीच विद्रोहाची भावना ठासून भरली होती. त्या भरलेल्या कोठ्रावार आगीची ठिणगी टाकण्याचे काम या प्रमाणे मेरठच्या महिलांनी केले.' 

अश्याप्रकारे महिलांचे बोलणे शिपायांच्या काळजालाच झोंबले. त्याच दिवशी रात्री त्यांनी छावणीत गुप्त सभा घेतल्या आणि दुसर्याच दिवशी त्यांनी उठावणी करण्याचा निर्णय घेतला.  तसेच त्वरित दिल्लीच्या हिंदुस्थानी शिपायांना निरोप पाठवण्यात आला कि " उद्याच मेरठ ताब्यात घेऊन आम्ही दिल्ली चालून येत आहोत. आणि मग ठरल्या प्रमाणे १० मे ला त्यांनी उठाव केला. इंग्रजांची घरे जाळली. लष्करावर ताबा मिळवला. तुरुंगाच्या भिंती फोडून आपल्या सैनिक बांधवाना मुक्त केले. सदर बाजाराची लूट केली आणि इंग्रजांचा "Union Jack" उतरवून स्वातंत्र्याचा हिरवा ध्वज उभारला. या एका दिवसातच मेरठच्या ब्रिटीश सत्तेचा विनाश करून व स्वातंत्र्य घोषित करून सर्व हिंदी सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले आणि येथून पुढे स्वातंत्र्य संग्रामाची सुरवात झाली. १० मे चा मेरठ उठाव घडवून आणण्यासाठी व स्वातंत्र्य संग्रामाचा मुळारंभ करून देण्यास तेथील महिला अश्या त-हेने कारणीभूत ठरल्या. 

ह्या सर्व महिलांनी जो हिंदी शिपायांचा तिरस्कार केला त्यात केव्हढा वणवा भडकविण्याचे सामर्थ्य होते हे ह्यावरून सिद्ध होत. या सर्व घरगुती महिला होत्या. त्यांनी स्वयंस्फूर्तीने सदर बाजारात उघड-उघड शिपायांचा तिरस्कार करून त्यांच्यातील स्वातंत्र्याचा  वणवा भाद्कावला. तेव्हा त्यांना इंग्रज सत्तेची भीती वाटली नाही. या १८५७ च्या स्वातंत्र्य समराला चेतवणार्या महिलांची नामावली कुठेच नाही. या मेरठच्या रणरागीणींना मनाचा मुजरा.


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

Monday, July 12, 2010

महाराष्ट्राची अस्मिता - वारली चित्रकला
महाराष्ट्र हे अनेक गुणांनी समृद्ध असे राज्य आहे. इथे महाभारतातील पुरातन वस्तूपासून ते तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली, छत्रपती शिवाजी महाराज, ब्रिटीशांचे राज्य यांच्या गाथा, कथा योग्य जपून ठेवल्या आहेत. तसेच सांस्कृतिक व कलाक्षेत्रातसुद्धा महाराष्ट्र मागे नाही. अभंग, पोवाडा, भारुड, नमन, गोंधळ असे अनेक वेगवेगळ्या लोककला अजूनही प्रसिद्ध व जपून ठेवल्या आहेत. गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ठाणे जिल्हा आहे. येथे "वारली" म्हणून आदिवासी राहतात. त्यांच्याकडे चित्रकलेची एक वेगळी परंपरा त्यांनी अजूनही जपून ठेवली आहे. आज मुंबई व सुरात हि दोन प्रगत शहरे जवळ असल्यामुळे व या दोन शहरांच्या "cosmopolitan" होण्याने "वारली paintings " ना पुन्हा चांगले दिवस आले आहेत.


 चित्रकलेचा इतिहास 
                                   वारली चित्रकला हि साधारण १० व्या शतकात सुरु झाली असावी. त्यावेळी अक्षर नसल्यामुळे चित्रांद्वारे आपले विचार त्यावेळची लोक मांडत असावी. पण नंतरच्या  काळात हि कला लुप्त होऊन पुन्हा १७ व्या शतकात सुरु झाली. पण अशीच चित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका गुफांमध्ये पाहायला मिळतात. या गुफांमधली चित्रे मनसे व जनावरांच्या चित्रांनी रंगवली आहेत. हि चित्रे "इड्स civilization " पासून सुरु झाली असावीत. पण काही तज्ञांच्या मते हि चित्रकला २५०० ते ३००० वर्षापूर्वी  सुरु झाली असावी. या चित्रकलेद्वारे रोजच्या दिनक्रमाची व संस्कुतीची चित्रे रेखाटली जात असत. साधारण १९७० सालापासून वारली चित्रकलेला लग्नाच्या मंडपात, बंगल्यामध्ये सुशोभित करण्यासाठी वापरली जात आहे.  
 वारली चित्रकला सेंटर 
                                     वारली हि जमात साधे  असलेल्या उत्पादनात सुखात व समाधानी राहतात. त्यांना आपल्या फावल्या वेळात चित्र रंगवायला आवडतात. चित्र रंगवायला पहिली पूर्ण भिंत शेणाने सरावली जाते. नंतर त्यावर गेरू (लाल रंगाची माती) ने सारवली जाते. ती संपूर्ण सुकल्यावर त्यावर तांदळाचे बारीक पीठ पाण्यात भिजवून त्याने चित्रे काढली जातात. वारली जमातीमध्ये २ चित्रे अत्यंत महत्वाची आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांचे "तारपा नृत्य" महत्वाच्या दिवशी करण्यात येते. याचे हे चित्र प्रत्येक भिंतीवर रेखाटली जातात. 'तारपा' हा मध्यभागी उभा राहून वाद्य वाजवत असतो व त्याच्याभोवती सर्व स्त्री - पुरुष नृत्य करीत असतात. नृत्य करताना नर्तक त्याच्याकडे पाठ करत नाहीत. या संपूर्ण नृत्याचे हुबेहूब  चित्र प्रत्येक झोपडीवर रेखाटलेले असते. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये सरळ रेषा कधी वापरली जात नाही. त्रिकोण, गोल, फुले, पाने, झाडे, तीपके, एवढेच वापरून चित्रे काढण्यात येतात.


 स्वयंपाकघराच्या भिंतीवर चित्र 
                                                    दुसरे महत्वाचे चित्र म्हणजे लग्नाच्या आधी स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवर "देवी पालघट" चे चित्र काढण्यात येते. हे चित्र काढण्यासाठी दोन विवाहित सुहासिनिना मध्याबघी चोकोन काढून त्यामध्ये  "देवी पालघट" हिचे चित्र रेखाटले जाते. हि देवी म्हणजे  शेतीची, धनाची व लग्नाची संमती देणारी देवी तिची पूजा व स्थापना या चित्राद्वारे दोन्ही लग्नघरी रेखाटून तिची संमती मिळवली जाते. त्या दोन सुवासिनींनी काढलेल्या देवीच्या चित्राभोवती गावातील अनेक सुवासिनी चित्र पूर्ण करण्यासाठी एकत्र जमतात व झाड, फुले. माणसे, हरण, मोर अशी विविध चित्रे काढून ते चित्र पूर्ण करण्यात येते. देवीच्या एका बाजूला पाच डोके असलेल्या घोड्यावर बसलेल्या व्यक्तीचे चित्र काढण्यात येते. त्याच्या पाठीमागे चंद्र, सूर्य, केळीची झाडे आदी चित्रे काढण्यात येतात. वारली जमातीमध्ये स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात पूज्य व आदरणीय स्थान  मानले जाते. हे चित्र पूर्ण करायला गावातल्या सौभाग्यवती महिला अतिशय उत्सुक असतात. या चित्राचा अर्थ दोन व्यक्तींचे मिलन नसून संपूर्ण जातीचा एकत्रित सहभाग होय.
                                                 वारली चित्रकलेवर निसर्गाची मोठी पकड दिसून येते. सफेद रंग म्हणजे तांदळाच्या पीठाने बनवलेला रंग, शेणाने व गेरूने सारवलेली भिंत व चित्रांमध्ये दाट झाडी. फुले,  पणे, जनावरे, सूर्य, चंद्र हे प्रामुख्याने दिसून येते. या चित्रामध्ये त्यांचे साधे राहणीमान व स्वभाव हेही दिसून येते.
                                                साधारण १४ ते १६ व्या  शतकामध्ये पर्शियन  व मोघल कलाकृती प्रसिद्ध झाल्या. यात राजस्थानातील चित्रकलाही भारतात पसरली. बाकीच्या चित्रकलेत महागडी व कलाकुसर असलेली चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. पण वारली चित्रकलेत आपल्याला साधी, स्वस्त, सोपी व आकर्षक चित्रकला पाहायला मिळते महाराष्ट्राची अस्मिता असलेली हि चित्रकला जगभर आपले नाव गाजवतेय.  


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

क्षितिजा पलीकडे.... आता facebook वर